Latest Marathi News Update : दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

लोकसभा निवडणुकीचे पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

काश्मीरमधील 4 दहशतवादाशी संबंधित मालमत्ता जप्त

एनआयए दहशतवादी नेटवर्कवर सतत कारवाई करत आहे. काश्मीरमधील आणखी 4 दहशतवादाशी संबंधित मालमत्ता जप्त केल्या आहेत.

पाटणा येथील बीएसएनएल कार्यालयात आग

बिहार: पाटणा येथील बीएसएनएल कार्यालयात आग लागली जी नंतर अग्निशमन दलाने आटोक्यात आणली.

भारती विद्यापीठजवळ पीएमपीच्या बसला आग

भारती विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पीएमपीच्या एका सीएनजी बसला आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गाडीवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली असल्याचे सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. कात्रज डेपोतील पीएमपीएलची १२ वर्षे जुनी सीएनजी बस स्वारगेटकडून कात्रजच्या दिशेने येताना सातारा रस्त्यावर चढावर ही घटना घडली

Latest Marathi News Live Update : लोणावळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

लोणावळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेसवे वर वाहतूक कोंडी. खोपोली एक्झिटजवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर संथगतीने वाहतूक सुरु आहे.

नरेश म्हस्के यांच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले यांचा रोड शो...

शिवसेनेचे ठाणे लोकसभा उमेदवार नरेश म्हस्के यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा रोड शो.

राष्ट्रपतींच्या हस्ते मान्यवरांना पद्म पुरस्कारांचं वाटप

एचडी रेवण्णा यांच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी

शिवकाशीत फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू

जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीला पाठींबा

जालना लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.

केदारनाथची पंचमुखी उत्सव डोली केदारनाथ धाम येथे पोहोचली; पाहा व्हिडिओ

भगवान केदारनाथची पंचमुखी उत्सव डोली केदारनाथ धाम येथे पोहोचली आहे. या उत्सवासाठी लोक मोठ्या संख्येने सगभागी झाले आहेत.

Sam Pitroda's controversial remarks: सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक; दिल्लीमध्ये आंदोलन

इंडियन ओव्हरसीझ काँग्रेसचे एक दिवस आधीपर्यंत अध्यक्ष असलेले सॅम पित्रोदा यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून दिल्लीमध्ये आंदोलन केले जात आहे.

Pune News: आंबेगाव, जांभूळवाडी- कोळेवाडी परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात

आंबेगाव, जांभूळवाडी- कोळेवाडी परिसरात ढग दाटून आले असून रीमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.

Amit Shah: आम्ही सत्तेत आलो तर मुस्लिमांचे आरक्षण काढून घेऊ- अमित शहा

भाजप पुन्हा सत्तेत आली तर मुस्लिमांचे आरक्षण काढण्यात येईल आणि ते एससी, एसटी आणि ओबीसींना देण्यात येईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत.

Manjara Dam: मांजरा धरणात फक्त दोन टक्के पाणीसाठा शिल्लक

मांजरा धरणात फक्त २ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. उन्हाळा संपण्यासाठी एक महिना असताना पाण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Mahananda Dairy : महाराष्ट्रातील महानंदा डेअरी आता गुजरातच्या 'मदर डेअरी'च्या ताब्यात.. हस्तांतरण पूर्ण

महाराष्ट्रातील महानंदा डेअरी तोट्यात असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारने आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याबरोबर करार केला आहे. पाच वर्षासाठी हा करार करण्यात आला आहे. त्यामुळे महानंदा डेअरी आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या ताब्यात गेली आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची उपकंपनी ही मदर डेअरी आहे. त्यामुळे आता मदर डेअरी हे महानंदाचे उत्पादन घेईल. अर्थात, महानंदाचं नाव हे कायम राहणार आहे.

Air India Termination : कर्मचाऱ्यांना काढून टाकणं एअर इंडिया एक्स्प्रेसला भोवणार? चीफ लेबर कमिशनने बोलावली तातडीची बैठक.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या कित्येक कर्मचाऱ्यांनी अचानक आजारी सुटी टाकली होती. यानंतर त्यांच्या कित्येक फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या आहेत. याप्रकरणी कारवाई करत कंपनीने सुमारे 30 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. याबाबत आता चीफ लेबर कमिशनने बैठक बोलावली आहे. या बैठकीला एअर इंडिया एक्स्प्रेस युनियन आणि कंपनीच्या सीईओंना बोलावलं आहे.

