News Update : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून ७ तास चौकशी

आज मराठा आरक्षण आणि अयोध्येतील राम मंदिराबाबत अपडेट असतील.
Marathi News LIVE Updates
Marathi News LIVE UpdateseSakal
Updated on

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून ७ तास चौकशी

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून ७ तास चौकशी करण्यात आली. ईडीनं सोरेन यांच्या घरुन गेल्यानंतर CM सोरेन यांनी घराबाहेर जमलेल्या समर्थकांना संबोधित केलं. ईडीकडून माझ्याविरोधात कट-कारस्थान रचलं जात आहे. पण काळजी करु नका यांच्या कारस्थानांना भारी पडत मी राज्याचा विकास करत राहणार आहे, असं त्यांनी म्हटलं.

कुणबी नोंदी न सापडलेल्या गावात फेरतपासणी होणार

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. ज्या गावांमध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत किंवा कमी सापडलेल्या आहेत. अशा गावांमध्ये पुन्हा नोंदींची फेरतपासणी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिले आहेत.

CM Shinde : मराठा आरक्षणासाठी २४ तास कॉल सेंटर सुरु ठेवण्याचे आदेश

मराठा आरक्षणाच्या सर्व्हेक्षणासाठी २४ तास कॉल सेंटर सुरु ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी असे सव्वा लाख पेक्षा जास्त प्रगणक आठ दिवसात हे काम पूर्ण करणार आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक बैठक बोलावली होती. २३ तारखेपासून मराठा समाजाचं सर्व्हेक्षण होणार असल्याची माहिती मिळतेय.

Ayodhya ram mandir : अयोध्येत शरयू घाटावर संध्या आरतीला प्रारंभ

उत्तर प्रदेशात सध्या उत्सवाचं वातावरण आहे. अयोध्येत शरयू घाटावर संध्या आरतीला सुरुवात झालीय.

Latest Marathi News Live Update: अयोध्येतील सुरक्षेत केली वाढ 

रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या शहरातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

Latest Marathi News Live Update: रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना मिळालं निमंत्रण

उद्धव ठाकरेने अखेर अयोध्येतील रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण मिळालं आहे.

Latest Marathi News Live Update : केसी वेणुगोपाल यांचे आसामच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर आसाममध्ये हल्ला झाल्यावर काँग्रेस सचिव केसी वेणुगोपाल यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदींची रामनाथस्वामींच्या मंदिरात प्रार्थना 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी रामेश्वरम येथील श्री अरुलमिगू रमनाथस्वामी मंदिरामध्ये प्रार्थना केली.

Prime Minister Narendra Modi: 'श्री रामायण परयाणा' कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती; पाहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूतील रामेश्वरम येथे आयोजित 'श्री रामायण परयाणा' कार्यक्रमाचा आनंद घेतला. यासंदर्भातील व्हिडिओ एएनआय वृत्त संस्थेने शेअर केला आहे.

PM Modi: पंतप्रधान मोदी यांची रामेश्वरममधील रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना; पाहा व्हिडिओ

पंतप्रधान मोदी तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी रामेश्वरम येतील श्री अरुलमिगु रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.

Mango News: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याची पहिली पेटी दाखल

यंदाच्या मोसमातील हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबई वाशी येथील मुंबई कृषिउत्पन्न बाजार समितीत दाखल झाली असून आंबा प्रेमींसाठी गोड बातमी घेऊन आली आहे.

Maratha Reservation: तुम्हाला संपवायचं असत तर चर्चाच केली नसती -संजय सिरसाट

तुम्हाला संपवायचं असत तर चर्चाच केली नसती असे शिंदे गटाचे आमदार मनोज जरांगे पाटील यांना म्हणाले.

Ram Mandir: राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बाजारात कंदील आणि दिव्यांना वाढती मागणी

अयोध्येत होऊ घातलेल्या श्री राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्ताने देश भर आनंदाचे वातावरण असताना नवी मुंबईतील वाशी बाजारपेठही कुठे मागे राहिलेली नाहीए. २२ जानेवारीच्या दिवसाची राम भक्त आतुरतेने वाट बघत असतानाच वाशी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी रामभक्तांच्या मागणीनुसार विविध प्रकारचे श्री राम लिहिलेले कपडे, झेंडे, टोप्या, पट्टे, बिल्ले, इ. साहित्य खरेदीसाठी उपलब्ध करून दिले आहे.

