Latest Marathi News update : राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा ते BRS नेत्या के. कविता यांच्या कोठडीत वाढ, दिवसभरात काय घडलं?

महाराष्ट्रात आज हिंदू नववर्ष गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी - देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या! - देवेंद्र फडणवीस

शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा! राज ठाकरेंच्या सभेला सुरुवात....

शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा! राज ठाकरेंच्या सभेला सुरुवात....

 शिवतीर्थावर मनसेचा पाडवा मेळावा! थोड्याच वेळात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामेळाव्यात थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल ते काय भूमिका मांडतात ते पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात 6 जण शोषखड्ड्यात पडले; बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू

अहमदनगरमधील नेवासा येथे मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात सहा जण शोषखड्ड्यात पडल्याची घटना समोर आली असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य रोड

तामिळनाडूमधील चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येन गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

हेमा मालिनींच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरुन सुरजेवाला यांना नोटीस

भाजप नेत्या हेमा मालिनी यांच्या विरोधात केलेल्या टिप्पण्यांसाठी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांना नोटीस बजावली. त्यांच्याकडून 11 एप्रिल 2024 रोजी उत्तर मागितले आहे.

बारामतीमध्ये शंभर टक्के कामं मी केली- पवार

बारामती मतदारसंघामध्ये शंभर टक्के कामं मी केली आहेत. परंतु विद्यमान खासदार त्याचं श्रेय घेतात, अशी टीका अजित पवारांनी केली.

संसदेत भाषणं करुन कामं होत नसतात- अजित पवार

संसदेत भाषणं करुन मतदारसंघाची कामं होत नसतात, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंना लगावला.

मोदींच्या सभेला वरुण गांधी अनुपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पीलीभीतमध्ये सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेला वरुण गांधी गैरहजर होते. तिकीट कापल्यामुळे ते नाराज असल्याचं सांगितलं जातंय.

केजरीवालांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका कोर्टाने फेटाळली

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटकेत आहेत. त्यांनी अटकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

Rohini Khadse: ॲड. रोहिणी खडसे यांची मुनगंटीवार यांच्यावर टीका

ॲड. रोहिणी खडसे यांची मुनगंटीवार यांच्यावर टीका करत म्हणाल्या, चंद्रपुरात भाजपाचे नेते व राज्याचे मंत्री श्री सुधीरजी मुनगंटीवार यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस श्री. मुनगंटीवार यांचा तीव्र धिक्कार करते. सांस्कृतिक कार्य खाते सांभाळणाऱ्या मंत्र्यांनी महाराष्ट्राची संस्कृतीला अशोभनीय असे वक्तव्य केले आहे. इतक्या ज्येष्ठ नेत्याने अशी वक्तव्ये करणे म्हणजेच भाजपाच्या पायाखालील वाळू घसरत असल्याचे सिद्ध होते.

Loksabha Election 2024: तुम्हाला 19 एप्रिलला ठरवायचे आहे, कोणता पक्ष सरकार स्थापन करेल - गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "तुमचा खासदार कोण असेल, कोणता पक्ष सरकार स्थापन करेल आणि पुढचा पंतप्रधान कोण असेल हे तुम्हाला 19 एप्रिलला ठरवायचे आहे. तुमच्याकडे दोन पर्याय आहेत, एकीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आहे''

Monsoon in India: भारतात 'या' राज्यांमध्ये पावसाची कमतरता भासण्याची शक्यता

कडक ऊन सुरू असतानाच मान्सूनबाबत एक अपडेट समोर आली आहे. स्कायमेट वेदरने भारतात यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत "सामान्य" मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पुरेसा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाची कमतरता भासू शकते.

Supreme Court: EVM मशीन संदर्भातील सुनावणी पुढील आठवड्यात होणार

EVM मशिन मधील मते आणि VVPAT मधील सर्व मते मोजली जावीत यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुढील मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणावर आज सुनावणी अपेक्षित होती मात्र, या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने पुढच्या आठवड्यात सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले आहे.

