Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज (ता. १५) घाटकोपर येथे रोड-शो आयोजित करण्यात आला आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

घाटकोपर दुर्घटनेत आणखी दोन मृतदेह सापडले

मुंबईतल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये होर्डिंगखाली अडकलेल्या कारमधून आणखी 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 16 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती एनडीआरएफने दिली.

जुने रेकॉर्ड मोडणार, चारशेपार येणार- नरेंद्र मोदी

यावेळी आम्ही आमचे जुने रेकॉर्ड मोडणार आहोत आणि चारशेपार येणार आहोत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते मुंबईतील रॅलीदरम्यान माध्यमाशी बोलत होते.

पंतप्रधानांच्या रोड शोला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद

मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुंबईकरांनी पंतप्रधानांच्या रोड शोला मोठा प्रतिसाद दिला आहे. रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शोला सुरुवात

मुंबईत PM मोदींच्या रोड शोला थोड्याच वेळात सुरुवात

मुंबईत PM मोदींच्या रोड शोला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. घाटकोपर इथं अडीच किमीचा मोदींचा रोड शो असणार आहे. अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रीजपर्यंत हा रोड शो असणार आहे. यासाठी भाजपसह शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं जय्यत तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणावर लोक या मार्गाच्या दुतर्फा जमा झाले आहेत.

काँग्रेसनं सावरकरांच्या चांगल्या कामांवर पाच शब्द बोलून दाखवावेत - मोदी

धर्माच्या आधारावर काँग्रेस बजेटचं वाटप करणार आहे - मोदी

धर्माच्या आधारावर बजेटचं वाटप काँग्रेसनं केलं आहे, असंही यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस विकासाची बात करु शकत नाही, केवळ हिंदू-मुस्लिम करतंय - मोदी

काँग्रेस कधीही विकासाचं काम करु शकत नाही. काँग्रेस केवळ हिंदू-मुस्लिम करत आहे. मोदी आता त्यांच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढत आहे. मी काँग्रेसला एक आव्हान देऊ इच्छितो.

तुमचा संकल्प हे माझं स्वप्न - मोदी

तुमचा संकल्प हे माझं स्वप्न आहे. तुमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी माझा प्रत्यक्ष क्षण तुमच्या आणि देशाच्या नावे समर्पित आहे.

सरकार आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांच्या व्हिजनमध्ये २५ दिवस अधिक जोडणार - मोदी

देशातील तरुणाईला वैयक्तीक विनंती आणि आग्रह देखील करतोय. माझं १०० दिवसांचं व्हिजन आहे त्याला मी १२५ दिवस जोडत आहे. कारण माझ्या देशातील नवमतदारांनी मला त्यांच्या मनातील गोष्टी सांगाव्यात मी या २५ दिवसात त्यांचा समावेश करु इच्छितो.

४ जूननंतरही आत्ता इतकंच काम करणार - मोदी

आज आपण पहिल्यांदा भारतात एक नवा आत्मविश्वास पाहत आहोत. पहिल्यांदा भारत शिवाजी महाराजांच्या बुलंद हौसल्यानं काम करत आहे. पहिल्या १०० दिवसात काय काम करायचं आहे. कोणते निर्णय घ्यायचे आहेत यावर सातत्यानं काम केलं आहे. असं नाही की सरकार बनलं आणि आता माळा घालत फिरायचं आहे. आज जितकी मेहनत करत आहे तितकीच मेहनत ४ जूननंतरही करणार आहे.

केजरीवालांसाठी वाईट गोष्ट, २०२९ पर्यंत मोदींच नेतृत्व करणार - शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणमध्ये दाखल

नाशिकच्या दिंडोरी इथं सभा पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. कल्याणध्ये श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी मोदी सभा घेणार आहेत. त्यानंतर मुंबईत त्यांचा रोड शो पार पडणार आहे.

Citizenship Certificates: 14 लोकांना CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळाले

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांतर्गत 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (15 मे) ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, CAA अंतर्गत 14 लोकांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे.

