News Update: दिवसभरात देश-विदेशात काय घडामोडी घडल्या? वाचा एका क्लीकवर

यंदाच्या मॉन्सूनची प्रगती वेगाने सुरू असून तळकोकणात सहा जूनला हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर ट्रॅफीक जाम

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळं पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर ट्रॅफीक जाम झालं आहे. यामुळं ५ किमीपर्यंत रांग लागली आहे.

मालिवार मारहाण प्रकरणी विभव कुमार यांना अटक

PM Modi: हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

हे मोदींचे युग आहे, आम्ही घरात घुसून मारतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. ते हरियाणातील एका सभेत बोलत होते.

Mumbai-Pune Highway: पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवार-रविवार असल्याने अनेक लोक बाहेर पडले आहेत.

chhatrapati sambhaji nagar:  संभाजीनगरमध्ये पावसाची जोरदार हजेरी

छ. संभाजीनगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी देखील पाऊस पडत आहे.

Mulund News: मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचे कार्यालय फोडल्याप्रकरणी आज पाच जणांना अटक करण्यात आली होती. या आरोपींना एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी घेतलं मुंब्रा देवीचं दर्शन

उद्धव ठाकरे यांनी आज मुंब्रा देवीचं दर्शन घेतलं आहे. आज पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराची सांगता होणार आहे. त्याआधी ठाकरेंनी जाऊन देवीचं दर्शन घेतलं.

बिभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

स्वाती मालीवाल प्राणघातक हल्ला प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांनी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर न्यायालयाने बिभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणातील आदेश राखून ठेवला आहे.

दिल्लीचे CM केजरीवालांची संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पाच वाजता पत्रकार परिषद घेणार असून स्वाती मालीवाल यांना मारहाण प्रकरणी ते आपली बाजू माध्यमांसमोर मांडण्याची शक्यता आहे. दरम्यान ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,

NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा नवी दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला. दोन कन्सल्टंट एजंट, किशोरी लाल (रा. राजस्थान) आणि प्रभात कुमार (रा. बिहार), आणि प्रॉक्सी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस एक सलमान (उत्तर प्रदेशचा राहणार) आणि आणखी दोन एजंटचा शोध घेत आहेत.

मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी घरून मतदानाचा हक्क बजावला आहे. दिल्लीमध्ये सहाव्या टप्प्यासाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे.

स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

स्वाती मालीवाल प्राणघातक हल्ला प्रकरणी अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांनी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

स्वाती मालीवाल प्रकरणात विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केल जाणार आहे. दुपारी ४ वाजल्यानंतर ३० हजारी कोर्टासमोर हजर करण्यात येणार. विभव कुमार यांच्यावर लावलेली कलमं ही नॉन बेलेबल असल्याने त्यांना जामीन मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे.

इगतपुरीत गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर निघाल्याने प्रवाशांची तारांबळ

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळ गोदान एक्स्प्रेस च्या डब्याखालून धूर निघाल्याने एकच खळबळ उडाली. अप मार्गाच्या गोदान एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने धूर निघाल्याचे नंतर सांगण्यात आले. गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली, यावेळी धूर बघून प्रवाशांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले यावेळी प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या

- गार्ड आणि ड्रायव्हर दोघांनी उतरून एक्स्प्रेस गाडी चेक केली त्यानंतर गाडी इगतपुरी स्थानकात आल्यानंतर गाडीची बोगी लायनर दुरुस्त करून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.

वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोन्याच्या दुकानावर दरोडा

पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा पडला आहे. मास्क लावून महम्मदवाडी रस्त्यावरील वारकर मळा येथील BGF ज्वेलर्स या ठिकाणी दरोडा टाकून सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले.

यूपीएचे सरकार असते तरी राम मंदिर बांधले गेले असते- गेहलोत

"राममंदिर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बांधले गेले आहे... सरकार जरी एनडीएऐवजी यूपीएचे असते तर मंदिरही बांधले गेले असते. भाजपचे लोक संभ्रम पसरवत आहेत. पंतप्रधान मोदी निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे जनतेला समजले आहे, असा घणाघात राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला.

बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीएस बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलिसांचे एक पथक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. अतिरिक्त डीसीपी आणि एसीपी उपस्थित आहेत

आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल

नवी दिल्ली - आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ते पोहचले. मागच्या काही महिन्यांपासून चढ्ढा हे डोळ्याचं ऑपरेशन झाल्याने देशाबाहेर होते. केजरीवाल अटकेत असताना चढ्ढा समोर येत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.

INDIA Alliance Press: "सर्व काही मोदींच्या आदेशानुसार चालते”- खर्गे

पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने संवैधानिक संस्थांच्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. त्यांनी विरोधकांना मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. खऱ्या पक्षाकडून पक्षाचे चिन्ह काढून घेण्यात आले आहे (उद्धव ठाकरे यांची शिवसेना) आणि भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना (शिंदे गटाला) देण्यात आले आहे.

तुम्ही म्हणाल हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. पण, सर्व काही मोदींच्या आदेशानुसार चालते,” असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुंबई, महाराष्ट्र येथे भारत आघाडीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

INDIA Alliance: महायुतीची भाषा समाजाला तोडण्याची: मल्लिकार्जून खर्गे

मुंबईमध्ये इंडिया आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे. यामध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, राज्यातील महायुती नेहमी समाजाला तोडण्याची भाषा करत असते.

INDIA Alliance: इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेला दिग्गजांनी उपस्थिती

मुंबईमध्ये थोड्याच वेळा इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेला सुरूवात होणार आहे. याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.

