News Update: देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

केंद्रीय निवडणूक आयोग ५४३ लोकसभा मतदारसंघांसाठीचा कार्यक्रम आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करणार आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal

...तर महाराष्ट्रात मतपत्रिकांवर मतदान होणार - निवडणूक आयुक्त

महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजानं नुकतीच महत्वाची घोषणा केली होती. मोठ्या संख्येनं मराठा उमेदवार उभे करुन सरकारमधील पक्षांना जेरीस आणण्याची योजना सांगितली. त्यामुळं जर राज्यात एखाद्या मतदारसंघात ४०० हून अधिक अर्ज आले तर त्या ठिकाणी मतपत्रिकांद्वारे मतदान होईल, असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं आहे.

राहुल गांधी अन् प्रियंका गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन केलं बाबासाहेबांना अभिवादन 

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या मुंबईत दाखल झाली आहे. या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मृतीस्थळ असलेल्या दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होते.

'एमव्ही रुएन' जहाजाच्या क्रूला चाच्यांपासून वाचवण्यासाठी नौदलाकडून मोठी कारवाई सुरू

भारतीय नौदलाचे मरीन कमांडोज एमव्ही रुएन या व्यापारी जहाजाच्या क्रूला चाच्यांपासून वाचवण्यासाठी मोठी कारवाई करत आहेत याबद्दलची माहिती भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Latest Marathi News Live Update: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच नरेंद्र मोदींचं ट्वीट

लोकशाहीचा सर्वात मोठा सण इथे! EC ने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आम्ही भाजप-एनडीए निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहोत. सुशासन आणि सर्व क्षेत्रांतील सेवा वितरणाच्या आमच्या ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे आम्ही लोकांपर्यंत जात आहोत.

दहा वर्षांपूर्वी, आम्ही पदभार स्वीकारण्यापूर्वी, INDI अलायन्सच्या दयनीय कारभारामुळे भारतातील लोकांचा विश्वासघात आणि भ्रमनिरास झाला होता. घोटाळे आणि धोरण लकव्यापासून कोणतेही क्षेत्र अस्पर्श राहिले नाही. जगाने भारताचा त्याग केला होता. तिथून, हे एक गौरवशाली वळण आहे.

140 कोटी भारतीयांच्या बळावर आपले राष्ट्र विकासाचे नवे विक्रम रचत आहे. आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि करोडो लोकांची गरिबीतून मुक्तता झाली आहे. आमच्या योजना भारताच्या सर्व भागात पोहोचल्या आहेत आणि संपृक्ततेच्या जोरावर चांगले परिणाम मिळाले आहेत.

एक दृढनिश्चय, केंद्रित आणि परिणामाभिमुख सरकार काय करू शकते हे भारतातील लोक साक्षीदार आहेत. आणि, त्यांना ते अधिक हवे आहे. म्हणूनच भारताच्या कानाकोपऱ्यातून, समाजातील सर्व घटकांना वेठीस धरून लोक एकाच आवाजात म्हणत आहेत- अब की बार, 400 पार!

आमचा विरोधक निर्विवाद आणि निर्विवाद आहे. ते फक्त आम्हाला शिवीगाळ करतात आणि व्होट बँकेचे राजकारण करतात. त्यांची घराणेशाही आणि समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न स्वीकारले जात नाहीत. तितकाच त्यांना त्रास देणे हा त्यांचा भ्रष्टाचाराचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. लोकांना असे नेतृत्व नको आहे.

आमची तिसरी टर्म, खूप काम करायचे आहे. सत्तर वर्षे राज्य करणाऱ्यांनी निर्माण केलेली पोकळी भरून काढण्याचं शेवटचं दशक होतं. हा आत्मविश्वासाची भावना जागृत करण्याबाबतही होता की होय, भारत समृद्ध आणि आत्मनिर्भर होऊ शकतो. या भावनेवर आपण उभारू.

गरिबी आणि भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई आणखी वेगाने सुरू राहील. सामाजिक न्यायावर जोर दिला जाईल. आम्ही भारताला तिसरी सर्वात मोठी जागतिक अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने काम करणार आहोत. तरुणांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न आणखी दृढ करू.

मी स्पष्टपणे पाहू शकतो की येणारी पाच वर्षे पुढील हजार वर्षांसाठी एक राष्ट्र म्हणून आपल्या मार्गावर मार्गदर्शित करण्यासाठी आणि भारताला समृद्धी, सर्वांगीण विकास आणि जागतिक नेतृत्वाचा मूर्त स्वरूप देणारा रोडमॅप स्थापित करण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पाची असेल.