Air India Express : किती फ्लाईट्स वेळेवर अन् किती झाल्या कॅन्सल? एअर इंडिया एक्स्प्रेसने दिली माहिती

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आज 283 फ्लाईट्स ऑपरेट होणार आहेत. तसंच आज 85 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. या विमान कंपनीतील शेकडो कर्मचारी कालपासून सामूहिक आजारी रजेवर आहेत.

Amit Shah in Telangana : तेलंगणामध्ये आम्ही 10 जागा जिंकू; अमित शाहांनी व्यक्त केला विश्वास

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज तेलंगणामध्ये भाजपचा प्रचार करत आहेत. गेल्या वेळी आम्ही या राज्यात चार जागा जिंकलो होतो. यावेळी 10 जागांवर विजय मिळवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Sharad Pawar : राज्यात मविआला 30 ते 35 जागा मिळतील, शरद पवारांनी वर्तवला अंदाज

साताऱ्यातून शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला.

Revanth Reddy : पंतप्रधानांना तेलंगणात मतं मागण्याचा अधिकार नाही; आम्हीच 14 जागा जिंकू - रेवंथ रेड्डी

तेलंगणामध्ये काँग्रेसला दोन अंकी जागा मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी व्यक्त केला. आपलं लक्ष्य 14 जागा जिंकण्याचं असल्याचंही ते म्हणाले. भाजपचा आणि तेलंगणाचा संबंध नाही. बजेट सेशनवेळी पंतप्रधान स्वतः म्हणाले होते की तेलंगणाच्या लोकांनी काँग्रेसला विजय मिळवून देत चूक केली. सगळी बिलं देखील बंद दाराआड पास झाली होती. पंतप्रधानांना तेलंगणामध्ये येऊन मत मागण्याचा अधिकार नाही, असंही ते म्हणाले.

Asaduddin Owaisi : भाजपला वाटतं भारतातील सर्व मुस्लिम हे पाकिस्तानी; ओवैसींची टीका

भाजप नेत्या नवनीत राणा यांनी यापूर्वी म्हटलं होतं, की एमआयएम किंवा काँग्रेसला मत दिल्यास ते थेट पाकिस्तानला जाईल. यावर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर टीका केली आहे. "पंतप्रधान मोदी 2014 साली अचानक नवाज शरीफ यांच्या घरी गेले होते, ते काय होतं? भाजपला वाटतं भारतातील सगळे मुस्लिम हे पाकिस्तानी आहेत. त्यांना भारतातील विविधता आवडत नाही. आरएसएसच्या याच विचारसरणीचा आपल्याला पराभव करायचा आहे" असं ते म्हणाले.

Priyanka Gandhi Vadra: राहुल गांधी रोज अदानी अंबानींचे नाव घेत आहेत- काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या, "राहुल गांधींनी (अदानी अंबानींचे नाव) घेणे बंद केले आहे, असे त्यांनी जे म्हटले आहे ते योग्य नाही, राहुल गांधी दररोज या विषयावर बोलत आहेत''

Robert Vadra: रॉबर्ट वाड्रा निवडणूक का लढणार नाहीत? स्वत:च दिले स्पष्टीकरण

रॉबर्ट वाड्रा निवडणूक का लढणार नाहीत याच्या उत्तरात रॉबर्ट वाड्रा म्हणाले, "मला आनंद आहे की केएल शर्मी अमेठीतून निवडणूक लढवत आहेत आणि राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत. मी खूप लोकांना भेटतो. लोकांना वाटते की मी सक्रिय राजकारणात प्रवेश केला पाहिजे. आम्ही 2004 मध्ये सोनिया गांधींना अमेठीतून विजयी केले, तेव्हापासून लोकांनी आम्हाला खूप प्रेम आणि आदर दिला आहे. मी गांधी कुटुंबातील सदस्य आहे. आणि जेव्हा जगभरातून लोक येतात तेव्हा त्यांना भेटण्याची इच्छा असते मी बराक ओबामा, नेल्सन मंडेला यांनाही भेटलो आहे.

