Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

पुढील 72 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal

''मणिपूरमध्ये जे काही घडत आहे त्याला काँग्रेसच जबाबदार आहे''

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले की, काँग्रेसचे तुष्टीकरणाचे धोरण आहे. आज मणिपूरमध्ये जे काही घडत आहे त्याला काँग्रेसच जबाबदार आहे.

मागच्या दहा वर्षात देशातील गावे मजबूत झाले- जेपी नड्डा

पंतप्रधान मोदींची संस्कृती ही विकासाच्या राजकारणाची संस्कृती आहे. त्यांनी परिवर्तनाचं राजकारण केल्यामुळे मागच्या दहा वर्षांमध्ये गावं मजबूत झाल्याचं बघायला मिळत आहे, असं प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलं. ते पुद्दुचेरी येथे बोलत होते.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा एन. रंगास्वामींच्या भेटीला 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांची भेट घेतली.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचा रोड शो

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोनितपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजित दत्ता यांच्या प्रचारासाठी रोड शो केला.

पुण्यात सिंहगड रस्ता परिसरात रिमझिम पावसाला सुरूवात

पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात ढगांच्या गडगडाटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.

Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाला सुरूवात

पुणे शहरात आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली असून ऐनवेळी पावसाला सुरूवात झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाल.

PM Modi: पुढील २५ वर्षांचा व्हिजन माझ्याकडे तयार- नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्यांच्याकडे पुढील २५ वर्षांचा प्लॅन तयार आहे. अनेक कामं झाले आहेत, पण आणखी खूप काम करायचं आहे. कामांना गती द्यायची आहे.

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. जनतेला दिलेल्या सर्व गॅरंटी पूर्ण करणार असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

Vishal Patil Sangli: सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी; विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला

काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे विशाल पाटील यांनी सांगलीत बंडखोरी केली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उतरण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालंय.

heatwave warning issued : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची सूचना जारी, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात उन्हाचा कहर

मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी १५ एप्रिल आणि १६ एप्रिलसाठी उष्णतेच्या लाटेची सूचना जारी करण्यात आली आहे. या काळात तापमान ३६ ते ३८ डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

Mumbai News: पनवेलमधील भाजपच्या चार माजी नगरसेवकांचा ठाकरे गटात प्रवेश

पनवेलमधील भाजपच्या चार माजी नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवाय मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केलाय.

Loksabha Election 2024: काँग्रेसने मणिपूरचा कधीच आदर केला नाही; गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "जवाहरलाल नेहरूंनी आसामकडे लक्ष दिले नाही. काँग्रेसने मणिपूरचा कधीच आदर केला नव्हता. त्यांनी येथे हजारो दिवस नाकेबंदी केली. मणिपूर तीन वर्षे बंद ठेवले. इबोबी सिंग यांच्या सरकारने खोट्या चकमकी केल्या होत्या.''

Monsoon 2024: ८ जून पर्यंत मान्सून येण्याची शक्यता IMDने दिली माहिती

जून ते सप्टेंबरमध्ये पावसाळा असेल तसेच ८ जून पर्यंत मान्सून येण्याची शक्यता आहे. ८७ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव कमी होतो. अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.

Loksabha Election 2024: नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कपिल पाटील यांनी राज ठाकरेंचे मानले आभार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कपिल पाटील यांनी आभार मानले. यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या रणनीतीबद्दल ठाकरे यांनी बहुमोल सूचना केल्या. या वेळी मनसेचे आमदार राजू (प्रमोद) पाटील, अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि डी. के. म्हात्रे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेSakal

Mayawati : विरोधी पक्षांच्या जाहीरनाम्याने घाबरण्याची गरज नाही; शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची

"विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्यातील गोष्टींनी घाबरण्याची आपल्याला गरज नाही. आमच्या पक्षाने आतापर्यंत एकाही निवडणुकीत एकदाही जाहीरनामा प्रसिद्ध केला नाही. आम्ही शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व देतो", असं बसपच्या प्रमुख मायावती यांनी आपल्या भाषणात म्हटलं. त्या उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे बोलत होत्या.

Rahul Gandhi : राहुल गांधींची वायनाडमध्ये प्रचारयात्रा; म्हणाले सर्वांनी एकत्र येणं गरजेचं

राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये प्रचारयात्रेत सहभाग घेतला आहे. यावेळी ते म्हणाले, की आपण आपापसात भांडणं किंवा एकमेकांचा तिरस्कार करणं आवश्यक नाही. सर्वांनी एकत्र आल्यास आपला देश खूप पुढे जाईल. यावेळी त्यांनी वायनाडमधील स्थानिक समस्यांबाबत देखील भाष्य केलं.

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात मोठी खळबळ उडालीये. मध्य प्रदेश काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांच्या छिंदवाडा येथील घरी पोलीस पोहोचले

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात मोठी खळबळ उडालीये. मध्य प्रदेश काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांच्या छिंदवाडा येथील घरी पोलीस पोहोचले आहेत. छिंदवाडा येथील भाजप उमेदवार बंटी साहू यांच्या तक्रारीवरून पोलीस कमलनाथ यांच्या घरी पोहोचले. बंटी साहू यांनी कमलनाथ यांचे पीए आरके मिगलानी यांच्यावर आक्षेपार्ह बनावट व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप केला होता.

