Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांच्या प्राप्तिकर थकबाकीप्रकरणी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal

Kerala Railway police: तिकीट मागितल्याने प्रवाशाने दिला धक्का, टीटीईचा मृत्यू

केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तिकीट मागणाऱ्या टीटीईला प्रवाशाने धक्का दिला आहे. यात टीटीई विनोद यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Vanchit Bahujan Aaghadi : वंचितने बारामती लोकसभा मतदारसंघात दिला सुप्रीया सुळेंना पाठिंबा

वंचितने आपली तिसरी यादी जाहीर केलीये. यात पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी देण्यात आलीये. तर बारामतीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांना तिहारमध्ये मिळणार घरचं जेवण अन् काही पुस्तकं

अरविंद केजरीवाल यांना घरचं जेवण आणि काही पुस्तकं बाळगण्यास परवानगी मिळाली आहे. केजरीवाल यांनी रामायण, महाभारत आणि हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईट हे पुस्तकं मागवलं आहे.

TMC leader Mahua Moitra: महुआ मोईत्रा अडचणीत, इडीने तक्रार केली दाखल

मनी लाँड्रिग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रश्न विचारण्यासाठी गिफ्ट घेतल्याचे हे प्रकरण आहे.

आपच्या याचिकेविरोधात ईडीकडून दिल्ली हायकोर्टात उत्तर दाखल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेला विरोध करत ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर दाखल केले.

दिल्लीच्या घराला आग लागून दोन मुलींचा मृत्यू

दिल्लीच्या सदर बाजार परिसरात एका घराला आग लागून दोन मुलींचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान आता ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

कोंढव्यात मोकळ्या जागेवर आग; अग्निशमन दलाची पाच वाहने घटनास्थळी दाखल

कोंढवा, ता. २ : सिहंगड कॉलेजजवळील शिवसमृद्धी इमारतीजवळ मोकळ्या मैदानात टाकाऊ मालाला मोठी आग लागली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुर झाला असून अग्निशमन दलाची पाच वाहने घटनास्थळी दाखल आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू असून आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शिवसेना संपवण्यामागे राऊतच कारणीभूत- नारायण राणे

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे पवारांचं प्रामाणिकपणे काम करतात, शिवसेना संपवण्यामागे संजय राऊत हेच कारणीभूत आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

गोडसे, पाटील, गवळी वर्षा बंगल्यावर दाखल

राज्यातील काही जागांच्या संदर्भातील तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर हेमंत गोडसे, हेमंत पाटील आणि भावना गवळी दाखल झाल्या असून बैठकीला सुरुवात झाली आहे.

दिल्लीतील आगीत दोन मुलींचा मृत्यू

दिल्लीच्या सदर बाजार परिसरात एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. सध्या आग आटोक्यात आली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

काँग्रेसची ११४ उमेदवारांची यादी जाहीर

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने मंगळवारी ११४ उमेदवारांची यादी घोषित केली.

Kiren Rijiju: चीन घाबरला आहे आणि नामकरण करत आहे- केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

चीनने अरुणाचल प्रदेशातील 30 ठिकाणांची नावे बदलल्याबद्दल केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "चीन चिंताग्रस्त आहे. काँग्रेसच्या काळात सीमाभागावर काम केले जात नव्हते. चीन घाबरला आहे आणि नामकरण करत आहे. पण नामकरणात काहीही बदल होणार नाही. भारत या धमक्याने डगमगणार नाही.''

Lok Sabha Election2024: काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची आणखी एक यादी

काँग्रेसने निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत आंध्र प्रदेश, ओडिशा, बिहार आणि पश्चिम बंगालसह 17 जागांसाठी उमेदवारांची नावे आहेत. यादीत आंध्रमध्ये 5, बिहारमध्ये 3, ओडिशात 8 आणि पश्चिम बंगालमध्ये एक जागा आहे.

Delhi Liquor Scam: आप नेते संजय सिंह यांची जामिनावर सुटका करण्याचे निर्देश

अबकारी धोरण प्रकरणी सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आप नेते संजय सिंह यांची जामिनावर सुटका करण्याचे निर्देश दिले.