Share Market: शेअर बाजार आजही खुला

आज शनिवार असूनही शेअर बाजार काही वेळ सुरू असणार आहे. डिझास्टर रिकव्हरी साइटची टेस्टसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही टेस्ट NSE द्वारे इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्हमध्ये केली जाईल.

यामध्ये पहिले सत्र सकाळी 9:15 ते सकाळी 10 पर्यंत आणि दुसरे सत्र सकाळी 11:45 ते 12:40 पर्यंत असेल.

Uttar Pradesh: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसची धडक 25 जण गंभीर जखमी

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे एका बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्याने २५ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पर्यटकांनी भरलेल्या बसला भीषण आग; आठ जणांचा होरपळून मृत्यू

कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर नुह जिल्ह्यातील धुलावत गावाजवळ चालत्या बसला आग लागल्याने आठ जण जिवंत जाळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसमधील 60 लोकांपैकी 20 हून अधिक जण गंभीररीत्या भाजले, ज्यात अनेक मुलं आणि महिलांचा समावेश आहे. रात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बस पंजाबच्या होशियारपूर आणि चंदिगडमध्ये राहणाऱ्या लोकांना घेऊन जात होती.

Mumbai Lok Sabha : भाजप उमेदवार पीयूष गोयल यांनी संजय गांधी उद्यानात मॉर्निंग वॉक करत लोकांशी साधला संवाद

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पीयूष गोयल यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉक करत लोकांशी संवाद साधला. उत्तर मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे.

CM Yogi Adityanath : धुळे, पालघरसह मुंबईत मुख्यमंत्री योगींची आज जाहीर सभा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रातील धुळे, पालघर आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कम्पोझिट स्कूल, हरैया, बस्ती येथे जाहीर सभेला संबोधित करतील. यानंतर दुपारी साडेचार वाजता लखनौमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे.

Ambala Lok Sabha : भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी 19 वर्षांनंतर पीएम मोदी अंबालामध्ये येणार

अंबाला : अंबाला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बंतो कटारिया यांच्या प्रचार रॅलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अंबाला येथे येणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच इथं येत आहेत. देशातील अनेक पंतप्रधानांचा अंबालाशी थेट संबंध आला आहे. काँग्रेसबद्दल बोलायचं झालं, तर गांधी घराण्यातील माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू वगळता पंतप्रधान आणि त्यांची मुलं अंबाला येथे आली आहेत.

Delhi Lok Sabha : रामलीला मैदानावर आज काँग्रेसची मोठी रॅली

दिल्लीत आज होणाऱ्या काँग्रेसच्या सभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राहुल गांधींसोबत दिसणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने इंडिया आघातील पार्टनर आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत आमंत्रित केलं नाही. इतर राज्यांमध्ये राहुल गांधी त्यांच्या सभांमध्ये घटक पक्षांना त्यांच्या मंचावर आमंत्रित करत आहेत, परंतु दिल्लीत त्यांना आमंत्रित करण्यात आलं नाही. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र निवडणूक लढवत आहे.

10th Exam : दहावी परीक्षेतील ग्रेस मार्क्स रद्द होणार

बंगळूर : पुढील वर्षापासून दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षेत ग्रेस मार्क देण्याची पद्धत रद्द करण्याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विधानसौध येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षी विद्यार्थ्यांना २० ग्रेस गुण दिले आहेत. कोणत्या कारणासाठी आणि हेतूने ग्रेस मार्क्स दिले आहेत. तुम्हाला ग्रेस मार्क्स देण्यास कोणी सांगितले, असा सवाल सिध्दरामय्या अधिकाऱ्यांना केला.

Lok Sabha Elections : पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार आज थांबणार

नवी दिल्लीः रायबरेली व अमेठीसह देशातील पाचव्या टप्प्यातील ४९ मतदारसंघांमधील प्रचार आज (ता. १८) थांबणार आहे. या टप्प्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पीयूष गोयल, स्मृती इराणी यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी, चिराग पासवान, उमर अब्दुल्ला यांच्यासह ६९५ उमेदवार रिंगणात आहेत. येत्या २० मे रोजी मतदान होईल. यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांचा समावेश आहे. बिहार (५), झारखंड (३), महाराष्ट्र (१३), ओडिशा (५), उत्तरप्रदेश (१४), पश्चिम बंगाल (७) तसेच जम्मू-काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशातही प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होईल.

Exam Update : मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा 24 मेपासून

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या उन्हाळी सत्र लेखी परीक्षांना सुरुवात होत आहे. विविध ११५ शिक्षणक्रमांच्‍या परीक्षा शुक्रवार (ता. २४) पासून सुरु होत असून, १२ जूनपर्यंत पार पडणार आहे. राज्‍यात मुक्त विद्यापीठाच्या ६०१ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होतील.

Weather Update : मॉन्सून तळकोकणात 6 जूनला लावणार हजेरी; हवामान विभागाचा अंदाज

Latest Marathi News Live Update : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रगतीसाठी सध्या हवामानातील आवश्यक घटक पूरक आहेत. त्यामुळे यंदाच्या मॉन्सूनची प्रगती वेगाने सुरू असून तळकोकणात सहा जूनला हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रायबरेली व अमेठीसह देशातील पाचव्या टप्प्यातील ४९ मतदारसंघांमधील प्रचार आज (ता. १८) थांबणार आहे. त्याचबरोबर घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेल्या भावेश भिंडे याला मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, भिंडेला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी के. एस. झंवर यांनी २६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील जाहीर सभेत जोरदार भाषण ठोकून टाळ्या मिळविणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी अद्यापही कायम आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com