२२ जानेवारी रोजी दिल्लीमध्येही अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर

गुजरातनंतर दिल्लीमघ्ये देखील २२ जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उपराज्यपाल व्ही के सक्सेना याबाबत घोषणा केली आहे.

Jharkhand CM Hemant Soren: मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घराची सुरक्षा वाढवली

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी सोरेन यांची सक्तवसुली संचालनालय चौकशी करत आहे.

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तमिळनाडूच्या रामेश्वरममध्ये रोड शो; पाहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या रामेश्वरम येथे रोड शो केला. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक त्यांना पाहण्यासाठी जमले होते.

Ayodhya Ram Temple: गुजरातमध्ये २२ जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर

गुजरातमध्ये २२ जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पणाच्या निमित्त अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आलीये. सरकारी कार्यालये आणि सर्व शैक्षणिक संस्था अडीच वाजेपर्यंत बंद असतील.

Ram Kadam: उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात गेल्यास गोमूत्र शिपडून शुद्धीकरण करावे लागेल- राम कदम

उद्धव ठाकरे यांच्या काळाराम मंदिराच्या दर्शनाला भाजप नेते राम कदम यांनी विरोध केलाय. मांसाहारी बोलणाऱ्या सोबत बसणाऱ्या लोकांनी काळाराम मंदिरात आल्यास सकल हिंदू समाजाला गोमूत्र शिपडून शुद्धीकरण करावे लागेल, असं ते म्हणाले आहेत.

Ram Mandir: रामाच्या पूजेसाठी चाफ्याला मागणी वाढली; ३५० रुपये शेकडा भाव

अयोध्येत २२ तारखेला रामाची प्राणप्रतिष्ठापना होत असल्याने आगमनाची तयारी सगळीकडे सुरु आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ करून मंदिरात फुलाची सजावट करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे फ़ुलणंही मोठी मागणी येत आहे. वसई तालुका हा फुलांचा तालुका म्हणून ओळखला जातो. इथे होणाऱ्या सोनचाफ्याला (पिवळा) मोठी मागणी असते. यावेळी हि रामाच्या पूजेसाठी चाफ्याला मागणी वाढली असली तरी आवक कमी असल्याने चाफा ३५० रुपये शेकड्याने जात आहे.

Congress On Ram Mandir: भाजप जिंकण्यासाठी राममंदिराचा आश्रय घेत आहे; काँग्रेसच्या प्रदेश प्रभारींची टीका

देशात भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने सांप्रदायिकता, धार्मिक धृवीकरणाचे राजकारण खेळले जात आहे. त्यांना निवडणुका जिंकण्यासाठीही राममंदिराचा आश्रय घ्यावा लागत आहे. काॅंग्रेस मात्र सामाजिक सद् भाव निर्माण करण्यासाठी पुर्वीही झटत होता आणि आजही झटत आहे. त्यामुळे आमची लढाई भाजपच्या सांप्रदायिकता, धार्मिक धृवीकरणाच्या राजकारणाविरोधात आहे. ही लढाई आणि आगामी निवडणुकाही महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला

Mumbai Fire : मुंबईमध्ये पुन्हा लागली आग; अग्निशमन दलाचे पथक पोहोचले  घटनास्थळी 

मुंबईच्या मालाड पूर्व येथील प्रताप नगरमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. ही आग नक्की कशी लागली याची माहिती अजून मिळालेली नाही. तर आगीत कोणी अडकल्याची माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे

Ram Mandir : अध्यात्मिक गुरु मोरारी यांनी दिली राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी

अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. राम मंदिर उभ करण्यासाठी देशभरातून ५,५०० कोटी पेक्षा जास्त पैसे देणगी स्वरूपात गोळा झाले आहेत. अध्यात्मिक गुरु मोरारी यांनी सर्वाधिक देणगी दिली आहे.

Mumbai Crime: "रामभक्त आहोत, दर्शन घडवून आणतो", महिलेला गंडा घालून लाखोंचे दागिने पळवले

आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो, असे सांगत एका ज्येष्ठ महिलेला तिघा भामट्यांनी २ लाख ६६ हजारांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता

मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांना करणार आहेत.