Anurag Thakur: आपने रामलीला मैदानात सर्व भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र केले- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

आपचे नेते आतिशी यांच्या विधानावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, "रामलीला मैदानात जिथे त्यांनी एकेकाळी भ्रष्टाचारविरोधी रॅली काढली होती, तिथे त्यांनी सर्व भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र केले. रॅली... हे तेच केजरीवाल आहेत जे म्हणायचे की या खुर्चीवर जो बसतो तो भ्रष्ट होतो. त्यांनी ते खरे सिद्ध केले"

Lok Sabha Election 2024 : पीएम मोदींचा उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये रोड शो केला. त्यांनी येथे जाहीर सभेलाही संबोधित केले.

'आप'ला मोठा दिलासा! सुप्रिम कोर्टाकडून खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर

ईडीने सर्वोच्च न्यायालयात दिल्ली मद्य धोरण प्रकरणी AAP नेते संजय सिंह यांना जामीन देण्यास त्यांचा कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितले यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संजय सिंह यांना जामीन मंजूर केला.

सुरक्षा दलाच्या जवानांकडून ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

बिजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

तीन महिन्यांत ९७ जणांचा अपघाती मृत्यू

नागपुर शहरात सातत्याने रस्ते अपघातांमध्ये वाढ होत असून गेल्या तीन महिन्यांत ९७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही संख्या गेल्यावर्षी तीन महिन्यांच्या तुलनेत ३५ अधिक मृत्यूची नोंद झाल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

शरद पवारांनी विदर्भातील प्रकल्प पळवले- रामदास तडस 

वर्ध्याचे महायुतीचे उमेदवार रामदास त़डस यांनी शरद पवारांवर विदर्भातील प्रकल्प पळवल्याचे आरोप केले आहेत.

Navi Mumbai: पावणे एमआयडीसीमध्ये भीषण आग

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

पतंजली आयुर्वेदाविरोधात दाखल करण्यात आलेल्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरूवात झाली आहे.

Nagpur: पती-पत्नीने राहत्या घरी संपवलं जीवन, कारण अस्पष्ट

दर्यापूर तालुक्यातील गायवाडी गावात आपल्या राहत्या घरात पती-पत्नी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. एक) दुपारी एक वाजता उघडकीस आली आहे. सदर घटनेची माहिती गावात पसरताच मोठ्या प्रमाणात घरासमोर ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

ठाण्याची उमेदवारी स्वपक्षीयालाच द्या; शिंदेंचे पदाधिकारी आक्रमक!

ठाणे लोकसभेवर शिवसेनेकडून दावा करण्यात येत आहे. त्यानुसार शिवसेनेना शिंदे गटाकडून विभागावर बैठका घेण्यात येत आहे. बैठकीत ठाणे लोकसभेवर दावा करीत, स्वपक्षीयालाच उमेदवारी मिळावी, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विजय शिवतारे पोहोचले अजित पावरांच्या भेटीला

विजय शिवतारे अजित पावरांच्या भेटीला गेले आहेत. या मागचे कारण समजु शकलं नाहीये.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; गुरुवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा राहणार बंद

पुण्यात गुरुवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.नउन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठा बंद होत असल्याने पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. वारजे जलकेंद्र अंतर्गत सगळा भाग, लष्कर जलकेंद्र भाग, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, कोंढवे धावडे जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र परिसर, वडगाव, कात्रज कोंढवा परिसर या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

सांगलीत भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, ४ मजुरांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सांगलीत भीषण अपघात झाला आहे. सांगलीत ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मोठा शिवसेनेला मोठा धक्का; माढा लोकसभा संपर्क प्रमुखांचा पक्षाला रामराम

माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम केला आहे. संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.


न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा CBIला सल्ला

नवी दिल्ली: ‘‘देशातील प्रमुख तपास संस्थांना त्यांच्याकडील मूळ जबाबदारीच्या तुलनेत कमी महत्त्वाच्या प्रकरणांवर काम करावे लागत आहे. त्यांनी केवळ देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि देशाच्या विरोधात गुन्हा घडल्याच्या प्रकरणांवरच लक्ष केंद्रित करावे,’’ असा सल्ला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज तपास संस्थांना दिला.