Dushyant Chautala: हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटालांचा अविश्वास प्रस्तावाला बाहेरून पाठिंबा

हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि जेजेपी नेते दुष्यंत चौटाला म्हणाले, "2 महिन्यांपूर्वी स्थापन झालेले सरकार आता अल्पमतात आहे कारण त्यांना पाठिंबा देणाऱ्या 2 आमदारांनी राजीनामा दिला आहे. 3 आमदारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. जेजेपीने सांगितले की, या सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाला आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ, काँग्रेसने पावले उचलून राज्यपालांना पत्र लिहावे.''

Navneet Rana: नवनीत राणांवर निवडणूक आयोगाने कारवाई करावी; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

भाजप नेते नवनीत रवी राणा यांच्या "15 सेकंद लागतील" या वक्तव्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "पंतप्रधान मोदी आणि अमित शहा समाजात द्वेष पसरवत आहेत त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि उमेदवारही तेच करणार आहेत हे स्वाभाविक आहे. अकबरुद्दीन ओवैसी काय म्हणाले ते चुकीचे आहे आणि नवनीत राणा यांनी जे म्हटले आहे ते देखील अत्यंत लाजिरवाणे आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही विधानांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी

Nagpur Rain Update Today: सोसाट्याच्या वाऱ्यासह नागपूरात पावसाला सुरवात; शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस

  • नागपूरात पावसाला सुरवात

  • सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस

  • भर दिवसा सर्वत्र काळोखासह पावसाला सुरवात

  • हवामान विभागाकडून आज दिला होता पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज

  • रस्त्यावरील वाहनांना अंधारामुळे दिवसा लावावे लागले वाहनाचे दिवे

  • बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित

Sam Pitroda: सॅम पित्रोदा प्रकरणात मनोज झा यांची उडी; तीव्र निषेध करत म्हणाले...

आरजेडी नेते मनोज झा म्हणाले, "आमच्यापैकी कोणीही सॅम पित्रोदा यांच्या विधानाशी सहमत नाही. काँग्रेसनेसुद्धा सहमत नाही, आम्ही त्याचा तीव्र निषेध केला. भारताच्या विविधतेबद्दल उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम एकत्र करून अशी अशोभनीय टिप्पणी करण्याचा अधिकार कोणालाही नाही."

एअर इंडियाची मोठी कारवाई; 25 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं

एअर इंडियाच्या 25 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कामावर हजर न झाल्याने एअर इंडियाकडून कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे एअर इंडियाने कारवाई केल्याची दिली माहिती

Pune Crime: निवडणूक काळातही पुण्यात कोयता माजवणाऱ्यांची दहशत

निवडणूक काळातही पुण्यात कोयता माजवणाऱ्यांची दहशत सुरूच आहे. पुण्यातील मोहम्मदवाडीत कोयता घेऊन काहींनी दहशत माजवली आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत टपरी चालक धर्मेंद्र गुप्ता हा कामगार जखमी झाला आहे.

Pune Crime: गाडीची लाईट चमकवली म्हणून २० जणांच्या टोळक्याकडून २ तरुणांना बेदम मारहाण

पुण्यातील कोंढवा भागात असलेल्या महमदवाडी येथे २ तरुण कॉफी पिण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या दुचाकीची लाईट समोर असलेल्या तरुणांच्या डोळ्यावर चमकावली. यातून त्यांच्या दोन्ही गटात वादावादी सुरू झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्याच ठिकाणी असलेल्या रस्त्यावर एका गटाने समोरच्या तरुणाला त्याचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण केली. या घटनेमुळे काही वेळासाठी या परिसरात भीतीचे वातावरण होते

Pune Lok Sabha: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता सारसबाग येथे राज ठाकरेंची सभा होणार आहे. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी सभा आहे. आधी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा झाल्यानंतर उद्या पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे सभा घेणार आहेत. उद्याच्या सभेसाठी राज ठाकरे मुंबईतून पुण्याकडे रवाना झाले आहेत.

Pune Crime : 20 जणांच्या टोळक्याकडून 2 तरुणांना बेदम मारहाण

पुणे : गाडीची लाईट चमकवली म्हणून २० जणांच्या टोळक्याकडून २ तरुणांना बेदम मारहाण झाली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात हा राडा झाला. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आता समोर आला असून कोंढवा पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 10 ते 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Pune Lok Sabha : मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकरांसह अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळरावांना बजावली नोटीस

पुणे : मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर यांच्यासह अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळरावांना नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक खर्चात दुसऱ्या फेरीत तफावत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही नोटीस बजावलीये. निवडणूक खर्चाचे स्वतंत्र खाते न उघडल्याबाबत पुणे मतदारसंघातील अन्य चार उमेदवारांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

कोणाची तफावत किती?

