Latest Marathi News Live Update : आज दिवसभरात काय घडलं, जाणून घ्या एका क्लिकवर...

बहुचर्चित मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलीये.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

21 आप कार्यकर्त्यांची बवाना पोलीस ठाण्यातून सुटका

दिल्लीचे मंत्री आणि आप नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह 21 आप कार्यकर्त्यांना बवाना पोलीस ठाण्यातून सोडण्यात आले.

आज आयटीओ येथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात पक्षाच्या निषेधार्थ त्यांना ताब्यात घेण्यात आले.

संजय निरुपम यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, "संजय निरुपम यांचा राजकीय कार्यकाळ पाहता त्यांनी लोकांना काँग्रेसशी जोडण्यासाठी खूप काम केले आहे. उत्तर भारतात त्यांची ओळख आहे. संजय निरुपम यांच्याशी अजून चर्चा झालेली नाही, पण जर ते तयार असतील आणि त्यांचे विचार भाजपशी जुळतील, तर त्यांच्यासारख्या लोकांचे नेहमीच स्वागत आहे."

केजरीवाल यांची अटक हा देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस - के. चंद्रशेखर राव

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक हा देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि बीआरएस एमएलसी कविता यांच्या नुकत्याच झालेल्या अटकेवरून हे सिद्ध होते की केंद्रातील सत्ताधारी भाजप विरोधकांना अस्तित्वहीन करण्याच्या एकमेव हेतूने वागत आहे. यासाठी केंद्र सरकार ईडी, सीबीआय, आयटी आणि इतर केंद्रीय तपास संस्थांचा वापर करत आहे. लोकशाहीवर कुऱ्हाड चालवणाऱ्या भाजप सरकारच्या कृतींचा बीआरएस पक्ष तीव्र निषेध करतो: के. चंद्रशेखर राव, बीआरएस प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री

Lok Sabha Election 2024 : ओडिशामध्ये बीजेडी सर्व 147 विधानसभा अन् सर्व 21 लोकसभा जागा लढवणार

बीजेडी सर्व 147 विधानसभा मतदारसंघ आणि सर्व 21 लोकसभा मतदारसंघात ओडिशातील लोकांच्या पाठिंब्याने लढेल आणि नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली एक तृतीअंशाहून अधिक जागा जिंकेल, असे बीजेडी नेते प्रणव प्रकाश दास यांनी ट्विट केले आहे.

बीजेडी खासदार भर्तृहरी महताब यांनी पक्षाचा राजीनामा

ओडिशामध्ये भाजप आणि बीजेडी यांच्या लोकसभा निवडणुक जागावाटपाच्या चर्चा फिसकटल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर कटकचे बीजेडी खासदार भर्तृहरी महताब यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Arvind Kejriwal Arrest : ...केजरीवालांची अटक बेकायदेशीर; केजरीवालांच्या वकिलाचा दावा 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी काल अटक केली आहे. दरम्यान केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी ही बेकायदेशीर अटक आहे, त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळणार- पायलट

छत्तीसगड काँग्रेसचे निवडणूक प्रभारी सचिन पायलट म्हणाले की, राज्यामध्ये यावेळी आम्हाला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. राज्याची स्थापा झाल्यापासून आम्हाला येथे यश मिळालेलं नव्हतं. परंतु यावेळी माझी माहिती वेगळी आहे.

'आप'चे कार्यकर्ते केजरीवालांच्या निवासस्थानी जमू लागले

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिव्हिल लाइन्स भागातील निवासस्थानाकडे कूच केली आहे. मोठ्या संख्येचे नेते, कार्यकर्ते केजरीवालांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत.

गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला आग

नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे.

Sharad Pawar: राष्ट्रवादीविरोधात शरद पवार गट निवडणूक आयोगात तक्रार करणार

राष्ट्रवादीविरोधात शरद पवार गट निवडणूक आयोगात तक्रार करणार, अजित पवारांच्या पक्षाकडून अजूनही घड्याळ चिन्हाचा वापर होतोय, असा आरोप पवार गटाने केला आहे.