Devendra Fadnavis: राजकीय परिवारातील लोक राजकारणात आले तर हरकत नाही फक्त कर्तृत्व दाखवाव - देवेंद्र फडणवीस

रामराज्याची संकल्पना म्हणजे दहशतवादमुक्त राज्य आहे. गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम मोदींनी घेतलाय, 25 कोटींच्या वर लोक गरिबी रेषेच्या वर आले. राजकीय परिवाराची लोक जर राजकारणात आले तर त्यात कोणतेही हरकत नाही, फक्त त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवाव. ज्यांच्या मनामध्ये राम आहे त्यांच्याच हातून अशी काम घडतात.

हे राम कार्य आहे त्यामुळे यात भ्रष्टाचार चालणार नाही, मोदींनी सांगितलंय एक रुपया पाठवेल तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत एक रुपयाच पोहचेल. ज्या प्रकारे रामाने हनुमानाला त्याच्या ताकदीची जाणीव करून दिली तशीच मोदीजींनी देखील भारताला त्यांच्या ताकदीची जाणीव करून दिली.

देव देश धर्मासाठी आपण लढतोय,  छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन मोदीजी लढत आहेत. रामराज्यात प्रत्येक व्यक्तीला जाती पातीच्या लोकांना त्यात एक स्थान असेल. पुढच्या काळात भारताची अर्थव्यवस्था जगात तीन नंबर येणार आहे असं मोदीजींनी सांगितलं आहे.

शिंदे समितीत आणखी दोन निवृत्त IAS अधिकाऱ्यांची नेमणूक

शिंदे समितीत आणखी दोन निवृत्त IAS अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षित वेळेत अहवाल येत नसल्याने शिंदे समितीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दोन निवृत्त अधिकारी यांना विभागून जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवालाचा पाठपुरावा केला जाणार आहे.

७० टक्के कुणबी नोंदी आतापर्यंत सापडल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकित शिंदे समिती आतापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल मांडणार आहे. काही ठिकाणी अद्याप नोंदी सापडत नसल्याचेही आले समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी संपली

राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी संपली. पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे.

Manoj Jarange: जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असल्याने सरकारमधील मंत्री नाराज

जरांगे पाटलांशी चर्चा सुरू असताना जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम असल्याने सरकारमधील मंत्री नाराज आहेत.

Manoj Jarange: मनोज जरांगेंशी यापुढे चर्चा न करण्यावर सरकारमध्ये एकमत झाल्याची चर्चा

मनोज जरांगेंशी यापुढे चर्चा न करण्यावर सरकारमध्ये एकमत झाल्याची चर्चा आहे. एबीपी माझाने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

Manoj Jarange: सरकारने मनोज जरांगेंशी तातडीने चर्चा करा - संजय राऊत

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्या सरकराने तातडीने मनोड जरांगे यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी केली आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगे  हजारो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची मागणी घेऊन हजारो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज सकाळपासूनच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा बांधव जमायला सुरूवात झाली होती. जरांगे २६ जानेवारी रोजी मुंबईत आणरण उपोषणाला सुरूवात करणार आहेत.

Jharkhand CM Hemant Soren : झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची आज होणार ईडी चौकशी

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी करणार, मुख्यमंत्री आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांचे म्हणणे नोंदवणार आहेत

अयोध्या राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याच्या दिवशी रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी

अयोध्या राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीजने 22 जानेवारी रोजी देशभरातील त्यांच्या सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

'बाबर रोड' पाटीवर लावलं 'अयोध्या मार्ग' असं स्टिकर

दिल्लीत हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या नावाच्या पाटीवर अयोध्या मार्ग अशा आशयाचे स्टिकर लावल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील बाबर रोड नावाच्या बोर्डवर हे स्टिकर लावण्यात आले आहेत.

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी चंदीघडमध्ये बनतायत 150 क्विंटल लाडू

अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यापूर्वी चंदीगडमध्ये 150 क्विंटल लाडू बनवण्याची तयारी सुरू आहे.