PM Narendra Modi: अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते -पंतप्रधान मोदी

नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्न मोडले आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले आहे, मात्र यावरून नकली शिवसेना सर्वाधिक चिडत आहे.- पंतप्रधान मोदी

Supreme Court: उत्तराखंडच्या जंगलात लागलेल्या आगीबाबत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

बुधवारी (15 मे) उत्तराखंडच्या जंगलात लागलेल्या आगीच्या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले. न्यायालयाने उत्तराखंड सरकारला राज्य सरकारकडे अपुरा निधी आणि लोकसभा निवडणूक 2024 च्या कर्तव्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना नियुक्त केल्याबद्दल फटकारले आहे.

Mallikarjun Kharge Press conference: भारतात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास 10 किलोपर्यंत मोफत रेशन देणार- मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुधवारी लखनौमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये काँग्रेस अध्यक्षांनी दावा केला की, देशात इंडिया आघाडी सरकार स्थापन होणार आहे. हे सरकार आरक्षणाची मर्यादा 50 टक्के वाढवणार असून मोफत रेशनची मर्यादा पाच किलोवरून 10 किलो करणार आहे.

PM Modi’s Roadshow Today: जागृतीनगर ते घाटकोपर दरम्यान सुरु असलेली मेट्रो संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद राहणार

जागृतीनगर ते घाटकोपर दरम्यान सुरु असलेली मेट्रो पंतप्रधान मोदी येत असल्याने संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे.

Mumbai Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंगखाली अजूनही 30-40 लोक अडकल्याची शक्यता; 46 तासानंतरही बचावकार्य सुरु

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. 44 जण अजूनही रुग्णालयात दाखल असून, त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. होर्डिंगखाली अजूनही 30-40लोक अडकल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

CM Yogi Adityanath: 'आम्ही अणुबॉम्ब फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी बनवला आहे का?' सीएम योगींची गर्जना

मुख्यमंत्री योगी म्हणाले, 'इंडिया आघाडीचे लोक धमकी देतात, म्हणतात पाकिस्तानविरुद्ध बोलू नका, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. आम्ही म्हणतो, आमचा अणुबॉम्ब फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी बनवला आहे का? मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांनी रामभक्तांवर गोळीबार केला ते भारतावर राज्य करतील का? हिंदूंच्या मारेकऱ्यांच्या हाती सत्ता सोपवणार का? हे पाप कधीही होऊ नये.

Amit Shah: बंगालमध्ये 'मुल्ला, मदरसा आणि माफियांचा नारा', अमित शहांचा ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला आम्हाला पीओकेबद्दल बोलू नका,असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी म्हटले आहे. मला सांगायचे आहे की तुम्ही पाकिस्तानला घाबरा, आम्ही पीओके घेऊ. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधत अमित शहा म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये मुल्ला, मदरसा आणि माफियांच्या घोषणा दिल्या जात आहेत.

Lok Sabha Election 2024: गेल्या 10 वर्षात मोदींनी काय केले ते सांगता येत नाही - जितू पटवारी

काँग्रेसचे नेते जितू पटवारी म्हणाले, "गेल्या 10 वर्षात मोदींनी काय केले ते सांगता येत नाही. पंतप्रधान मोदींनी जे 16 लाख कोटी उद्योगपतींना दिले, तेच 16 लाख काँग्रेस पक्ष या देशातील गरिबांना देणार आहे. काँग्रेस भारतात आर्थिक न्यायाची व्यवस्था निर्माण करेल.''

Ghatkopar Hoarding Tragedy: उद्धव ठाकरे आणि सुनील राऊत 14 जणांच्या मृत्यूला जबाबदार; किरीट सोमय्या यांचा आरोप

घाटकोपर होर्डिंगच्या घटनेवर, भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, "आदित्य ठाकरे यांना वाटते की त्यांचे वडील उद्धव ठाकरे या प्रकरणात अडकू शकतात. संजय राऊत यांना वाटते की त्यांचे भाऊ सुनील राऊत यांचे नाव देखील पोलिसांच्या तपासात येऊ शकते.