1 एप्रीलला न्यायमुर्ती बी आर गवई आणि न्यायमुर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली होती. ही याचिका अरूण कुमार अग्रवाल, नेहा राठी यांनी दाखल केली आहे. निवडक व्हिव्हीपॅट मशिनची मोजणी न करता सरसकट मोजणी करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

Lok Sabha Election 2024: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना 'झेड' दर्जाची सुरक्षा

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना 'झेड' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. IB कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गृह मंत्रालयाने CEC राजीव कुमार यांना 'Z' श्रेणी सुरक्षा दिली आहे. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, गुप्तचर संस्था आयबीच्या अहवालाच्या आधारे राजीव कुमार यांना गृह मंत्रालयाने झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे.

विश्वजीत कदम संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट करणार

सांगलीची जागा काँग्रेसच्या हातून शिवसेनेकडं गेल्यानं आता आमदार विश्वाजीत कदम नाराज असून नॉटरिचेबल झाले आहेत. पण आता संध्याकाळपर्यंत ते पत्रक काढून त्याद्वारे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

BRS नेत्या के. कविता यांच्या कोठडीत वाढ

बीआरएसच्या नेत्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कथित दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीनं अटक केली असून न्यायालयीन कोठडीत आहेत.

मविआच्या उर्वरित जागांवरील उमेदवार जाहीर होणार 

पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीची बैठक सुरु. या बैठकीत उर्वरित जागांवरील उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

सूर्यग्रहण, अमावस्या आणि यांची सभा; मोदींवर ठाकरेंची सडकून टीका 

चंद्रपूरमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला आज उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. सूर्यग्रहण, अमावस्या आणि यांची सभा अशा शब्दांत त्यांनी संभावना केली. कालचं भाषण हे कमळाबाईचे भाषण होतंत, पंतप्रधानांचं भाषण नव्हतं. भेकड पार्टीचे भाषण होतं. पंतप्रधानपदाचा आम्ही अवमान करणार नाही. आम्हाला नकली शिवसेना म्हणणारे खंडणीखोर आहेत, अशा शब्दांत ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला.

रावेरमधून राष्ट्रवादीकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर

रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे उद्योगपती श्रीराम पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. पुणे येथे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील,महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.

गुंड निलेश घावळ याच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला

कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कारचा ताफा विमानतळ वाहतूक विभागाच्या पोलिसांनी जकात नाका या ठिकाणी अडवला. निलेश घायवळच्या तीनही गाड्यांना काळ्या काचा असल्याने पुणे वाहतूक पोलिसांकडून कारवाई. निलेश घायवळ त्याच्या सहकाऱ्यांसोबत नगरच्या दिशेने चालला होता. खराडी जकात नाक्याजवळ पुणे वाहतूक पोलिसांची कारवाई केली. काळ्या काचांविरोधातील दंड भरून या गाड्यांना पोलिसांनी सोडलं. पुणे शहरातील अनेक कुख्यात गुंड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या गाड्यांना काळ्या काचा राजरोसपणे लावल्या जातात.

अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्याकडून काटेवाडीत गुढी पाडवा साजरा

अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्याकडून काटेवाडीत गुढीपाडव्याचा सण साजरा. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज बारामती तालुक्यातील काटेवाडीत गुढीपाडव्याचा सण साजरा केला. काटेवाडी येथील निवासस्थानी विधीवत पूजा करुन गुढी उभारण्यात आली. अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार हेही उपस्थित होते.

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसची बाजू राजकारणात भक्कमपणे लावून धरणारे काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मोदींना कुठल्याही प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीत म्हणून कच्चाथिवूचा मुद्दा उकरुन काढला - चिदंबरम

राजधानीत गुढीपाडव्याचा उत्साह 

आज गुढीपाढव्यानिमित्ताने राजधानी नवी दिल्लीत देखील उत्साह पाहायला मिळत आहे. दिल्लीतील मराठी नागरिकांकडून गुढीपाडवा साजरा केला जात आहे. तसेच नवीन महाराष्ट्र सदनात गुढी उभारण्यात आली आहे.

पंतप्रधानांकडून गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या.

ढोल वाजवत फडणवीस यांनी साजरा केला गुढीपाडवा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे ढोल वाजवत गुढीपाडवा साजरा केला.

गुढीपाडवाउउ"आम्ही आमची भूमिका वेळोवेळी मांडली"

इस्त्रायल-हमास युद्धावर भारताने आपली भूमिका वेळोवेळी मांडली असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी दिली.