मला लोकांच्या आशीर्वादाने, विशेषत: गरीब, आमचे शेतकरी, युवा आणि नारी शक्ती यांच्याकडून खूप शक्ती मिळते. जेव्हा ते म्हणतात ‘मैं मैं मोदी का परिवार’, तेव्हा ते मला आनंदाने भरून जाते आणि मला विकसित भारत तयार करण्यासाठी अधिक मेहनत करायला लावते. हे घडवून आणण्याचे हे युग आहे आणि आम्ही एकत्र करू! हेच खरे आहे!

महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये होणार मतदान

महाराष्ट्रामध्ये २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे आणि २५ मे या तारखांना निवडणुका होणार आहेत.

दुसऱ्या टप्प्याचं मतदान २६ एप्रिलला होणार

पहिल्या टप्प्याचं मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यातलं मतदान २६ एप्रिलला होणार आहे.

लहान मुलांच्या प्रचारामध्ये वापर करु नये- राजीव कुमार

राजकीय पक्षांनी प्रचार करताना लहान मुलांचा प्रचारामध्ये वापर करु नये, अशा स्पष्ट सूचना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्या आहेत.

याची लाट, त्याची लाट म्हणता येणार नाही- मुख्य निवडणूक आयुक्त

निवडणुकीच्या बातम्या देताना याची लाट, त्याची लाट म्हणता येणार नाही. तसं म्हटलं तर मग ती जाहिरात असल्याचं स्पष्ट करावं लागणार आहे.

अफवा रोखण्यासाठी आयोगाचं मोठं पाऊल

'मिथ वर्सेस रियालिटी' अशी वेबसाईट निवडणूक आयोगाच्या वतीने लाँच करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं.

दारु, साड्या पैसे वाटणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार- राजीव कुमार

निवडणुकांमध्ये दारु, साड्या पैसे वाटणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

निवडणूक प्रक्रियेमध्ये हिंसेला स्थान नाही-  राजीव कुमार

निवडणुकीदरम्यान कुठल्याही हिंसेला स्थान नाही. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

उमेदवारांची प्रत्येक माहिती वेबसाईटवर उपलब्ध होणार- राजीव कुमार

48 हजार तृतीयपंथी लोकसभेला मतदान करणार

  • यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी १.८२ कोटी नवमतदार आहेत

  • ४८ हजार तृतीयपंथी मतदार

  • १०० वर्षांवरील मतदार २ लाख

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

आर्वी-धुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी

आर्वी-धुळे रस्त्यावर पूरपाड्याजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल दोन किमी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी ४५ हजार कोटींचा निधी दिला

मागच्या दीड ते दोन वर्षांमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल ४५ हजार कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे.

अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत- संजय राऊत

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे औरंगाबाद लोकसभेची जागा लढण्यासाठी इच्छूक होते. परंतु चंद्रकांत खैरे देखील दावा करत असल्याने ते नाराज आहेत, अशा चर्चा सुरु होत्या. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत, असं राऊत म्हणाले.

आज लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार

आज लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर देशात आचारसंहिता लागू करण्यात येईल.

जागावाटपाची चर्चा समाधानकारक पद्धतीने सुरु- सुनील तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी महायुतीतील जागावाटपावर प्रकाश टाकला आहे. जागावाटपाची चर्चा समाधानकारक पद्धतीने सुरु असल्याची, माहिती तटकरे यांनी दिली.

ज्योती मेटे यांनी घेतली शरद पवारांची भेट

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. बीड लोकसभेची जागा लढवण्यासाठी त्या इच्छूक असल्याची माहिती मिळत आहे.

श्रीरंग बारणे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महायुतीतून मलाच उमेदवारी मिळणार, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त कऱण्यात आला आहे.

येत्या सोमवारी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप- संजय शिरसाट

नुकतीच संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी खुलासा केला. येत्या सोमवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार, सूचक वक्तव्य त्यांनी केलं. ठाकरे गटात अंतर्गत मोठा वाद सुरु असल्याचा दावाही त्यांनी केला.

Nagpur Crime News : घरात आढळले तिघांचे मृतदेह, निमखेडा जवळील घटना 

मौदा तालुक्यातील निमखेडा जवळील शांतीनगर येथे एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह घरातच आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

Bharat Jodo : राहुल गांधींची ठाण्यात सभा

राहुल गांधी यांनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला

Bharat Jodo: राहुल गांधींच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज; होणार जोरदार शक्तीप्रदर्शन

 काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी (ता.१६) मुंबईत दाखल होत असून या यात्रेच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष या यात्रेच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. यात्रेच्या स्वागतासाठी मुंबईत सर्वत्र होर्डिंग लावण्यात आले आहेत.

Congress: काँग्रेस नेत्यांची शरद पवारांसोबतची बैठक संपली

काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांसोबतची बैठक संपली आहे. बैठकीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. जागावाटपाबाबत कोणताही वाद नसल्याचं ते म्हणाले.

