भारताच्या एकतेसाठी ही संसद बनेल उर्जा; नवीन इमारतीचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 10 December 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नियोजित नव्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्यदिव्य संसद निर्मितीच्या इमारतीच्या भूमिपूजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षाचे नेतेही उपस्थितीत आहेत. पंतप्रधान मोदींनी पूजा अर्चा केल्यानंतर सर्वधर्मिय प्रार्थना होणार असून त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील कार्यक्रमाला उपस्थितीत असून त्यांच्यासह उद्योगपती रतन टाटाही कार्यक्रमाला उपस्थितीत आहेत. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हटलं की, आपण भारताचे लोक मिळून आपल्या संसदेच्या या नव्या भवनाला साकार करु. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यावरच ही संसद उभी राहील, याहून सुंदर आणि पवित्र काय असेल? आजचा दिवस भारताच्या लोकशाही इतिहासामधील महत्त्वाचा दिवस आहे. भारतीयांद्वारे, भारतीयत्वाच्या विचारांनी ओत-प्रोत, भारताच्या संसद भवनाच्या निर्मितीचा शुभांरभ हा आपल्या लोकशाही परंपरेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की,आपल्या आयुष्यातील तो क्षण कधीच विसरू शकत नाही जेंव्हा 2014 मध्ये मी पहिल्यांदा खासदार म्हणून संसद भवनात आलो. या लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश करण्याआधी मी आपला माथा झुकवून, तो पायऱ्यावर टेकवून या मंदिराला नमन केलं होतं. नव्या संसदभवनामध्ये अशा अनेक गोष्टी होणार आहेत, ज्यामुळे खासदारांची कार्यक्षमता वाढेल. त्यांच्या कामामध्ये आधुनिकता येईल.

आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की लोकशाही जी संसदे भवनाच्या अस्तित्वाचा आधार आहे, त्याच्या प्रती आपल्याला आशावाद जागृत ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला हे कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे की संसदेत पोहोचलेला प्रत्येक व्यक्ती उत्तर देण्यास बांधील आहे. आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की लोकशाही जी संसदे भवनाच्या अस्तित्वाचा आधार आहे, त्याच्या प्रती आपल्याला आशावाद जागृत ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला हे कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे की संसदेत पोहोचलेला प्रत्येक व्यक्ती उत्तर देण्यास बांधील आहे. तो जनतेलाही उत्तर देण्यास बांधील आहे आणि संविधानालाही बांधील आहे. असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या कार्यक्रमाला उपस्थितीत राहु शकलेले नाहीत. आजचा दिवस देशासाठी अभिमानाचा आहे, असे ट्विट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कार्यक्रमापूर्वी केले .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Live from Delhi PM Modi lays foundation stone of New Parliament Building