केरळच्या अभ्यासक्रमात हुंडाप्रथेविरोधात धडा

शालेय व महाविद्यालयीन अभ्‍यासक्रमात हुंडा प्रतिबंध धड्याचा समावेश करण्यावर केरळ सरकारचा विचार
Pinarayi Vijayan
Pinarayi VijayanSakal

तिरुअनंतपुरम - शालेय व महाविद्यालयीन (School and College) अभ्‍यासक्रमात (Syllabus) हुंडा प्रतिबंध (Dowry Restrictions) धड्याचा (Lesson) समावेश करण्यावर केरळ सरकार (Keral Government) विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी नुकतेच सांगितले. हुंड्यासंबंधीच्या तक्रारीवरून संबंधितांवर कठोर कारवाई (Crime) करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Lessons Against Dowry in Kerala Curriculum)

हुंड्याच्या तक्रारींचा चौकशी करण्यासाठी पोलिस अधीक्षक निशांतनी यांची मुख्य महिला अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. केरळमध्ये हुंडाबळीच्या तीन घटना नुकत्याच घडल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्‍नांची सरबत्तीच त्यांच्यावर केली. त्याला उत्तरे देताना ‘हुंडा हा सामाजिक धोका आहे आणि युवा पिढीने त्यापासून दूर राहिले पाहिजे. हुंडा प्रतिबंध कायदा राज्यात सहा दशकांपासून अमलात आहे. कोणत्याही स्वरूपात लिंगभेदाला मान्यता अजिबात थारा दिला जाणार नाही आणि मुलीला विक्रीयोग्य वस्तू कदापी मानले जाणार नाही,’ असे विजयन यांनी स्पष्ट केले.

Pinarayi Vijayan
कोरोना लसीकरण प्रमाणपत्र पासपोर्टशी कसे लिंक करायचे?

हुंडाबळीच्या तीन घटना

कोलावलम येथे एका नवविवाहितेला जिवंत जाळण्यात आले तर अलापुझ्झा येथे एक विवाहिता मृतावस्थेत आढळली. कोल्लम जिल्ह्यात एकीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला असून मृत विवाहितेचा पती अरुण याला पोलिसांनी अटक केली आहे. अरुणकुमार हा सहाय्यक वाहन निरीक्षक आहे. त्याला दोन आठवड्यांची कोठडी देण्‍यात आली आहे. हुंड्यात दिलेली मोटार ही दहा लाखांपेक्षा कमी किंमतीची आहे, या कारणावरून अरुणकुमार पत्नी व तिच्या आईवडिलांचा सतत अपमान व छळ करीत होता. मोटार पत्नीच्या नावावर असल्याचीही त्याची तक्रार होती. शिवाय त्यांनी दिलेले सोने व इतर संपत्तीवरही तो नाखूष होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com