Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

आग विझवण्यासाठी 40 खाजगी पाण्याच्या लॉरी, 14 अग्निशमन दल आणि 300 अग्निशमन दल कार्यरत आहेत.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal

जबलपूरमध्ये मोदींच्या रोड शोदरम्यान स्टेज कोसळले

जबलपूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या रोड शोदरम्यान स्टेज कोसळल्याने अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

आढळराव पाटलांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांकडून विरोध

आढळराव पाटलांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यानी नाराजी व्यक्त केली आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे भाजप समन्वयक अतुल देशमुख यांनी राजीनामा दिलाय.

आग विझवण्यासाठी अजूनही यश नाही

तामिळनाडूच्या वेल्लालोर डंप यार्डात काल रात्री मोठी आग लागली. सलग दुसऱ्या दिवशीही आग विझवण्यासाठी 40 खाजगी पाण्याच्या लॉरी, 14 अग्निशमन दल आणि 300 अग्निशमन दल कार्यरत आहेत.

मध्य प्रदेशात पंतप्रधानांचा रोड शो

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो ला सुरुवात झाली आहे. यासाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

पाच कोटींची रोकड जप्त

कर्नाटकातील बेल्लारी येथे पोलिसांनी छाप्यात एका घरातून ५ कोटींची रोकड, चांदी आणि सोने जप्त केले. बेल्लारीच्या कांबळी बाजारातील नरेश गोल्ड शॉपीच्या घरावर बेल्लारी पोलिसांनी छापा टाकला होता.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उद्या भंडाऱ्यात सभा

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचे आयोजन उद्या ८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता भंडारा येथे करण्यात आले आहे.

मद्य घोटाळा झाला असेल तर तो घोटाळा भाजपनेच केलाय; आप नेत्याचा आरोप

त्यांच्या बोलण्याला महत्त्व नाही, पंतप्रधान मोदींनी एकही काम केलं असतं, तर त्यांनी त्यांच्या कामावर मतं मागितली असती. पीएम मोदींचं एकच काम उरलं आहे, एखाद्याचे सरकार चोरण्यासाठी कुणाचा आमदार फोडणं, कुणाचा खासदार फोडणं. त्यांच्याकडे 400 जागा असत्या तर केजरीवालांना हटवून तुरुंगात टाकण्याची गरज होती का... मद्य घोटाळा झाला असेल तर तो घोटाळा भाजपनेच केला आहे... अशी प्रतिक्रिया आप नेते संदीप पाठक यांनी दिली

वायएस जगन मोहन रेड्डी यांना निवडणूक आयोगाची नोटीस 

तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांना नोटीस बजावली आहे. टीडीपी पॉलिटब्युरो सदस्य वरला रामय्या यांनी 5 एप्रिल रोजी सीएम जगन रेड्डी यांच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

निवडणुक आयोगाने जगन मोहन रेड्डी यांना 48 तासांच्या आत त्यांची भूमिका मांडण्यास सांगितले आहे, असे न झाल्यास आयोगाकडे अहवाल पाठविला जाईल. त्यानंतर जगन रेड्डी यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेसाठी काँग्रेसने जाहीर केले ३ उमेदवार

पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 3 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये प्रदिप बिस्वास, अझहर मलीक. पपिया चक्रवर्ती यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पुण्याचा प्रणव कराड अमेरिकेतून बेपत्ता, शिप मॅनेजमेंट कंपनीत करत होता काम

Pune News: पुण्यातील प्रणव कराड नावाचा तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाला आहे. हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर काम करत होता. आता तो अचानक बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय फार चिंतेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव काम करत होता. येथे तो शिफ्ट डेस्कला काम करायचा.

मुंबई -गोवा महामार्गावर बस-रिक्षाचा भीषण अपघात

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव नजीक तिलोरे गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. एसटी आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काही प्रवासी जखमी झाले आहेत.

प्लॅस्टिक बंदी कागदावरच कॅरिबॅगची सर्रास विक्री; कारवाईकडे मनपाचे दुर्लक्ष

अहमदनगर शहरात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी कागदोपत्रीच आहे. कॅरिबॅगची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत नसल्याने कॅरिबॅगचा सर्रास वापर सुरू आहे.

उन्हाळा असल्याने डांबर वितळले! तक्रारीसाठी गेलेल्या ग्रामस्‍थांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर

श्रीगोंदे तालुक्यातील म्हसे ते कोंडेगव्हाण रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. नेते निवडणुकीच्या कामात दंग असल्याने संबंधित ठेकेदाराने काम उरकते घेण्याचा प्रयत्न केला. अधिकारी म्हणतात, उन्हाळा असल्याने डांबर वितळले.

