Latest Marathi News Update: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर ...

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल (गुरुवार) संध्याकाळी दहिसर येथे गोळीबार करण्यात आला.
Marathi News LIVE Updates
Marathi News LIVE UpdateseSakal

पुण्यातील ससून रुग्णालयात लागली आग

महाराष्ट्र पुण्यातील ससून रुग्णालयात आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी हजर आहे.

 देवेंद्र फडणवीस यांना लोकशाही आवडत नाही - रोहित पवार


भाजपच्या कार्यकर्त्यानी लोकशाही विरोधात आंदोलन करणे अपेक्षीत होते. पण त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस यांना लोकशाही आवडत नाही.निखिल वागळेंनी आमचा देखील विरोध केला आहे. पोलीसांना विनंती करु होम मिनिस्टरचे एव्हढे ऐकू नका. गुडांची परेड काढली पण लगेच दुसऱ्या दिवशी गुडांनी रील टाकले. हे लोकांचे सरकार नाही गुडांचे सरकार आहे. पार्थ पवारांनी गुंड गजा मारणे ला भेटणाऐवजी शेतकऱ्यांना भेटावे, गरिबांना भेटावे, बेरोजगारांना भेटावे, असे रोहीत पवार म्हणाले. 

जम्मू आणि काश्मीर संबंधीची तीन विधेयकं संसदेत मंजूर 

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची राज ठाकरेंची मागणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल (गुरुवार) संध्याकाळी दहिसर येथे गोळीबार करण्यात आला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुण्यात निर्भय बनो सभेचे कार्यकर्ते आक्रमक

पुण्यात 'निर्भय बनो' सभेला भाजपने कडाडून विरोध केला आहे. भाजप आणि नर्भय बनो सभेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

सार्वजनिक परीक्षा विधेयक राज्यसभेत सादर

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सार्वजनिक परीक्षा विधेयक 2024 राज्यसभेत सादर केलं आहे. परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे.

लोकसभेच्या कँटिनमध्ये पंतप्रधानांचं खासदारांसोबत जेवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसोबत लोकसभेच्या कँटिनमध्ये दुपारचं जेवण केलं. यावेळी त्यांनी खासदारांसोबत विविध विषयांवर गप्पा मारल्या.

ठाकरे गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला देखील माणस मिळणार नाहीत - दीपेश म्हात्रे

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोक आपली जागा शोधण्याच काम करत आहेत. त्यांना नवीन कार्यकर्ते, लोक मिळत नाहीत. ते शोधण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाला येथे यावे लागते हीच मोठी शोकांतिका आहे. त्या गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला देखील माणस मिळणार नाहीत असे सांगत त्यांनी युवानेते आदित्य यांना प्रतिउत्तर देऊ केले आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळक यांंच्या आंतयात्रेला सुरुवात झाली आहे.

Kalyan News : गणपत गायकवाडांच्या पाठीशी भाजप ठाम; मंजूर केला ठराव

गुरुवारी रात्री नेवाळीत भाजप कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील मलंगगड मंडळाची गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत ठराव घेऊन भाजपने आमदार गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. या बैठकीचे फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाले आहेत.

 Thane News: रेतीबंदर घाटाजवळ कंटेनर कॅबिनला आग 

कळव्यातील पारसिक रेतीबंदर घाटाजवळ कंटेनरकॅबीन लागलेल्या आगीत 6 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार(ता 9)ला मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.

Ram Mandir: अयोध्येत राम दर्शनासाठी 'आस्था' विशेष ट्रेन रवाना

आस्था स्पेशल ट्रेन' शुक्रवारी जालंधरहून रवाना झाली. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामाला नमस्कार करण्यासाठी भाविक अयोध्या धामकडे निघाले आहेत.

Nana Patole: महाराष्ट्रात गुंडाराज, राष्ट्रपती राजवट लागू करा - नाना पटोले

महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत, गुडांना कसलीच भिती राहिलेली नाही. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून हे ‘गुंडाराज’ बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Mumbai New : थोड्याच वेळात घोसाळकरांच्या पार्थीवावर होणार अंत्यसंस्कार 


थोड्याच वेळात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळक यांंच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डींनी घेतली PM मोदींची भेट  

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांना भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती भेट दिली.

नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि स्वामिनाथन यांना भारतरत्न दिल्याबद्दल सोनिया गांधी काय म्हणाल्या?

कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्या माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेवर काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे. याबाबत सोनिया गांधींना विचारले असता त्यांनी या निर्णयाचे स्वागत असल्याचे सांगितले.

Uddhav Thackeray: घोसाळकर कुटुंबीयांच्या भेटीला उद्धव ठाकरे जाणार 

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल (गुरूवारी) मुंबईमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत.

Morris : मॉरिसचं पार्थिव चर्च परिसरात दफन करण्यास विरोध

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मॉरिस नोरोन्हाने स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. त्याचं पार्थिव चर्चच्या परिसरात दफन करण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे.

Bharat Ratna : आणखी तीन जणांना भारतरत्न जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठी घोषणा केली आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव, डॉ. एम. एस. स्वामीनाथन आणि माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह या तीन जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

Morris : मॉरिसच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आता मॉरिस नोरोन्हा याच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुडाळकर यांनी निर्देश दिले आहेत.

Eknath Shinde : मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त शिंदेंच्या भेटीला

मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला दाखल झाले आहेत. शिंदेंच्या ठाण्यातील घरी दोघांची भेट होत आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

 Nashik Latest News : नाशिक शहरात आजपासून पुन्हा मनाई आदेश लागू  

नाशिक : नाशिक शहरात आजपासून पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

- ०९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारीपर्यंत १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू

- मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन अथवा सभा घेता येणार नाही

- स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, शस्त्र जमा करण्यास अथवा विक्री करण्यास मनाई

- मनाई कालावधीत पुतळ्याचे दहन करण्यास देखील सक्त मनाई

- ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक

- विना परवानगी मोर्चे, आंदोलनांना मनाई

- मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे.

- विविध राजकीय पक्षांत पडलेली फूट आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर येथे मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने

भाजपकडून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जात आह. तर विरोधी पक्षांचे कार्यकर्ते राज्यात सुरु असलेल्या गोळीबाराच्या घटनांविरोधात आक्रमक झाले आहेत. यादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात संभाजीनगर येथे भाजपचं आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबीसी समाजाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सर्वत्र पाहायला मिळत आहेत. त्यांच्याविरोधात आज संभाजीनगर येथे भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

Telangana Legislative Assembly : बीआरएस नेत्यांची ऑटोमधून तेलंगणा विधानसभेत एंट्री!

ऑटो चालकांना पाठिंबा देण्यासाठी बीआरएस नेते ऑटोमधून तेलंगणा विधानसभेत पोहोचले. याचा व्हिडीओ एएनआयने पोस्ट केला आहे.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला सातारा दौऱ्यावर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी माहिती देताना सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला साताऱ्यात विविध कार्यक्रम घेऊन येत आहेत. आम्ही पंतप्रधान मोदींना नव्याने बांधलेल्या विमानतळाचे उद्घाटन करण्याची विनंती केली आहे, परंतु हे ठरवण्याचा अधिकार पंतप्रधान कार्यालयाचा आहे."

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव  बोरिवली येथे आणण्यात आले

शिवसेना (UBT) नेते अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव मुंबईतील बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. काल मुंबईतील दहिसर परिसरात गोळीबार झाला होता.

परिहार चौक ते बाणेर फाटा परिसरात वाहतूक कोंडी

परिहार चौक ते बाणेर फाटा परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्याच्या खोदकामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

हल्द्वानी इथ घडलेल्या घटनेत आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू, तर 100 पेक्षा अधिक पोलीस जखमी

हल्द्वानी इथं घडलेल्या घटनेत आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 100 पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले आहेत. अजूनही शहरातील इंटरनेट सेवा बंदच आहे. शहरातील सर्व शाळा आणि कॉलेजला प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृह मंत्र्यांनी पोलिसांकडून घेतली माहिती

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृह मंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. नेमकं प्रकरण कोणत्या वादातून घडलं याची माहिती घेतली घेतली असल्याची माहिती आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणी चर्चा केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचीही माहिती आहे. आठवड्याभरात दुसरे गोळीबार प्रकरण समोर आल्याने विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

Maharashtra Government : बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजेनंतरच भरवण्याची राज्य सरकारची सूचना