PM Modi in Bhutan: पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो, भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची थिम्पू येथे दोन दिवसीय राज्य दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी भेट घेतली.

CM Bhagwant Mann: ''भाजप व्लादिमीर पुतिन यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे; ही हुकूमशाही आहे" पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, "भाजप देशात सर्वाधिक द्वेषपूर्ण भाषणे भाषणे देत आहे. त्यांनी आपच्या मोहल्ला क्लिनिकसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा निधी थांबवला. आगामी निवडणुकीत कोणत्याही विरोधी नेत्याने निवडणूक लढवू नये अशी त्यांची इच्छा आहे. भाजप व्लादिमीर पुतिन यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. ही हुकूमशाही आहे"

ईडीकडून कोर्टात केजरीवालांसाठी १० दिवसांच्या कोठडीची मागणी

मद्य धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 10 दिवसांची कोठडी मागितली आहे. ईडीने केजरीवाल यांना काल अटक केल्यानंतर राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर केले.

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर 

भाजपने पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमधील लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली.

धामणगावात पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत; जेसीबीतून उधळली फुलं

बीडमधून लोकसभाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धामणगावात पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

भाजपनं जाहीर केली चौथी यादी; या राज्यातील उमेदवारांची नावं जाहीर 

दक्षिण मुंबईची जागा मनसेला जाण्याची शक्यता

मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. पण अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण मनसेचा जर महायुतीत सहभाग झालाच तर दक्षिण मुंबईची जागा मनसेला जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

केजरीवालांच्या अटकेवर ममता बॅनर्जींनी व्यक्त केला निषेध

PM Modi Bhutan :  पंतप्रधान मोदींचं भूतानमध्ये खास स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भूतान दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचं खास स्वागत करण्यात आलं. मोदींच्या स्वागतासाठी तेथील स्थानिक कलाकारांनी गरबा सादर केला. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी स्वतः लिहिलेल्या गाण्यावर या कलाकारांनी नृत्य केलं.

Anna Hazare : 'ही कर्माची फळं..'; केजरीवाल अटक प्रकरणी अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

केजरीवाल यांना अटक केल्याप्रकरणी अण्णा हजारेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "एकेकाळी माझ्यासोबत काम करणारे, आणि दारूच्या विरोधात आवाज उठवणारे केजरीवाल हे आता लिकर पॉलिसी तयार करत आहेत हे दुर्दैवी आहे. त्यांना झालेली अटक ही त्यांच्याच कर्माची फळं आहेत" असं अण्णा म्हणाले.

Arvind Kejriwal : केजरीवालांनी मागे घेतली आव्हान याचिका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. या अटकेला आव्हान देणारी याचिका त्यांनी दाखल केली होती. मात्र आता ही याचिका त्यांनी मागे घेतली आहे.

Prasad Lad : भाजप आमदार प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला

भाजप आमदार प्रसाद लाड हे राज ठाकरेंच्या भेटीला निघाले आहेत. मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता असतानाच या भेटीमुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.

केजरीवालांच्या अटकेनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू

केजरीवालांच्या अटकेनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे. दिल्लीसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे.

अहमगनगरमध्ये पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत; आमदार, खासदार उपस्थित

अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. जेसीबीमधून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं आहे.

केजरीवालांच्या अटकेनंतर पुण्यात आंदोलन सुरू

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आज अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. पुण्यात आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

Maratha Reservation : आरक्षणासाठी दोन दिवसांत नायगावात दोघांनी संपवले जीवन

मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी नायगाव तालुक्यात दोन दिवसांत दोघांनी आत्महत्या केली आहे. टिकणारे आरक्षण आणि सगेसोयऱ्यांबाबतच्या अध्यादेशाच्या अंमलबजाणीकडे सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप होत आहे.