नाफेडतर्फे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ

नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीला २६ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अभिनेते गोविंदांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट

अभिनेते गोविंदा यांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

ते स्वाभिमानी नेते..असं करणार नाही- नाना पटोले

एकनाथ खडसे भाजपत प्रवेश करणार अशा राजकी चर्चांना उधाण आलंय. या चर्चांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "ते स्वाभिमानी नेते आहेत. असं करणार नाहीत. भाजपमध्ये त्यांच्यावर छळ झालाय. "

राजश्री पाटलांच्या प्रचाराला संजय राठोडांची हजेरी

राजश्री पाटील यांच्या प्रचारसभेला संजय राठोड यांनी हजेरी लावली. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, "जर राजश्री पाटील जिंकल्या तर मोठा निधी मिळेल."

Baramati News: सुळेंंचे प्रचारप्रमुख  करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार 

खासदार सुप्रिया सुळेंना निवडणूक होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने अजित पवार गटामध्ये सहभागी झाले आहेत.

Mumbai News: विक्रोळीत दूषित पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिक हैराण

विक्रोळी येथील कन्‍नमवार नगरमध्‍ये फुटलेली जलवाहिनी दुरूस्त झाली असून पाणीपुरवठा पुर्ववत झाला आहे. मात्र अनेक ब-याच भागात अपूरा आणि दूषित पाणीपुरवठा होवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Nagpur: नागपुरात MBBS विद्यार्थ्याने स्वत:ला कोंडल्याने खळबळ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) वैद्यकीय अभ्यासक्रमातील एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडून घेतल्याने मेडिकलमध्ये खळबळ उडाली. त्याच्या मनावर परिणाम झाल्याची शंका व्यक्त करीत त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेतले होते, अशी माहिती पुढे आली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात जंतरमंतरवर एक दिवसीय उपोषण

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आपचे नेते जंतरमंतरवर एक दिवसीय उपोषणाला बसणार आहेत.

अपघातातील जखमी ऊसतोड मजूर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

ऊसतोड हंगाम करून घराकडे परतत असताना झालेल्या अपघातातील जखमी झालेल्या सपना परशुराम ऐवळे वय 22 रा. चिक्कलगी या महिलेचा सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान काल रात्री मृत्यू झाला. या अपघाताला मृतांची संख्या आता पाच वर पोहोचली आहे.

PM मोदी आज बिहार-बंगाल दौऱ्यावर, जबलपूरमध्ये करणार रोड शो

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 370 जागांवर आणि एनडीएला 400 च्या पार नेण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक रॅली आणि रोड शो करत आहेत. या मालिकेत पंतप्रधान मोदी आज बिहारमधील नवादा आणि पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. यासोबतच ते मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराची सुरुवात जबलपूरमध्ये रोड शो करून करणार आहेत. 72 तासांत पंतप्रधान मोदींचा हा दुसरा बिहार दौरा असेल.

Gold Rate : सोन्याचा भाव ७० हजारांपार; चांदीच्या दरातही सातत्याने वाढ

जागतिक पातळीवर मागणी वाढत असल्याने सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असून, नवी दिल्लीत आज सोन्याचा भाव ७२ हजारांपार गेला. देशांतर्गत बाजारपेठेत आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅममागे ७० हजारांहून अधिक नोंदवला गेला. मुंबईत सोन्याचा भाव ७१,६९९ रुपयांवर गेला. चांदीचा भावही आज प्रति किलो ८०,५०० रुपयांवर गेला.

Weather Update : राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Weather Update : राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदमगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येलो अलर्ट जारी करण्या आला आहे.

NIA Squad : बंगालमध्ये 'एनआयए'च्या पथकावर जमावाचा हल्ला; दोन अधिकारी जखमी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पाठोपाठ राष्ट्रीय तपास संस्थेलाही (एनआयए) स्थानिकांच्या रोषास सामोरे जावे लागले. मेदिनीपूर पूर्व जिल्ह्यातील भूपतीनगर येथे शुक्रवारी रात्री तपाससंस्थेच्या पथकावर जमावाने हल्ला करत दगडफेक केली त्यामध्ये दोन अधिकारी जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांचे हे पथक स्फोटप्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी येथे आले होते. हे अधिकारी आरोपींना ताब्यात घेत असतानाच सशस्त्र जमाव त्यांच्यावर चालून गेला. यावेळी जमावाने अधिकाऱ्यांच्या गाड्यांचीही तोडफोड केली.

Eknath Khadse : एकनाथ खडसेंची भाजपवापसी होणार

Latest Marathi News Live Update : मी भाजपात प्रवेश करत आहे असे म्हणता येणार नाही. ते तर मी बांधलेले घर आहे. मी माझ्या घरात परत जात आहे. जाण्याचा दिवस आपण जाहीरपणे कळविणार आहोत,’’ अशा शब्दांत शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी घरवापसीवर भाष्य केले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. राज्यात तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर मागणी वाढत असल्याने सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असून, नवी दिल्लीत सोन्याचा भाव ७२ हजारांपार गेलाय. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com