28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले... ही मालमत्ता तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येते... भावेश भिंडे यांना 7 डिसेंबर 2021 रोजी होर्डिंग बनवण्याचे कंत्राट देण्यात आले होते... उद्धव ठाकरे आणि सुनील राऊत 14 जणांच्या मृत्यूला जबाबदार आहेत.''

PM Modi Road Show: ड्रोन, पतंग आणि फुगे उडवण्यास बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो चे आज मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी पोलिसांनी ड्रोन, पतंग आणि फुगे उडवण्यास बंदी घातली आहे.

Rahul Gandhi: "भाजपला संविधान नष्ट करायचे आहे"

भारतीय जनता पक्षाला संविधान नष्ट करायचे आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते ओडिशातील प्रचारसभेत बोलत होते.

Raipur Municipal Corporation:मुंबई होर्डिंग दुर्घटनेचे देशभरात पडसाद

मुंबई होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, रायपूर महानगरपालिकेने (RMC) सर्व जाहिरात संस्थांना छत्तीसगडच्या राजधानीत बसवलेल्या त्यांच्या होर्डिंगचा संरचनात्मक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत घेतली भेट

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली.

राजस्थान खाणीत १४ पैकी १० जणांना बाहेर काढण्यात यश

राजस्थानमधील खानील लिफ्ट कोसळली होती. यामध्ये 10 जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. उर्वरित पाच जणांना वाचवण्यात येत आहे. काल लिफ्टची दोरी तुटल्याने लिफ्ट कोसळली. यात जखमी झाले आहेत. 10 जणांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे..."

न्यूजक्लिकच्या संस्थापकाची अटक आणि त्यानंतरची कोठडी अवैध - सर्वोच्च न्यायालय

न्यूजक्लिकच्या संस्थापकाची अटक आणि त्यानंतरची कोठडी अवैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. रिमांडपूर्वी त्याला किंवा त्याच्या वकिलाला अटकेचे कारण दिले गेले नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी अन् प्रफुल्ल पटेलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला - संजय राऊत

शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणतात, "ज्या पंतप्रधानांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर दाऊद आणि इक्बाल मिर्ची यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला, तेच काल प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत होते. त्यांनी (प्रफुल्ल पटेल) छत्रपती शिवाजी महाराजांची पगडी डोक्यावर घातली. पंतप्रधान मोदींची, ती पगडी आम्ही कुणाला देत नाही, हा अधिकार प्रफुल्ल पटेल यांना कोणी दिला?... पंतप्रधान मोदी आणि प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे.

आज नाशिकमध्ये नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा

आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा असणार आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पिंपळगावमध्ये सभा होणार आहे. दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी शरद पवारांची वणीमध्ये सभा होणार आहे. तर नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची नाशिक शहरात जाहीर सभा होणार आहे.

शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्चात तफावत दिसून आल्याने निवडणूक आयोगाने त्यांनी नोटीस बजावली आहे. तर याबाबतचे स्पष्टीकरण देण्याची नोटीस निवजणूक आयोगाने दिली आहे.

आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या जीवाला धोका

आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्वाती मालीवाल यांचे घटस्फोटित पती नवीन जयहिंद यांनी असा दावा केला आहे. स्वाती यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी जे काही घडले ते नियोजित होते. स्वाती यांनी समोर येऊन आपली बाजू मांडावी असं नवीन जयहिंद यांनी म्हटलं आहे.

Ratnagiri Municipal : रत्नागिरीत २०० होल्डिंग मालकांना बजावली नोटीस

रत्नागिरी : अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची रत्नागिरी पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. शहरातील २०० अधिकृत होल्डिंग मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल देण्याची नोटीस मालकांना बजावली आहे.

Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

पुणे : राज्यात वळवाच्या सरींनी हजेरी लावल्याने उन्हाचा चटका काही अंशी कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात येत्या बुधवारी (ता. १५) वादळी वाऱ्यासह पावसाचा तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला आहे. कोकणात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान खात्याने मंगळवारी दिला.

CCB Police : बंगळुरात २.७४ कोटींचे ड्रग्ज जप्त

बंगळूर : सीसीबी पोलिसांनी ड्रग्ज (अमली पदार्थ) विरोधी मोहीम अधिक तीव्र केली असून, तीन परदेशींसह आठ ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. यावेळी त्यांनी २.७४ कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

Woman Abduction Case : एच. डी. रेवण्णा यांची तुरुंगातून सुटका

बंगळूर : एका महिलेच्या अपहरण प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांची काल न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्यात आली. सकाळी रेवण्णांच्या वकिलाने परप्पन अग्रहार मध्यवर्ती कारागृह अधिकाऱ्यांना आदेशाची प्रत दिली आणि जामिनाच्या अटी पूर्ण केल्यानंतर रेवण्णाची सुटका करण्यात आली. यामुळे रेवण्णांचा सहा दिवसांचा तुरुंगवास संपला. महिला अपहरणप्रकरणी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने रेवण्णा यांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Rajasthan : झुंझुनूच्या HCL खाणीत भीषण अपघात; लिफ्ट तुटल्याने 14 अधिकारी आत अडकले, बचावकार्य सुरू

राजस्थानमधील झुंझुनू येथे मंगळवारी रात्री मोठा अपघात झाला. खेत्री परिसरात असलेल्या हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) च्या कोलिहान खाणीत लिफ्ट तुटली. त्यामुळे कोलकाताहून आलेल्या दक्षता पथकासह कंपनीचे 14 अधिकारी आत अडकले. अपघातानंतर खदानी परिसरात एकच खळबळ उडालीये. याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. खाणीत अडकलेल्या सर्व अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

Israel Attack : इस्रायलच्या हल्ल्यात माजी भारतीय अधिकारी ठार

गाझा : इजिप्तच्या सीमेवर असलेल्या रफाह शहरात सोमवारी इस्रायलच्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्रांच्या वाहनातून प्रवास करणारे भारतीय अधिकारी कर्नल (निवृत्त) वैभव अनिल काळे यांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनने मंगळवारी काळे यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Koregaon Bhima Case : गौतम नवलखा यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली : कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. नवलखा यांच्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती वाढविण्यास न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एस. व्ही. एन. भट्टी यांच्या खंडपीठाने नकार दिला. नवलखा यांना घरात नजरकैदेत (हाऊस अरेस्ट) ठेवण्यात आले होते.

Ghatkopar Hoarding Collapse : मुंबईतील मृतांची संख्या चौदावर, रुग्णालयांत 44 जणांवर उपचार सुरू

मुंबई : घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर गेला आहे. वेगवेगळ्या रुग्णालयांत ४४ जणांवर उपचार सुरू असून ३१ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. रात्री चार जणांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले होते तर उपचारादरम्यान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सकाळपासूनच संबंधितांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी राजावाडी रुग्णालयात गर्दी केली होती.

Lok Sabha Elections : महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींचा आज घाटकोपरमध्ये रोड शो

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि राज्यातील अखेरचा टप्पा २० मे रोजी पार पडत आहे. ठाणे, पालघर, कल्याणसह मुंबईतील तब्बल १० मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीत प्रमुख लढती होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज (ता. १५) घाटकोपर येथे रोड-शो आयोजित करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. राज्यात वळवाच्या सरींनी हजेरी लावल्याने उन्हाचा चटका काही अंशी कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात येत्या बुधवारी (ता. १५) वादळी वाऱ्यासह पावसाचा तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला आहे. घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर गेला आहे. वेगवेगळ्या रुग्णालयांत ४४ जणांवर उपचार सुरू असून ३१ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com