यापुढे बालवाडी ते चौथी पर्यंतची (प्री प्रायमरी ते चौथी) शाळा सकाळी 9 वाजता अथवा 9 वाजेनंतर भरवण्याची सूचना राज्य सरकारने सर्व शाळांना केली आहे. या संदर्भातील परिपत्रक गुरुवारी जारी करण्यात आले. सरलेल्या डिसेंबर महिन्यात राज्यपाल रमेश बैस यांनी सकाळच्या सत्रांतील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याची सूचना केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

रंकाळा परताळाप्रश्नी महापालिकेसोबत आठ दिवसांत बैठक - जिल्हाधिकारी

कोल्हापूर : रंकाळ्याचे फुफ्फुस असणाऱ्या परताळ्यात प्लॉटसाठी महापालिकेने कोणतीही परवानगी दिली, तर तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा रंकाळा संवर्धन संरक्षण समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिला. रंकाळा परताळ्याचे महत्त्व पाहता महापालिकेसोबत आठ दिवसांत बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी समितीला दिले.

Mumbai Police : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर 'प्राप्तिकर'चे छापे

मुंबई : मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे घातले. करचुकवेगिरी केल्याप्रकरणी अंधेरीतील त्यांच्या निवासस्थानाची अधिकाऱ्यांनी झडती घेतली. प्रदीप शर्मा यांना याआधी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. माजी खासदार रमेश दुबे यांच्याशी संबंधित तपासाचा भाग म्हणून ही कारवाई केली. दुबे यांच्यावर करचोरी आणि बेनामी संपत्ती जमा केल्याचा संशय आहे.

Abhishek Ghosalkar Firing Case : अभिषेक घोसाळकरांचं पार्थिव घरी आणलं, आनंद नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

अभिषेक घोसाळकरांचा मृतदेह आनंद नगर, जरीमरी गार्डन, दहिसर ईस्ट परिसरातील त्यांच्या जुन्या घरी आणण्यात आलाय. या ठिकाणी कुटुंबीय दर्शन घेतील. त्यानंतर दहाच्या सुमारास त्यांचं पार्थिव विनोद घोसाळकर यांच्या घरी सर्वांना अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. सध्या आनंद नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

Budget Session :  केंद्रीय गृहराज्यमंत्री राज्यसभेत आज जम्मू-काश्मीर कायदे (दुरुस्ती) विधेयक मांडणार

अर्थसंकल्पीय अधिवेशन : केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आज जम्मू आणि काश्मीर स्थानिक संस्था कायदे (दुरुस्ती) विधेयक राज्यसभेत मांडणार आहेत.

Haldwani Violence : हल्दवानीत मोठा हिंसाचार, गोळीबारात 6 जणांचा मृत्यू

हल्दवानी महापालिकेने गुरुवारी शहरात बांधलेला मदरसा बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त केला. येथे नमाज पठणासाठी इमारत बांधली जात होती, तीही बुलडोझरनं पाडली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांंनी महापालिकेच्या पथकावर हल्ला केला. बदमाशांनी बांभूळपुरा पोलीस ठाण्याला चारही बाजूंनी घेरले आणि दगडफेक केली. अनेक वाहने जाळली. वनभूलपुरामध्ये डीएम यांनी संचारबंदी लागू केली आहे. दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेशही डीएमकडून देण्यात आले आहेत. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक पोलिस जखमी झालेत.

पाकिस्तानच्या निवडणुकीत इम्रानसमर्थक पुढे, आज सर्व निकालाची शक्यता

Latest Marathi News Live Update : संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील २००४ ते २०१४ ही १० वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासात काळ्या अक्षरांत लिहिली जातील, अशी टीका केंद्रातील मोदी सरकारने लोकसभेत केलीये. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल (गुरुवार) संध्याकाळी दहिसर येथे गोळीबार करण्यात आला. पैशाच्या वादातून मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीनं हा हल्ला केलाय. या घटनेचा पोलिस अधिक तपास करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानात असेंब्ली आणि प्रांतीय निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणी सुरू झाली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान समर्थक ८२ ठिकाणी आघाडीवर असल्याचा ट्रेंड दिसत आहे. आज सर्व निकाल येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांच्या जोर बैठका सुरु आहेत. तसेच देशभरात वातावरणातही बदल जाणवत आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com