Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महिला बचत गटांच्या महामेळाव्यासाठी यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहेत.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateSakal

मोदींच्या उमेदवारीची उद्या घोषणा होण्याची शक्यता

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक उद्या दिल्लीत होणार असून यात शंभरावर उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नावे राहण्याची शक्यता आहे.

झारखंडमध्ये रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू

झारखंड येथील जमतारा येथे रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती येत आहे. काही वेळापूर्वी १२ जणांचा मृत्यू झाल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगितलं जात होतं. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

आमच्या सरकारने ७५ टक्के घरांमध्ये पाणी पोहोचवलं

पूर्वी गावात कुठेतरी एखादा पाण्याचा नळ असायचा. पण आता ७५ टक्के जनतेच्या घरांमध्ये नळाचं पाणी पोहोचवण्यात आम्हाला यश आलं आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीकास्र सोडलं.

नरेंद्र मोदींकडून शरद पवारांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. २०१४ पूर्वी देशाचे कृषीमंत्री महाराष्ट्रातले होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नसल्याचं मोदी म्हणाले.

मोदींच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये कार्यक्रमाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये यवतमाळ येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल!

मोदींच्या हस्ते विकासकामांचे उदघाटन होणार असून त्यासाठी मोदी यवतमाळ दौऱ्यावर आल्याचे सांगण्यात येत आहे. थोड्याच वेळात मोदी यवतमाळला पोहचणार आहेत.

हिमाचल प्रदेशच्या १५ आमदारांच्या निलंबनावर विरोधी पक्षनेत्याची मोठी प्रतिक्रिया

हिमालचल प्रदेश विधानसभेतील १५ आमदारांचे निलंबन करण्यात आले. यावर विरोधी पक्ष नेते जयराम ठाकूर म्हणाले की, बीजेपी जवळ २५ आमदार आहे. राज्यसभेमध्ये हा आकडा वाढून ३४ वर गेली आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय पुतळ्याचे अनावरण

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज यवतमाळ येथे असून त्यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून या कार्यक्रमाची चर्चा होती.

Sandeshkhali: संदेशखाली प्रकरणात सहा सदस्यीय टीम स्थापन करण्यास कोर्टाची परवानगी

कोलकाता हायकोर्टाने संदेशखाली प्रकरणात सहा सदस्यीय टीम स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. निवृत्त पाटना हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ही टीम संदेशखाली येथे जाऊन तपास करणार आहे.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी लवकरच यवतमाळमध्ये दाखल होणार; महिलांची प्रचंड गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच यवतमाळमध्ये दाखल होणार आहे. याठिकाणी महिला बचत गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मोदी संबोधित करतील. यावेळी महिलांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय.

Microsoft co-founder Bill Gates: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी घेतली ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांची भेट

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आज ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भुवनेश्वर येथे भेट घेतली

Congress: उत्तर प्रदेशात पोलीस भरती प्रकरणी काँग्रेसचे आंदोलन

उत्तर प्रदेशमध्ये पोलीस भरती प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेसने लखनऊमध्ये आंदोलन केले आहे.

Maharashtra Weather: राज्यात दोन मार्चपर्यंत गारपीठ होण्याचा अंदाज

राज्यात अनेक ठिकाणी गारपीठ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यात दोन मार्चपर्यंत गारपीठ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नाशिक - शेतकरी लाँग मार्च आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठक सुरु

नाशिक - लाँग मार्च आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीला सुरुवात. शेतकरी नेते आणि कोअर कमिटीच्या उपस्थित बैठक सुरु. बैठकीत काय निर्णय होतो याकडं सर्वांचं लक्ष. आपल्या विविध मागण्यांसाठी सुरगाणा ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांनी लाँग मार्च काढला आहे. गेल्या दोन दिवसापासून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला. जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. काल मुंबईत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत.

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, मुंबईत काढला मोर्चा

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, आज धनगर समाजाचा मुंबईत मोर्चा. आझाद मैदानाच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी मध्येच अडवला. पी डिमेलो रोडवर पोलिसांनी अडवला मोर्चा.

काँग्रेसचे संकटमोचक हिमाचलकडं रवाना; शिवकुमार करणार का डॅमेज कन्ट्रोल?

महादेव 'ॲप'प्रकरणी ईडीचं मुंबईसह चार ठिकाणी धाडसत्र

महादेव ॲप प्रकरणी ईडीच धाडसत्र. मुंबई, दिल्ली, कोलकत्ता आणि छत्तीसगढ इथं ईडीच्या धाडी. एकूण १५ ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे. महाराष्ट्र सायबर विभागानं दाखल केलेल्या गुन्हा प्रकरणी ईडीनं ईसीआर दाखल केला आहे.

Himachal Pradesh : काँग्रेस आमदारानं सांगितलं आम्ही भाजपसोबत!

कर भरला नाही! नितेश राणेंची पुण्यातील मालमत्ता सील

पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेची कारवाई. डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्यानं पालिकेनं केलं सील. मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं केली कारवाई. तब्बल तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची होती थकबाकी. पुण्यात अनेकांनी थकवला आहे मालमत्ता कर. सध्या महापालिकेकडून कर वसुली केली जात आहे.

