

‘LDF-BJP Alliance’ Remark by Rahul Gandhi Sparks Political Row
sakal
अलप्पुझा (केरळ): ‘‘देशाच्या इतर भागांत अल्पसंख्याकांवर हल्ले करणाऱ्यांशी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन भागीदारी करीत आहेत,’’ असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. एलडीएफ आणि भाजप एकत्र आले असून, दोघांमध्ये संगनमत झाले आहे, असेही राहुल म्हणाले.