A couple in Liberia recreates the Pandharpur Wari scene for Kartiki Ekadashi, celebrating Maharashtra’s Warkari tradition and paying tribute to deceased devotees.
esakal
वणी (नाशिक) : महाराष्ट्राच्या मातीतील वारकरी संप्रदाय, पंढरीची वारी आणि विठ्ठलभक्तीची ओढ सातासमुद्रापारही कायम असल्याची भावस्पर्शी प्रचिती आफ्रिका खंडातील लायबेरियात आली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीचा भक्तिमय देखावा साकारत संदेशा भुवनेश गुप्ता व त्यांचे पती बोनी राजेंद्र गुप्ता यांनी विठ्ठलभक्तीचा जागर केला आहे. विशेष म्हणजे, चार महिन्यापूर्वी सासवड परिसरात पंढरपूरच्या वारीसाठी जाताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांनाही या देखाव्यातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.