कर्नाटक : कॉन्ट्रॅक्टरच्या आरोपानंतर आता लिंगायत धर्मगुरुंचा सरकारवर आरोप

मठांच्या अनुदानाच्या मंजुरीसाठी सरकार कमिशन मागत असल्याचा आरोप
Dingaleshwar Swamy_Karnataka
Dingaleshwar Swamy_Karnataka

बंगळुरु : कर्नाटकातील भाजप सरकारवर एका लिंगायत धर्मुगुरुंनी गंभीर आरोप केला आहे. मठांना मिळणाऱ्या अनुदानासाठी ३० टक्के कमिशन घेतल्यानंतरच मंजुरी मिळते, असं त्यांनी म्हटलं आहे. कर्नाटक सरकारवर संतोष पाटील नामक एका कॉन्ट्रॅक्टरनं ४० टक्के कमिशन मागत असल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. यानंतर सरकारवर आणखी एक आरोप करण्यात आला आहे. (Lingayat priest now accuses Karnataka govt of bribery after contractor Santosh Patil allegations)

Dingaleshwar Swamy_Karnataka
जहांगीरपुरीत पुन्हा तणाव; पोलिसांवर दगडफेक, परिसराला छावणीचं स्वरुप

लिंगायत धर्मगुरु डिंगलेश्वर स्वामी म्हणाले, "हे प्रत्येकाला माहिती आहे की, कर्नाटकात काय सुरु आहे. जर मठाला अनुदान मिळणार असेल तर त्यासाठी ३० टक्के कमिशन दिल्यानंतरच मंजुरी मिळते" जनसत्तानं याबाबत वृत्त दिलं आहे.

बोम्मई सरकारवर उपस्थित होताहेत सवाल?

कर्नाटकच्या भाजप सरकारवर तेव्हा सवाल उपस्थित व्हायला लागले जेव्हा उडुपी येथील कॉन्ट्रॅक्टर संतोष पाटील यांनी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्यावर छळ आणि कमिशनखोरीचा आरोप करत आत्महत्या केली. सुरुवातीला याप्रकरणावरुन ईश्वरप्पा यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला पण नंतर गेल्या शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्री बोम्मईंकडे आपला राजीनामा सोपवला.

ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल

कॉन्ट्रॅक्टर संतोप पाटील आत्महत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांकडून ईश्वरप्पा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर संतोष पाटील यांचा भाऊ प्रशांत पाटील यांनी दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये ईश्वरप्पा यांच्याह त्यांचे स्टाफ रमेश आणि बसवराज यांना आरोपी केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com