Kiren Rijiju : चार उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती; कायदा मंत्र्यांची माहिती

Kiren Rijiju
Kiren Rijiju

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या पूर्ण झाल्यानंतर विविध उच्च न्यायालयांमधील मुख्य न्यायाधीशांची रिक्त पदेही वेगाने भरण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी चार उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. आता आणखी काही उच्च न्यायालयातील पदांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर नवीन नियुक्त्यांची घोषणा केली. (law minister kiren rijiju appointed chief justice in four high courts posts were vacated)

Kiren Rijiju
Eknath Shinde : बंजारा समाजासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या मोठ्या घोषणा; संजय राठोडांबद्दल म्हणाले...

रिजिजू यांनी ट्विटरवर लिहिले की, भारतीय राज्यघटनेतील संबंधित तरतुदींनुसार, खालील न्यायाधीशांची विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो!

गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सोनिया गिरीधर गोकाणी यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांची गुजरात उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अरविंद कुमार यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मेहता यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Kiren Rijiju
Devendra Fadnavis : लवकरच पोहरागडावर रेल्वे लाईन येणार; फडणवीसांची मोठी घोषणा

ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जसवंत सिंह यांना त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांची जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com