Leaders of the three army met PM Narendra Modi at his residence
Leaders of the three army met PM Narendra Modi at his residenceLeaders of the three army met PM Narendra Modi at his residence

तिन्ही दलांच्या प्रमुखांनी PM मोदींची निवासस्थानी घेतली भेट

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेसंदर्भात तिन्ही दलांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही एक महत्त्वाची बैठक मानली जात आहे. यापूर्वी तिन्ही दलांच्या प्रमुखांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची अनेकदा भेट घेतली आहे. अग्निपथ योजनेला तरुणांचा विरोध पाहता सरकारने अनेक महत्त्वाच्या सवलतीही जाहीर केल्या आहेत. (Leaders of the three army met PM Narendra Modi at his residence)

तरुणांव्यतिरिक्त अनेक राजकीय पक्षांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांसोबतची (Narendra Modi) ही भेट झाली आहे. मात्र, विरोध होत असतानाही सरकार या योजनेचा सातत्याने बचाव करीत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही एका मुलाखतीत या योजनेचे फायदे सांगितले आहेत. ही योजना मागे घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leaders of the three army met PM Narendra Modi at his residence
सीआरपीएफच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला; ३ जवान शहीद

देशात निदर्शने सुरू असताना सरकारने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात वयोमर्यादेत शिथिलता देखील समाविष्ट आहे. याशिवाय निमलष्करी दलात अग्निवीरांसाठी अतिरिक्त कोटा ठेवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

महिंद्रा ग्रुपसह अनेक व्यावसायिक संस्थांनी अग्निवीरांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे तरुणांना चार वर्षे सैन्यात काम करण्याची संधी देणाऱ्या अग्निपथ योजनेवर उत्तर प्रदेश, बिहार, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये हिंसाचार पाहायला मिळत आहे.

Leaders of the three army met PM Narendra Modi at his residence
एसएचओ आणि हवालदाराचे समलैंगिक संबंध; व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग

बैठकीत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार आणि एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी उपस्थित होते. संरक्षण मंत्रालयाने दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन अग्निपथ योजनेतील महत्त्वाच्या बाबी सांगितल्या होत्या. यापूर्वी रविवारीही संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली होती. भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सहा श्रेणींमध्ये भरती होणार आहे. त्यात अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक, अग्निवीर ट्रेड्समन, अग्निवीर यांचा समावेश आहे. अग्निपथचा वाद संपवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com