Share Market : आज शेअर बाजार सुरू; सोमवारी राहणार बंद

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमीत्त सोमवार, 22 जानेवारीला शेअर बाजार बंद राहणार आहे. मात्र आज आज (शनिवार, 20 जानेवारी) बाजार खुला राहील अशी माहिती BSEकडून देण्यात आली आहे.

Israeli Army : इस्त्रायली सैन्याचा अल-अमल हॉस्पिटलवर गोळीबार

जेरुसलेम : इस्त्रायली सैन्याने दक्षिण गाझामधील सर्वात मोठे शहर खान युनिस येथील अल-अमल हॉस्पिटलवर ड्रोन गोळीबार केला. इस्रायलच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी हजारो लोक या रुग्णालयात आश्रय घेत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात अनेक लोक ठार आणि जखमी झाल्याची माहिती आहे. गाझामधील इतर अनेक भागातही इस्रायली हल्ले आणि लढाईची नोंद झाली आहे.

Maratha Reservation : शेवटची लढाई आरपारची, आता घरात राहू नका; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

मराठा समाजाने सरकारला सात महिने वेळा दिला. मात्र, अद्यापही आरक्षण मिळाले नाही. आता शेवटची लढाई आरपारची आहे, त्यामुळे कोणी घरात राहू नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी समाजाला केले आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

शेतकरी संघासाठी उद्या मतदान, २८ उमेदवार निवडणूक रिंगणात

कोल्हापूर : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या शेतकरी सहकारी संघासाठी उद्या, रविवारी (ता. २१) मतदान होत आहे. जिल्ह्यातील ५९ केंद्रांवर संघाच्या १९ पैकी १७ जागांसाठी मतदान होणार आहे. २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

पुढील चार दिवसांत उत्तर भारतात दाट धुके आणि तीव्र थंडीची शक्यता - IMD

सध्या देशातील तापमानात घट झाली असून मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, कोकणात गारठा वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने असाही अंदाज वर्तवलाय की, पुढील चार दिवसांत उत्तर भारतात दाट धुके आणि तीव्र थंडीची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

Sharad Mohol Murder Case : पुणे पोलिसांचा जबर हिसका, शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची शहरातून काढली धिंड

पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड विठ्ठल शेलाराची पोलिसांनी धिंड काढली. गुन्हेगारीतील मुळशी पॅटर्नला पुणे पोलिसांनी जबर हिसका दाखवला. गुंड विठ्ठल शेलारची त्याच्याच भागात गुन्हे शाखेने धिंड काढली आहे. गुंड विठ्ठल शेलार शरद मोहोळ हत्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. शेलारवर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Ghaziabad Railway Station : प्रजासत्ताक दिन-राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर सुरक्षा 

उत्तर प्रदेश : प्रजासत्ताक दिन आणि राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' समारंभाच्या आधी गाझियाबाद रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी श्वान पथकासह रेल्वे स्थानकावर सुरक्षा तपासणी केली.

लालूप्रसाद, तेजस्वी यांना 'ईडी'चे समन्स

पाटणा : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तसेच उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना नव्याने समन्स बजावले आहेत. नोकरीसाठी -जमीन गैरव्यवहारप्रकरणात ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या २९ जानेवारी रोजी लालूंना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील आज अंतरवाली सराटीतून मुंबईला रवाना होणार

Latest Marathi News Live Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण, शासनाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेअंती दोनवेळा मुदत दिल्यानंतरही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्याने मनोज जरांगे पाटील हे आज शनिवारी (ता. २०) अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथून पुढील आंदोलनासाठी मुंबईला रवाना होत आहेत. त्यांच्यासोबत लाखो मराठा समाजबांधव पदयात्रेत सहभागी होणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर २६ जानेवारीला जरांगे उपोषण सुरू करणार आहेत. यापूर्वी जरांगे यांनी 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. राज्यात गारठा कायम असून थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे हवेतील गारठा जास्त वाढला आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ ही संकल्पना केवळ लोकशाहीविरोधीच नाही तर ती राज्यघटनेत संघराज्य पद्धतीने दिलेल्या हमीच्या विरोधातही असल्याचे स्पष्ट करीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. अयोध्येत येत्या सोमवारी (ता. 22) होत असलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभर जोरदार तयारी सुरू असतानाच केंद्र सरकारने देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केली. तसेच महाराष्ट्र सरकारनेही 22 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com