पक्ष सोडल्यास 20 कोटी, दुसरा नेता सोबत आणल्यास 25 कोटी; आप खासदाराचा गौप्यस्फोट

भाजप बऱ्याच काळापासून आपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे.
AAP MP Sanjay Singh
AAP MP Sanjay Singhesakal
Summary

भाजप बऱ्याच काळापासून आपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे.

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यावरून (Liquor scam) भारतीय जनता पक्ष (BJP) आणि आम आदमी पार्टी (Aap) यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस नवनवीन वळण घेत आहे. आता आम आदमी पक्षानं दावा केलाय की, भाजपनं त्यांच्या आमदारांना खरेदी करून आणि त्यांना धमकावून फोडण्याचा प्रयत्न केलाय.

आपचे खासदार संजय सिंह (AAP MP Sanjay Singh) यांनी बुधवारी दिल्लीच्या चार आमदारांसह हा दावा केला. आमदार सोमनाथ भारती, संजीव झा, कुलदीप आणि अजय दत्त यांनी आरोप केला की, त्यांना 20-25 कोटी रुपयांचं आमिष देण्यात आलं आणि त्यांनी नकार दिल्यास सिसोदियासारख्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. मात्र, यापैकी कोणीही भाजप नेत्याचं नाव घेतलं नाही.

AAP MP Sanjay Singh
नितीश कुमार बहुमत सिद्ध करण्याआधीच सभापती विजय सिन्हांचा राजीनामा

या चौघांना भाजपनं काय ऑफर दिली होती याचा खुलासा संजय सिंह यांनी केलाय. पक्ष सोडून भाजपमध्ये न आल्यास या आमदारांच्या मागं सीबीआय, ईडीचा ससेमिरा लावण्याची धमकी देण्यात आली होती, असं सिंह यांनी म्हटलंय. भाजपनं आपच्या 4 आमदारांशी संपर्क साधून आमच्या पक्षात आलात तर प्रत्येकी 20 कोटी रुपये मिळतील, असं आश्वासन दिलं होतं. या आमदारांनी त्यांच्यासोबत पक्षातील इतर नेत्यांना सोबत आणलं तर 20 ऐवजी 25 कोटी रुपये मिळतील, असं आमिष भाजपनं दिलं होतं असा आरोप संजय सिंह यांनी केलाय.

AAP MP Sanjay Singh
मोठी बातमी : प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीला अटक होण्याची शक्यता!

संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केला. आम आदमी पार्टीच्या संजीव झा, सोमनाथ भारती, कुलदीप कुमार यांच्यासह चार आमदारांना 20-20 कोटींची ऑफर देण्यात आली. याची रेकॉर्डिंगही असल्याचा दावा संजय सिंह यांनी केला. भाजप बऱ्याच काळापासून आपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीमध्ये पहिल्यांदा सरकार स्थापन केल्यापासून भाजपचा प्रयत्न सुरू असून ते प्रत्येक वेळी तोंडघशी पडल्याचं संजय सिंह यांनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com