
जयपूर: स्वातंत्र्यदिनी दिल्ली आणि ग्वाल्हेरमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कट राजस्थान पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांसह टोळीच्या सहा सदस्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील चर्चित बाबा सिद्दीकी खून प्रकरणाचा मास्टरमाईंड, कॅनडात राहणारा जीशान अख्तर याच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला होती.