उमेदवारी घोषित झाल्यानंतर भावना गवळी आणि हेमंत पाटलांची भेट

मंत्री उदय सामंत आणि हेमंत पाटील हे भावना गवळी यांच्या भेटीसाठी गवळींच्या कार्यालयात दाखल झालेत. उमेदवारी घोषित झाल्यानंतर हेमंत पाटील आणि गवळी यांची पहिलीच भेट आहे. गवळींनी राजश्री पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळे आभार मानण्यासाठी भेट असल्याची हेमंत पाटील यांच्याकडून माहिती, तसेच प्रचाराची पुढील रणनीती ठरवणार आहे.

Bhiwandi Lok Sabha : भिवंडी लोकसभा : महायुतीचे उमेदवार कपिल पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कपिल पाटील यांनी आभार मानले. यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या रणनीतीबद्दल ठाकरे यांनी बहुमोल सूचना केल्या. या वेळी मनसेचे आमदार राजू (प्रमोद) पाटील, अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि डी. के. म्हात्रे आदी उपस्थित होते.

विलासराव जगताप गट विशाल पाटलांना एकमताने मदत करणार - स्वाभिमानी

सांगली : माजी आ. विलासराव जगताप गट विशाल पाटील यांना एकमताने मदत करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या बैठकीत अधिकृतपणे करण्यात आली.

Prakash Awade : आमदार प्रकाश आवाडे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत स्वतः प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. प्रकाश आवाडे यांचे बंड थंड करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाल्याच्या चर्चा सुरू आहेत.

काँग्रेस नेते आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण

पुण्याचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस नेते आबा बागुल नागपूरमध्ये फडणवीस आणि बावनकुळेंच्या भेटीला गेले आहेत. आबा बागुल यांनी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून आबा बागुल भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती.

"गेल्या 10 वर्षात जे घडलं ते फक्त ट्रेलर"

गेल्या 10 वर्षात जे घडलं ते फक्त ट्रेलर, केरळ आणि भारतासाठी अजून खूप काही करायचं आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील प्रचारसभेत म्हमाले.

सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा कट अमेरिकेत

काल दोन जणांनी केलेल्या गोळीबारानंतर अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

दरम्यान सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा कट अमेरिकेत रचला गेल्याची माहिती समोर येत आहे

'भाजपचे संकल्प पत्र युवा, महिला, शेतकरी आणि गरिबांना समर्पित'

भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा म्हणजेत संकल्प पत्र युवा, महिला, शेतकरी आणि गरिबांना समर्पित आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांचे गंभीर आरोप

श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मोठा भ्रष्ट्राचार सुरु आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Railway News: मध्य रेल्वेवर आणखी ९२ उन्हाळी विशेष ट्रेन

उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी ९२ उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे गाड्या सीएसएमटी-बनारस, गोरखपूर, मऊ, एलटीटी-समस्तीपूर, दानापूर दरम्यान या गाड्या धावणार आहेत.त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Mumbai News: शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या कार्यकर्ता संकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे गटातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात आज तुरळक पावसाची शक्यता!

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या भागात पावसाची शक्यता कायम आहे. पुढील दोन दिवसांसाठी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आयएमडीने 16 एप्रिल आणि 17 एप्रिलला उस्मानाबाद, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

10th Paper Examination : दहावीची पेपर तपासणी आजपासून

बेळगाव : दहावीच्या पेपर तपासणीला सोमवार (१५) पासून सुरूवात होणार आहे. बेळगाव शहरातील ७ तर चिक्कोडी येथील ६ केंद्रावर पेपर तपासणीचे काम होणार आहे. बेळगाव व चिक्कोडी येथील विविध केंद्रावर एक हजारहून अधिक मूल्यमापक पेपर तपासणीचे काम करणार असून दहावीच्या परीक्षा केंद्राप्रमाणेच पेपर तपासणी केंद्रांवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.

Kolhapur Lok Sabha : शक्‍तिप्रदर्शन करून माने, मंडलिक आज उमेदवारी अर्ज भरणार

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे आज शक्‍तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील नेते सहभागी होणार आहेत. यावेळी गांधी मैदान ते खानविलकर पेट्रोलपंप या मार्गावर रॅली काढण्यात येणार आहे.

Actor Salman Khan : अभिनेता सलमानच्या घरावर अज्ञातांकडून गोळीबार

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या राहत्या घरावर काल दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद केली असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

Satara Lok Sabha : निष्ठावंत शिलेदारासाठी शरद पवार आज साताऱ्यात

सातारा : राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे या निष्ठावंत शिलेदाराला खंबीर पाठबळ देण्यासाठी स्वत: शरद पवार उद्या साताऱ्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांसह महारॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.

Weather Updates : राज्यात पुढील 72 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, 'हवामान'चा अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 72 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे या निष्ठावंत शिलेदाराला खंबीर पाठबळ देण्यासाठी स्वत: शरद पवार आज साताऱ्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मविआकडून माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास समान नागरी कायदा लागू करण्याचे आणि ‘एक देश, एक निवडणूक’ प्रणाली अंमलात आणण्याचे आश्‍वासन भाजपने देशवासीयांना दिले. सांगलीत आज होणार शिवसेनेचा मेळावा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ईशान्य दिल्लीतून युवा नेते कन्हैया कुमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अभिनेता सलमान खान याच्या राहत्या घरावर काल दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद केलीये. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com