Nashik News: नाशिकमध्ये तीन दिवसांपासून सिटी लिंक बस सेवा विस्कळीत

नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सिटी लिंक बस सेवा विस्कळीत आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. वेतनासंबंधी मागण्यासाठी त्यांचा संप अद्याप सुरुच आहे.

Ambadas Danve: लोकसभा उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे- अंबादास दानवे

मी गेल्या १० वर्षांपासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. तशीच इच्छा मी संघटना प्रमुखांकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे ते यावर निर्णय घेतील. पण, मी नाराज नसून माझा कशासाठीही आग्रह नाही, असं उबाठा नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.

Pune News: पुण्यामध्ये अजित पवार गटाकडून शिवतारेंच्या विरोधात बॅनरबाजी

पुण्यात विजय शिवतारे यांच्या विरोधात अजित पवार गटाने बॅनरबाजी केली आहे. बारामती, पुरंदरचे एकच दादा, अजित दादा अशा आशयाचे पोस्टर्स पुण्यात लागले आहेत. बारामतीमधून विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यापासून वाद निर्माण झाला आहे.

late General Bipin Rawat : बिपिन रावत यांच्या स्मृतीदिनानिमित्त सरकारकडून श्रद्धांजली

आज माजी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांचा ६६ वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त सरकारकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. ते भारताचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते.

Loksabha Election 2024  : जिल्हा धाराशिव आणि मतदारसंघ उस्मानाबादच राहणार

राज्य सरकारकडून धाराशिवचे नाव उस्मानाबाद करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि मतदारसंघाचे नाव उस्मानाबादच राहणार आहे.

Chandoli Dam Project : चांदोली प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन स्थगित

कोल्हापूर : चांदोली प्रकल्पग्रस्तांनी ४४ दिवस ठिय्या आंदोलन केले. वारूळ येथे काही मोजक्या प्रकल्पग्रस्तांनाही मुलकी पड जागा देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्त स्थगित केल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

Telangana : हैदराबादमध्ये तेलाच्या गोदामाला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

तेलंगणा : हैदराबादमधील टोलीचौकी येथील तेलाच्या गोदामाला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

POCSO Act : माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याविरुध्द 'पोक्सो' गुन्हा दाखल

बंगळूर : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा सदाशिवनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ (पोक्सो) केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.

Indian Army : मलिकवाडच्या जवानाला आसाममध्ये वीरमरण

मलिकवाड : बेळगाव जिल्ह्यातील सैनिकी गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या मलिकवाड (ता. चिक्कोडी) येथील जवानाचे सेवेत असताना निधन झाले आहे. सुशीलकुमार बाबू खोत (वय ४३) असे आसाम येथे सेवेत असताना निधन झालेल्या जवानाचे नाव आहे. निधन कशामुळे झाले, याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. आज सकाळी जवानाचे पार्थिव मलिकवाड येथे येणार आहे.

PM Narendra Modi : गुलबर्ग्यात आज मोदी फुंकणार प्रचाराचे रणशिंग, दुपारी दोन वाजता एन. व्ही. मैदानावर जाहीर सभा

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे होम ग्राऊंड गुलबर्गा येथून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात करतील. दुपारी दोन वाजता जिल्हा मुख्यालयातील एन. व्ही. मैदानावर जाहीर सभा होईल. सोमवारी (ता. १८) मोदी भाजपचे दिग्गज नेते बी. एस. येडियुराप्पा यांचा गृहजिल्हा शिमोगा येथे सभा घेतील. येडियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र हे शिमोगा येथून विद्यमान खासदार आहेत आणि त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे.

Vinayak Raut : खासदार विनायक राऊत आज कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. शिव आरोग्य मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृहात पक्षाच्या मोजक्या प्रमुखांसाठी मेळावा होणार आहे. संपर्क नेते अरुण दुधवडकर सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

BRS MLA : आमदार के. कविता यांना 'ईडी'कडून अटक; आज न्यायालयात हजर करणार 

हैदराबाद : दिल्लीतील कथित मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) आमदार के. कविता यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अटक केल्यानंतर त्यांना दिल्लीला नेल्याचे समजते. कविता यांना आज ‘ईडी’च्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल.

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा बिगुल आज वाजणार

Latest Marathi News Live Update : लोकसभेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल आज (ता. १६) फुंकले जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग ५४३ लोकसभा मतदारसंघांसाठीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करेल, असे आयोगातर्फे जाहीर करण्यात आलंय. ‘इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्याऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांच्या माध्यमातून निवडणूक घेण्याचे निर्देश दिले जावेत,’ अशी विनंती करणाऱ्या याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेतून प्रत्यक्षात आलेली निवडणूक रोखे योजना म्हणजे जगातील सर्वांत मोठे खंडणी रॅकेट आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलीये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा सदाशिवनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ (पोक्सो) केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com