Swabhimani Shetkari Sanghatana : हातकणंगलेसह सांगली, माढा लढवणार - राजू शेट्टी

कोल्‍हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगलेसह सांगली, परभणी, माढा, बुलडाणा आदी जागांवर लढणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्‍थापक राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. बुलडाण्यातून रविकांत तुपकर लढत आहेत. ते आमचेच आहेत. त्यांना पाठिंबाच असेल, असे शेट्टी यांनी सांगितले.

MNS Gudi Padwa : शिवाजी पार्कवर आज मनसेचा पाडवा मेळावा, मार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता

MNS Gudi Padwa : आज ९ एप्रिलला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा होणार आहे. यामुळे पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गावर, तसेच शिवाजी पार्कवर जाण्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

Latest Marathi News Live Update
Raj Thackeray: मनसे मेळाव्याच्या पार्शवभूमीवर मंगळवारी दादर परिसरात वाहतुकीत बदल!

Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात उद्यापासून होणार ४७१२ ‘ईव्हीएम’चे वाटप

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी दहा विधानसभा मतदारसंघांकरिता ४७१२ मतदान यंत्रे (ईव्हीएम मशीन) चे वाटप बुधवार (ता. १०) पासून निवडणूक विभागाकडून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३३३८ मतदान केंद्रांवर ही मशीन दिली जाणार आहेत.

Dombivli News : डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह

डोंबिवली : डोंबिवलीची ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराचे हे 100 वे वर्ष असून स्वागत यात्रेचे 26 वे वर्ष आहे. गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ डोंबिवलीतून रोवली गेली. त्यानंतर राज्य नव्हे तर देशभरात स्वागत यात्रेची परंपरा सुरू झाली. आज सकाळीच गणेश पूजा झाल्यानंतर गणपती मंदिरातून पालखी बादशाहो मैदानाच्या दिशेने निघाली. ज्येष्ठ वकील उज्वल निकम हे या पालखी सोहळ्याला उपस्थित होते.

Supreme Court : सरकारी शाळांच्या बोर्ड परीक्षांच्या निकालाला स्थगिती

बंगळूर : सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या ५ वी, ८ वी, ९ वी आणि ११ वीच्या मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. सध्या कोणत्याही शाळांनी निकाल जाहीर करू नयेत, असे न्यायालयाने स्पष्ट करून पुढील आदेश येईपर्यंत थांबण्याच्या सक्त सूचना दिल्या.

Congress : पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची मुस्लिम लीगशी तुलना केल्यानंतर संतापलेल्या काँग्रेसने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाहीरनाम्यावरील टीकेसह अन्य विविध मुद्दे आयोगासमोर मांडले. दोन्ही पक्षांना समान न्याय मिळावा म्हणून महाविद्यालये, इमारती यांच्यावर लावण्यात आलेली पंतप्रधानांची छायाचित्रे आणि पोस्टर हटविण्यात यावीत, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मुंबा देवी मंदिरात भाविकांची गर्दी

मुंबई : चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मुंबा देवी मंदिरात पहाटे आरती करण्यात आली. यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती.

Hatkanangale Lok Sabha : उद्धव ठाकरेंची 1 मे रोजी पेठवडगावात जाहीर सभा

कोल्हापूर : एक मे, महाराष्ट्र दिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जिल्ह्यातील पहिली जाहीर सभा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पेठवडगाव येथे होणार आहे. महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे. दुसऱ्या दिवशी सांगली आणि कोकणात प्रचारासाठी ठाकरे रवाना होणार आहेत.

Weather Update : अर्ध्या महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा

पुणे : हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्ध्या महाराष्ट्राला हवामान खात्याने वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश असून, विदर्भातील चार जिल्ह्यांत गारपीट होईल, असेही हवामान खात्याने सोमवारी सांगितले.

Gudi Padawa : महाराष्ट्रात आज हिंदू नववर्ष गुढीपाडवा सण उत्साहात साजरा होणार

Latest Marathi News Live Update : हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते. यावेळी आज ९ एप्रिलपासून हिंदू नववर्ष सुरू होत आहे. महाराष्ट्रात आज हिंदू नववर्ष गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. तसेच मागणीत वाढ झाल्यामुळे आज सोन्याचा भाव नवी दिल्लीत प्रति दहा ग्रॅममागे ३५० रुपयांनी वाढून ७१,७०० रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद होणार आहे, तर मनसे नेते राज ठाकरेंची जाहीर सभा आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांच्या तुरुंगातील मुक्कामावर आज निर्णयाची शक्यता आहे. देशात वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com