Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान होत आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

Ghatkopar hoarding Accident: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Ghatkopar hoarding : दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार; देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल

घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Ghatkopar hoarding collapse: : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी

Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या संथ गतीमुळे प्रवाशांना मनस्ताप

पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक संथ गतीने सुरु असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वादळी वाऱ्यामुळं वांगणी रेल्वे स्टेशनवरील पत्रे गेले उडून

वादळी वाऱ्यामुळं वांगणी रेल्वे स्टेशनवरील पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळं पावसामुळं स्टेशनवरील प्रवाशांचे हाल होत आहेत.

घाटकोपरमध्ये होर्डिंगखाली 100 जण अडकल्याची भीती, NDRFला केलं पाचारण

मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळं घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर भागात होर्डिंगचा एक लोखंडी सांगाडा कोसळला. याखाली अनेक वाहनं अकडून पडली आहेत. तसेच सुमारे १०० जण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यामध्य ३५ जणांना वाचवण्यात यश आल्याचीही माहिती आहे. यातील जखमींना उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. पण उर्वरित लोकांना बाहेर कढण्यासाठी आता एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी

मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावर एक खांब कोसळल्यानं ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळं ठाणे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. ठाण्यातील स्थानकात महिलांच्या डब्यात शिरण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे.

भाजप नेते दिलीप घोष यांच्या वाहनावर दगडफेक; दोन सुरक्षारक्षक जखमी

मुंबईत अनेक ठिकाणी ओव्हरहेड वायरमुळे लोकल विस्कळीत

मुंबईत नाहूर ते मुलुंड दरम्यान ओव्हर हेड वायरचा खांबामध्ये तांत्रिक बिघाड झाला असून बदलापूरला ओव्ह हेड वायरवर झाडाची फांदी पडली आहे. वाशीलाही ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाला आहे. वाऱ्याच्या अतिवेगामुळे लोकल सेवेवर परिणाम होत आहे.

बदलापूर : वादळी वाऱ्यासह गारपीट अन् जोरदार पाऊस!

बदलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. काही ठिकाणी गारपीटही झाल्याचं सांगितलं जात आहे. झाडाची फांदी बदलापूर स्थानकातील ओव्हरहेड वायरवर पडल्यानं रेल्वे सेवा विस्कळित झाली.

लालबाग पुलावर टेम्पो पलटी होऊन अपघात

दृश्यमानता कमी झाल्यानं लालबाग पुलावर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचल्याची घटना घडली आहे. वसईतील टोपवाडा परिसरात तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर ही घटना घडली आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वसईत आले होते. हेलिकॉप्टरचं चाक खचल्यानं ते एका बाजुला कललं मात्र दुर्घटना टळली आहे. सीएम आणि अमित शहा बायरोड मुंबई एअरपोर्टला येत आहेत. पाऊस आणि धुळीमुळे हेलिकॉप्टर सेवा रद्द करण्यात आली आहे.

मुंबईत अचानक आलेल्या पावसाचा मध्य रेल्वेला फटका

मुंबईत अचानक आलेल्या पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. यामुळं लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं आहे. तर एक्स्प्रेस ट्रेनना देखील याचा फटका बसला आहे. अनेक ट्रेन मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. ऐन गर्दीच्यावेळी रेल्वे सेवा विस्कळित झाल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

वडाळ्यात कार पार्किंगसाठी बनवण्यात येणारे बांधकाम कोसळले

मुंबईतल्या वडाळा भागात मोठी दुर्घटना घडली आहे. श्रीजी टॉवरच्या शेजारी कार पार्किंगसाठी बनविण्यात येत असलेले बांधकाम कोसळले आहे. त्याखाली कामगार व रस्त्यावरील नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईकडून ठाण्याकडे येणारी वाहतूक धीम्या गतीने

मुंबई, कल्याण, ठाणे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम उपनगरातील वाहतूक व्यवस्थेवरही होत आहे. मुंबईकडून ठाण्याकडे येणारी वाहतूक धीम्या सुरु आहे.

मुंबईत घाटकोपर-वर्सोवा मेट्रो वाहतूक विस्कळीत

मेट्रोच्या तारांवर बॅनर कोसळल्याने घाटकोपर-वर्सोवा दरम्यानची मेट्रो वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंधेरीकडून घाटकोपरकडे जाणारी मेट्रो थांबवण्यात आली असून प्रवांशांचा खोळंबा झाला आहे.