Madha Lok Sabha : माढ्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, संजय कोकाटे करणार शरद पवार गटात प्रवेश

माढ्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे हे शिवसेनेचा राजीनामा देणार असल्याचं कळतंय. संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. शुक्रवारी शेकडो समर्थकांसह कोकाटे मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

Satara Lok Sabha : राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आल्यास विचार करू - पृथ्वीराज चव्हाण

सातारा : सातारा मतदारसंघात उमेदवार कोण असावा, याबद्दल चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने निवडणूक लढवावी, यासाठी राष्ट्रवादीकडून अद्यापपर्यंत प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास विचार करू, असे असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे संकेत दिलेत.

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आरोपींवर कारवाई सुरुच

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आरोपींवर कारवाई सुरुच आहे. आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तीन महिन्यांत 36 गुन्हेगारांना मोका लावला आहे. 

Japan Earthquake : उत्तर जपानमध्ये ६.१ तीव्रतेचा भूकंप

उत्तर जपानमधील इवाते आणि ओमोरी प्रांतात मंगळवारी ६.१ तीव्रतेचा भूकंप झाला. इवातेच्या उत्तरेकडील किनारपट्टीचा भाग हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असं रॉयटर्सनं जपानच्या हवामानशास्त्र संस्थेचा हवाला देत म्हटलंय.

Dapoli News : दापोलीत निर्भय बनो आंदोलनाची आज सभा

दाभोळ : समाजातील विविध नामवंतांनी देशभर चालवलेल्या ‘निर्भय बनो-लोकशाही बचाव’ या आंदोलनाची सभा आज दुपारी २ वाजता दापोलीतील पेन्शनर हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेला उल्का महाजन आणि प्रा. राजेश समेळ मार्गदर्शन करणार आहेत. सभेसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

VVPAT Case : निवडणूक आयोगाला व्हीव्हीपॅटप्रकरणी नोटीस

नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघातील सर्व ईव्हीएम मशीनसोबत असलेल्या व्हीव्हीपॅट पावत्यांची १०० टक्के मोजणी करण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. एका संस्थेने याबाबत याचिका केली आहे. सध्याच्या नियमानुसार, प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रांतील कोणत्याही पाच ईव्हीएम मशीनमधून व्हीव्हीपॅटची (व्होटर्स व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल) पावत्यांची मोजणी केली जाते.

Hatkanangle Constituency : हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींबाबत 'मविआ' आज घेणार महत्त्वाचा निर्णय

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यातून या मतदारसंघात आघाडी ही ‘स्वाभिमानी’चे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातील निर्णय आज (ता. २) अपेक्षित आहे.

Dinesh Vaghela : 'आप'चे संस्थापक सदस्य दिनेश वाघेला यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : दिनेश वाघेला हे आम आदमी पार्टीच्या (आप) संस्थापकांपैकी एक होते. सोमवारी वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सांगितलं की, पक्षाचे संस्थापक सदस्य दिनेश वाघेला यांचं निधन झालं. लोकांमध्ये ते बाबाजी म्हणून ओळखले जात होते.

Income Tax : प्राप्तिकर थकबाकीप्रकरणी काँग्रेसला मोठा दिलासा

Latest Marathi News Live Update : तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांच्या प्राप्तिकर थकबाकीप्रकरणी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला. आगामी लोकसभा निवडणूक होईपर्यंत पक्षावर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई केली जाणार नसल्याचे प्राप्तिकर विभागाने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. तसेच 'आप'च्या मंत्री आतिशी आज पत्रकार परिषद घेत सकाळी दहा वाजता गौप्यस्फोट करणार असल्याचं कळतंय. वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. युतीधर्माला जागत शिवसेनेला (शिंदे गट) १४ खासदार देण्याची तयारी भाजपने दाखविली आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळांसह कुटुंबीयांना कोर्टाने नोटीस बजावलीये. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.