
MHA Orders Judicial Inquiry into September 24 Clashes, Sonam Wangchuk under NSA.
Sakal
नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश लेहमध्ये २४ सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता. तसेच सुमारे नव्वद जण जखमी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एस. चौहान यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय न्यायालयीन आयोग या हिंसाचाराची चौकशी करणार आहे.