मी निवडणुक लढवणार नाही - शरद पवार

मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Bihar:  बांधकामावेळी पुलाचा एक भाग कोसळला 

बिहार: भेजा-बकौर दरम्यान मरीचाजवळ एका बांधकामावेळी पुलाचा एक भाग कोसळला असल्याचे वृ्तसमोर आले आहे.

Maharashtra Politics : दिल्लीमध्ये आज महायुतीची पुन्हा बैठक 

दिल्लीमध्ये आज महायुतीची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. यावेळी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

Pune News: रवींद्र धंगेकर लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

वींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. मात्र आबा बागुलजे ग्रेसचे नेते आणि सात टर्म नगरसेवक आहेत त्यांना उमेदवारी मिळाली नाहीये. यामुळे त्यांच्या मुलाने स्टेटस ठेवत तीव्र नाराजी व्यक्त केली केली आहे.

चिक्कबळ्ळापूर लोकसभा मतदारसंघ : खासदार बच्चेगौडा यांचा भाजपचा राजीनामा

बंगळूर : सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेत चिक्कबळ्ळापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार बी. एन. बच्चेगौडा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या बच्‍चेगौडा यांनी आता अधिकृतपणे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना राजीनामा पत्र पाठवले असून भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.

National Highway Toll Plaza : कोगनोळी तपासणी नाक्यावर १४ लाखांची रोकड जप्त

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या सीमा तपासणी नाक्यावर १४ लाखांची रोकड जप्त केली. मतदारांना देण्यासाठी होणारी भेटवस्तू, रोकड आदीसह अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने तपासणी नाका उभा केला आहे. बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास साताराहून बंगळूरकडे जात असलेल्या बसची (एनएल ०१ बी २७८७) तपासणी केली असता त्यामध्ये १४ लाखांची रोकड असल्याचे निदर्शनास आले. टिंबर व्यावसायिक निस्सार सुन्नासबी (वय ५५, रा. मुगबाळ-बंगळूर) असे रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या रकमेबद्दल कोणतीही कागदपत्रे सादर न केल्याने ती जप्त केली.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानला रवाना

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानला रवाना झाले आहेत. PM मोदी 22-23 मार्च रोजी भूतानच्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. यानिमित्ताने दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

Supriya Sule : आमदार रोहित पवार, युगेंद्र पवारांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवा; खासदार सुळेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली आहे.

Weather Update : पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज 

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हळूहळू उष्मा वाढत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत देशातील अनेक भागांत विजांचा कडकडाट आणि गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने 22 ते 24 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयीन भागात हलका पाऊस किंवा हिमवृष्टीचा अंदाजही वर्तवला आहे.

Vijay Shivtare : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता

शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. युतीधर्म न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. शिवतारे गेली काही दिवस अजित पवारांवर सतत टीका करत आहेत.

Heavy Rain Tamil Nadu : तामिळनाडूत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु

तामिळनाडू : थुथूकुडीच्या विविध भागात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु असून नागरिकांसह प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Arvind Kejriwal Arrest : अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; ईडी केजरीवालांना Rouse Avenue Court मध्ये  करणार हजर

नवी दिल्ली : दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज (शुक्रवार) ईडी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करणार आहे. त्याचवेळी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेविरोधात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारच्या घरी पोहोचून तातडीने सुनावणीची मागणी केली होती.

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना 'ईडी'कडून अटक

Latest Marathi News Live Update : काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ५७ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून यात महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. तसेच बहुचर्चित मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलीये. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पद्धतशीरपणे आर्थिकदृष्ट्या पंगू करीत असल्याचा थेट हल्ला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. महायुतीचा जागा वाटपाचा तिढा लवकर सुटेल, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिलीये. शिवाजी विद्यापीठाच्या मार्च/एप्रिल-२०२४ उन्हाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com