- डॉ. अमोल कोल्हे - ११,७७,४५८ रुपये

- शिवाजीराव आढळराव पाटील - ३०,४६,७८६ रुपये

- रवींद्र धंगेकर - ११,६७,७०९ रुपये

- मुरलीधर मोहोळ - ३६,२७,५८४ रुपये

Islampur Police : साखराळेतील हाणामारीप्रकरणी आठ जणांवर इस्लामपुरात गुन्हा

इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथे मतदान केंद्रावर बनावट लोकप्रतिनिधी असल्याच्या कारणावरून दोन्ही शिवसेना समर्थकांच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीप्रकरणी आठ जणांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप पाटोळे, ओंकार देशमुख, स्वप्नील लोहार, दत्तात्रय पाटील, रामराजे पाटील, प्रशांत पाटील, संतोष पाटील आणि प्रदीप बाबर (सर्व साखराळे) अशी संशयितांची नावे आहेत. कॉन्स्टेबल सतीश आनंदा खोत (वय ३२) यांनी इस्लामपूर ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता. ७) लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील आणि खासदार धैर्यशील माने यांच्या समर्थकांत जोरदार हाणामारी झाली होती.

Static Surveillance Team : SST पथकानं कारमधून जप्त केले ४५ लाख रुपये

झारखंडमधील रामगड इथं SST पथकानं केलेल्या वाहन तपासणीदरम्यान कारमधून ४५ लाख ९० हजार रुपये जप्त करण्यात आले. जप्त केलेली रक्कम विक्रीकर पथकाच्या ताब्यात देण्यात आली आहे. विक्रीकर विभागाच्या टीमने या प्रकरणाची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली असून आयकर विभाग तपासानंतर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती SST नं दिली.

Weather Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

महाराष्ट्र राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळीने हजेरी लावलीये. तर, काही भागात गारपीटही झाली आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात आजही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्याशिवास पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय.

Lok Sabha Elections : पाचव्या टप्प्यासाठी ६९५ जण रिंगणात

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार असून, या टप्प्यात ६९५ उमेदवार रिंगणात उतरले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज देण्यात आली. देशातील ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ४९ जागांसाठी या टप्प्यात मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी १५८६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. यातील ७४९ अर्ज छाननी दरम्यान वैध ठरले होते. यातील काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर रिंगणात ६९५ जण राहिले आहेत. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ जागांसाठी मतदान होत असून, या जागांसाठी २६४ उमेदवार मैदानात उतरले आहेत.

10th Exam Result : कर्नाटकातील दहावी (एसएसएलसी) परीक्षाचा निकाल आज जाहीर होणार

बंगळूर : राज्यातील दहावी (एसएसएलसी) परीक्षा-१ चा निकाल आज (ता. ९) जाहीर केला जाईल. कर्नाटक शाळा परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थी उद्या सकाळी १०-३० नंतर https://karresults.nic.in या वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. कर्नाटकातील दहावी परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान झाली होती.

H. D. Revanna : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

बंगळूर : महिला अपहरणप्रकरणी अटक केलेल्या माजी मंत्री, धजदचे आमदार एच. डी. रेवण्णा यांना न्यायालयाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आज विशेष तपास पथकाची (एसआयटी) कोठडी संपल्यानंतर रेवण्णा यांना बंगळूर येथील १७ व्या एसीएमएम कोर्टात हजर करण्यात आले.

India Alliance : इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीचे पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार असून या टप्प्यात ६९५ उमेदवार रिंगणात उतरले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. तसेच इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार आहे. आदित्य ठाकरेंची आज उरणमध्ये सभा आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत सहकार खात्याने गुणरत्न सदावर्ते दांपत्याला दणका दिला आहे. सहकार खात्याने या पती-पत्नींचे संचालकपद रद्द केले आहे. महिला अपहरणप्रकरणी अटक केलेल्या माजी मंत्री, धजदचे आमदार एच. डी. रेवण्णा यांना न्यायालयाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीये. कर्नाटक राज्यातील दहावी (एसएसएलसी) परीक्षा-१ चा निकाल आज (ता. ९) जाहीर केला जाणार आहे. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.