कल्याण-डोंबिवलीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

कल्याण डोंबिवली परिसरात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दुपारी 3 वाजल्या शहरात सोसाट्याचा वारा सुटल्याने शहरात धुळीचे वादळ उठले होते. त्यात अचानक पावसाच्या सरी आल्याने नागरिकांची धांदल उडाली.

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे अमरावती विद्यापीठाचे आवाहन

अमरावती विद्यापीठाच्या काही उन्हाळी २०२४ परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याबाबत सर्व महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई- गोवा महामार्गावर एक तासापासून वाहतूक कोंडी

मुंबई- गोवा महामार्गावर एक तासापासून वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

भाजप उमेदवार माधवी लता यांच्यावर गुन्हा दाखल

भाजप उमेदवार माधवी लता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या काही महिलांचा बुरखा उघडून त्यांची ओळख माधवी लता यांनी तपासली होती. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्याविरोधात मलकपेट येथे तक्रार दाखल केली होती. मी उमेदवार आहे त्यामुळं मी त्या महिलांची ओळख तपासू शकते, असं स्पष्टीकरण माधवी लता यांनी दिलं होतं. माधवी लता यांच्या विरोधात MIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी निवडणूक लढवत आहेत.

PM Modi: 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत तर आम्ही घालू', बिहारमधून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे पोहोचले. जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले, “भारतीय आघाडीच्या नेत्यांकडून कसली वक्तव्ये येत आहेत. पाकिस्तानने बांगड्या घातल्या नसल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत तर आम्ही घालू.''

Supreme Court: निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

  • लोकसभेच्या पहिल्या दोन टप्यातील मतदानाची आकडेवारी उशिरा जाहिर केल्याने निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

  • ADR (असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स) कडून दाखल करण्यात आली होती याचिका

  • याचिकाकर्त्यांचे वकिल प्रशात भुषण यांनी तातडीनं सुनावणी घेण्याची केली मागणी

  • सध्या लोकसभेच्या निवडणूका सुरू आहेत त्यामुळं कोर्टानं तातडीनं सुनावणी घ्यावी - प्रशात भुषण

  • निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुरुवातीच्या मतदानाच्या टक्केवारीच्या आकडेवारीत मोठी वाढ, याचिकेत उल्लेख

  • या प्रकरणी 17 मे रोजी सुनावणी घेऊ, न्यायमुर्ती संजीव खन्ना यांची याचिकाकर्त्यांना माहिती

Yogi Adityanath: भारतात 80 कोटी लोकांना मोफत रेशन सुविधेचा लाभ मिळत आहे- योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "भारतात 80 कोटी लोकांना मोफत रेशन सुविधेचा लाभ मिळत आहे. पाकिस्तानची लोकसंख्या 23 ते 24 कोटी आहे. पाकिस्तानमध्ये 1 किलो पिठासाठी भांडणे सुरू आहेत. पीओकेमध्ये भारताचा एक भाग बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत कारण भारतावर पीएम मोदींचे राज्य आहे.

Rahul Gandhi: म्हणूनच मी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे- राहुल गांधी

काँग्रेस नेते आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी यांनी जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, "काही दिवसांपूर्वी मी आई (सोनिया गांधी) यांच्यासोबत बसलो होतो... मी आईला सांगितले होते की एक-दोन वर्षांपूर्वी मी एका व्हिडिओमध्ये म्हटले होते की, मला दोन माता आहेत, एक सोनिया गांधी आणि दुसरी इंदिरा गांधी. ही माझ्या दोन्ही आईच्या कर्माची भूमी आहे, म्हणूनच मी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे.''

PM Modi: ही देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक- पीएम मोदी

बिहारमधील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक ही एक निवडणूक नसून ती देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे.

निवडणुकीच्या प्रचारासाठी हेमंत सोरेन यांचा जामीन फेटाळला

माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन मिळावा असा केलेला अर्ज सुप्रीम कोर्टाने नामंजूर केला आहे. आता सोरेन यांना अंतरिम जामीन आणि अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 17 मे रोजी होणार सुनावणी होणार आहे.