'फसवणूक करणाऱ्या सरकारला धडा शिकवणार'; हलबा समाज आक्रमक

nagpur news : वर्षानुवर्षे रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या हलबा समाजाला आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही. गोंड गोवारी समाजाला हक्कासाठी ११४ बळी द्यावे लागतात, त्यानंतरही न्याय मिळत नाही येणाऱ्या निवडणुकीत समाजाने संघटित शक्ती उभारून विविध समाजांची फसगत करणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून देऊल, असा निर्धार संविधान चौकात पुकारलेल्या आंदोलनात करण्यात आला.

Express Way: मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे महामार्ग सकाळी ११ ते दुपारी २ वाजे पर्यंत रेल्वे कॉरीडोरचे काम करण्यासाठी पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. यामुळे कळंबोली येथे मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे.

मोदींचा दौरा आमच्यासाठी आनंदाचा दिवस: संजय राठोड 

मोदींचा दौरा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. संधी मिळाली तर शेतकरी आत्महत्येविषयी नक्की बोलेन असे मंत्री संजय राठोड म्हणाले.

मनसे - भाजप युतीचा अद्याप कोणताही फाॅर्म्युला नाही

मनसे - भाजप युतीचा अद्याप कोणताही फाॅर्म्युला ठरला नसल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्याबरोबर चर्चा प्रतिसाद सकारात्मक मात्र कोणाताही फाॅर्म्युला अद्याप ठरला नसल्याचे समोर येत आहे.

PM Modi: तामिळनाडू प्रगतीचा नवा अध्याय लिहित आहे - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यात 17,300 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. तामिळनाडू प्रगतीचा नवा अध्याय लिहित आहे  असे यावेळी ते म्हणाले.

मेरी झासी नहीं दुंगी - भावना गवळी 

यवतमाळची जागा ही मिच लढवणार, मेरी झासी नहीं दुंगी असे भावना गवळी म्हणाल्या 

तुतारी आणि मशाल चिन्ह घराघरात पोहचलं आहे - संजय राऊत 

तुतारी आणि मशाल चिन्ह घराघरात पोहचलं आहे असे खासदार संजय राऊत म्हणाले.

मराठयांचे नेते जातीचे आहेत की नेत्यांचे ? - मनोज जरांगे पाटील 

मराठ्यांचे नेते मराठा जातीचे आहेत की आपल्या जातीचे आहेत? असा सवाल मनोज जरांगे पाटील  यांनी मराठा नेत्यांना विचारला

पुण्यात मित्राच्या मदतीने कट रचून गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक

पुण्यात मित्राच्या मदतीने कट रचून गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शिरवळ येथे पाठलाग करून 3 आरोपींना अटक केली आहे. चिक्क्या लोखंडे, सूरज शिरसागर, तो तोकीर शेख असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून युवकाला करण्यात गंभीर मारहाण आली आहे.मारहानीनंतर आरोपी गेले अनेक दिवस फरार होते. मोबाईल वरून गुन्ह्याचा छडा लावत पुणे पोलीसांकडून आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात; बडगुजर यांचा गौप्यस्फोट

खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे मिलिंद नार्वेकरांना भेटत आहेत. गोडसेंकडून नार्वेकरांमार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न सुरू आहे, असा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला आहे.

उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्त वहिनीला मुलाखत देणारा आणि सोशल मीडियाद्वारे त्याचा प्रसार करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जीवे मारण्याची धमकी देणे तसेच दोन समाजात त्वेष निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. योगेश सावंत नावाच्या फेसबूक अकाऊंटच्या वापरकर्त्या विरोधात गुन्हा दाखल केलाआहे. ⁠शिवसैनिक अक्षय पानवलकर यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायन रेल ओव्हर ब्रीज (आरओबी) पाडण्याची तारीख पुन्हा पुढे ढकलली

सायन रेल ओव्हर ब्रीज (आरओबी) पाडण्याची तारीख पुन्हा पुढे ढकलली आहे. दहावी बारावीच्या परीक्षा लक्षात घेता डेडलाईन पुढे ढकलण्यात आली आहे. आज मध्य रात्रीपासून पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता. मात्र दहावी बारावीच्या मुलांची होणारी गैरसोय बघता डेडलाईन पुढे ढकलली आहे. पुल वाहतुकीसाठी बंद केल्यास मोठी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी सायन आरओबी पाडण्यात येणार आहे. दोन वर्षात नवीन पुल बांधण्याच आश्वासन मध्य रेल्वेने दिलं आहे.

PM Modi: PM मोदी यवतमाळमधून आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार 6 हजार रुपये

पीएम किसान योजनेचे २ हजार व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे ४ हजार, असे एकूण ६ हजार रुपये आज बुधवारी राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहे. यानिमित्ताने केंद्र शासनाने उद्या संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.


Hasan Mushrif : दूधगंगा बचाव कृती समितीचे उपोषण मागे,  मुश्रीफांशी चर्चेनंतर निर्णय

कसबा सांगाव : सुळकूड (ता. कागल) येथील दूधगंगा नदीवरून प्रस्तावित इचलकरंजी पाणी योजनेच्या विरोधात दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने महिलांनी सुरू केलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आले. कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्या महिलांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणली. मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीला आमंत्रित करण्याचे आश्वासन बचाव कृती समितीला दिले आणि उपोषणाची सांगता झाली.

Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

या महिन्याच्या सुरुवातीला संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पुन्हा निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पटेल,

Mira Bhayandar : आझाद नगर परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग

मीरा भाईंदर (महाराष्ट्र) : आझाद नगर परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग लागली असून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही आग कशामुळे लागली अद्याप याची माहिती मिळू शकली नाही. यात बांबूची व प्लास्टिक गोदामांमुळे आग जास्त भडकली. तसेच इथं गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्याची माहिती आहे. मुंबईहून अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

Latest Marathi News Live Update
Mumbai Fire: भाईंदरमधील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग; अनेक जण जखमी, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

Maratha Reservation : आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मराठा समाजाची आज बैठक

कोल्हापूर : सकल मराठा समाजातर्फे आज (ता. २८) मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी बैठक होत आहे. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता त्यास सुरुवात होईल. कुणबी नोंदी, राज्य शासनाकडून दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करून घेणे, मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण मिळवून देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

Bus Accident : नदीच्या पुलावरून बस कोसळून मालीमध्ये 31 प्रवाशांचा मृत्यू

बामाको : केनिबा शहराजवळील एका नदीच्या पुलावरून बस कोसळून मालीमध्ये 31 प्रवाशांचा मृत्यू झाला, असं परिवहन मंत्रालयानं सांगितलंय. बस बुर्किना फासोला जात असताना हा अपघात झाला, असं म्हटलंय. पश्चिम आफ्रिकन उपप्रदेशातील मालियन आणि इतर ठिकाणच्या नागरिकांचा या बळी गेला आहे.

Chhattisgarh : खाणीत खडकाचा काही भाग कोसळल्याने चार मजुरांचा मृत्यू

छत्तीसगड : दंतेवाडा जिल्ह्यातील किरंदुल भागात एका खाणीत खडकाचा काही भाग कोसळल्याने चार मजुरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी किरंदुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हाती घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मयंक चतुर्वेदी यांनी दिली.

Rajyasabha Election : भाजप आता राज्यसभेत बहुमताच्या अगदी जवळ, एनडीएच्या खासदारांची संख्या 117 पर्यंत वाढणार

लोकसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करणारा भाजप आता स्वबळावर राज्यसभेत बहुमताच्या अगदी जवळ पोहोचलाय. एप्रिलमध्ये रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 56 जागांपैकी भाजपने 30 जागा जिंकल्या आहेत, त्यापैकी 20 बिनविरोध निवडून आले. त्याचवेळी मतदानातून 10 जागा जिंकल्या. त्यामुळे राज्यसभेतील भाजपच्या खासदारांची संख्या 97 होणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या खासदारांची संख्या 117 पर्यंत वाढणार आहे. वरिष्ठ सभागृहात 240 खासदार आहेत. बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला १२१ खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. एनडीएसोबत ही संख्या 117 वर पोहोचली आहे.

Chhatrapati Sambhajinagar : म्हाडाच्या संभाजीनगरमधील 941 घरांच्या लॉटरीचा आज निकाल

मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून 941 सदनिका आणि 361 भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत आज, बुधवारी (दि. 28) जाहीर करण्यात येणार आहे.

Mahila Melava Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, काय आहे कारण?

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता.२८) महिला बचत गटांच्या महामेळाव्यासाठी यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून अडीच लाख महिलांची उपस्थिती राहणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी एक हजार नऊशे बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात राज्यातील अनेक आगारांतून एक हजार सातशे बसगाड्या येणार आहेत. ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचतगट स्थापन करण्यात आले आहेत. महिला बचत गटांचे जाळे गावागावांत विणले गेले आहे. या महिला बचतगटांचा महामेळावा यवतमाळ येथे होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

Supreme Court : 'पतंजली'च्या जाहिरातींवर तात्पुरती बंदी

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्याच्या करांमध्ये कोणताही बदल न करता किंवा नवीन कर न लादता महसूली तूट अंदाजे ९,७३४ कोटी रुपये आणि वित्तीय तूट ९९, २८८ कोटी रुपयांचा अंतरिम अर्थसंकल्प राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महिला बचत गटांच्या महामेळाव्यासाठी यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहेत. ‘पतंजली आयुर्वेद’च्या औषधी उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश दिलेत.

लोकसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करणारा भाजप आता स्वबळावर राज्यसभेत बहुमताच्या अगदी जवळ पोहोचलाय. एप्रिलमध्ये रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 56 जागांपैकी भाजपने 30 जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी 20 बिनविरोध निवडून आले. त्याचवेळी मतदानातून 10 जागा जिंकल्या. त्यामुळे राज्यसभेतील भाजप खासदारांची संख्या 97 होणार आहे. राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत १० टक्के आरक्षण लागू झाले आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या हिंसक वक्तव्याची सखोल चौकशी करुन विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिलेत. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com