Raj Thackeray: वायकर राज ठाकरेंच्या भेटीला

शिवसेना शिंदे गटाचे लाकसभा उमेदवार रवींद्र वायकर यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

Baramati EVM: बारामतीतील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही पुन्हा सुरू

बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही बंंद झाले होते. शरद पवार गटाने केलेल्या तक्रारीनंतर ते पुन्हा सुरू झाले आहेत.

CBSE Result: सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर

CBSE च्या इयत्ता 12 चा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये 87.98% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 0.65% ने वाढली आहे.

पुण्यात भाजप कार्यकर्ते आक्रमक, बुथवर केलं ठिय्या आंदोलन

मतदानाच्या बूथ वर काँग्रेस पक्षाचे बॅनर लावल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बॅनर काढण्यासाठी बुधवार भाजप कार्यकर्त्यांसाठी ठिय्या आंदोलन केलं होतं.पुण्यातील फडके हाऊस चौक येथे असलेल्या बुथवर भाजप कार्यकर्ते एकवटले आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी सुरूच

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी सुरू असल्याची माहिती आहे. कस्टम्स विभागाने २२.१४ किलो सोनं जप्त केलं आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत १३.५६ कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी ११ प्रवाश्यांना अटक करण्यात आली आहे. वेगवेगळ्या २० प्रकरणांमध्ये कस्टम्स विभागाने कारवाई केली आहे. गुदद्वार तसेच अंतर्वस्त्र आणि कॉर्डबोर्ड शीटमधून सोन्याची तस्करी केली जात होती

Mumbai Local:  मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण आणि कुर्ल्यादरम्यान लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Police : साकीनाका पोलिसांनी जोधपूरवरून केला ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश

साकीनाका पोलिसांनी जोधपूरवरून ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. एकूण १०४ किलो एम डी जप्त करण्यात आलं आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर मोगरा खुर्द, जोधपूर, राजस्थानमध्ये गुन्हे शाखेने छापा टाकला. १०१.१२५ कोटी रुपयांच्या ६७.५ किलो द्रव स्वरूपातील एमडी तसेच १.५ किमतीचे १.२ मेफेड्रॉन जर जप्त करण्यात आले आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये साकीनाका पोलिसांनी १.४ कोटी रुपयांचे एम जप्त केलं होत. त्या केसच्या तपासादरम्यान १.४० कोटी रुपयांचे जप्त एम डी करण्यात आलं होतं. त्या केसचा मागोवा घेत असताना एमडी फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे.

SSLC Exam Result : 78 शाळांचा दहावीचा निकाल शून्य टक्के

बंगळूर : दहावी (एसएसएलसी) परीक्षेच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात शून्य निकाल नोंदवणाऱ्या अनेक शाळांमध्ये केवळ एकच विद्यार्थी होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशा शाळांच्या मान्यता नुतनीकरणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दहावीच्या परीक्षेत सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेल्या ७८ शाळा आहेत. त्यापैकी तब्बल ५२ शाळांमध्ये एक ते नऊ विद्यार्थी शिकत होते. निकालात ३४ वा क्रमांक मिळवणाऱ्या गुलबर्गा जिल्ह्यात शून्य निकाल असलेल्या सर्वाधिक शाळा आहेत.

Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हेमंत सोरेन यांनी झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं आहे, ज्यात त्यांच्या अटकेचे समर्थन करत याचिका फेटाळण्यात आलीये. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सोरेन यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने ३१ जानेवारीला अटक केली होती. तेव्हापासून ते बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात आहे.

Ichalkaranji Crime : इचलकरंजीत तरुणाचा खून, धारदार शस्त्राचे वार

इचलकरंजी : येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपानजीक मोकळ्या जागेत एका तरुणाचा धारदार शस्राने खून करण्यात आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. राकेश धर्मा कांबळे (वय ३२, रा. गणेशनगर, गल्ली नंबर ९) असे त्याचे नाव आहे.

Pushkar Singh Dhami : मुंबईच्या जुहू बीचवर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मुलांसोबत लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद

मुंबई : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे मुंबईतील जुहू बीचवर मॉर्निंग वॉक करताना मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. शिवाय, त्यांनी समुद्रकिनारी योगासने करणाऱ्या लोकांशीही संवाद साधला. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री धामी सध्या मुंबईत आहेत.

Prajwal Revanna : प्रज्वलला आणण्यासाठी एसआयटी परदेशात जाणार नाही - गृहमंत्री परमेश्वर

बंगळूर : हसन खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करणारे विशेष तपास पथक (एसआयटी) त्यांना परत आणण्यासाठी परदेशात जाणार नाही आणि इंटरपोलच त्याच्याबद्दलची माहिती कळवेल, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी रविवारी सांगितले.

Palghar Lok Sabha : भाजप लोकसभा निवडणुकीत 240 जागांच्या पुढे जाणार नाही : प्रकाश आंबेडकर

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आता काही मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते आता मंगळसूत्राकडे, मुस्लिम समाजाकडे येत आहेत. देशाची फाळणी होईल, असे विधान करत आहेत. नरेंद्र मोदींची ही पराभूत मानसिकता आहे. भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीत २२० ते २४० जागांच्या पुढे जाणार नाही, आता हे त्यांच्या बोलण्यावरूनच कळून चुकले. माझे भाकीत आता खरे ठरू लागले आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या वंचितच्या उमेदवार विजया म्हात्रे यांच्या प्रचारसभेसाठी ते आले होते.

Alamgir Alam : मंत्री आलमगीर आलम यांना ED कडून नोटीस

झारखंड : चंपाई सोरेन सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरात सुमारे 32 कोटी रुपये सापडलेत. ईडीने नोकर आणि स्वीय सचिवाला यापूर्वीच अटक केली आहे. रोकड सापडल्यानंतर आलमगीर आलम एकाकी पडला आहेत. त्यांना ईडीने समन्स पाठवले आहे. आलम यांना 14 मे रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Lok Saba Elections2024 : आंध्र प्रदेश, ओडिशामध्ये लोकसभेसोबतच विधानसभेसाठी आज मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासह आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुका आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एकाच वेळी मतदान होत आहे. आंध्र प्रदेश विधानसभेच्या सर्व 175 जागांसाठी आणि ओडिशा विधानसभेच्या 28 जागांसाठी आज मतदान होत आहे.

Vijay Singh Mohite-Patil : विजयसिंह मोहिते-पाटलांचा आज फलटणमध्ये मोर्चा

फरांदवाडी : नीरा उजवा कालव्याचे पाणी गळतीच्या नावाखाली बंद केल्याच्या निषेधार्थ आज (सोमवारी) माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतकरी फलटण येथील नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.

Nira Canal : नीरा उजवा कालव्याला गळती, कालवा बंद झाल्याने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी

फलटण शहर : नीरा उजवा कालव्याचे आवर्तन सुरू असताना फलटण शहरानजीक कोळकी येथे कालव्याला मोठे भगदाड पडल्याने कालवा बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तीव्र उन्हाळा असताना आणि अद्याप भिजवण बाकी असताना अचानक कालवा बंद झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरलीये.

Highway Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर बस-ट्रकच्या धडकेत एक ठार, चार गंभीर

मोडनिंब : पुणे-सोलापूर महामार्गावरील खंडाळी येथे लक्झरी बस व ट्रक यांच्या झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (ता. १३) पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात घडला. पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या एमएच १२ एसपी ५२७२ या मालवाहतूक ट्रकला मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या एमपी ०९ डीएल ८०९१ या खासगी लक्झरी बसने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये खासगी बसच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे.

Weather Update : राज्यभरात वळवाचा दणका सुरूच, बहुतांश ठिकाणी आजही ढगाळ हवामान

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान होत आहे. 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर आज मतदान होणार आहे. तसेच वळवाच्या पावसाने राज्यात चांगलाच दणका दिला आहे. रविवारी (ता. १२) चौथ्या दिवशीही अनेक ठिकाणी पाऊस पडला, तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला असून, बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान होते. प्रख्यात नेत्रचिकित्सक, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना उद्या (मंगळवार) श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्काराने फलटण येथे सन्मानित करण्यात येणार आहे. ‘आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास आम्ही आमचे अणुधोरण बदलू,’ असे म्हणत इराणने इस्राईलवर अणुहल्ला करण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला. सिलिकॉन सिटी बंगळूरसह राज्याच्या अनेक भागांत सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. यामुळे राजधानीत वाहतुकीची कोंडी झाली. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.