Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विविध विषयांमध्ये पीएच.डी.साठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट या परीक्षेची मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

निवडणुका झाल्या की मोदीजी मरा-मरा म्हणतात- उद्धव ठाकरे

निवडणुका आल्या की मोदीजी राम-राम म्हणतात, निवडणुका झाल्या की मरा-मरा म्हणतात.. असा आरोप उद्धव ठाकरेंनी मुंबईतून केला.

रवींद्र धंगेकर यांचं सहकार नगर पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलन

आमदार रवींद्र धंगेकर यांचं सहकार नगर पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही म्हणत धंगेकरांचं निषेध आंदोलन सुरु आहे.

महायुतीसाठी ठाण्यात राज ठाकरेंची तिसरी सभा

मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंची तिसरी सभा ठाण्यामध्ये होत आहे.

पॅरामोटरिंग करताना तरुणीचा अपघात

जेजुरीमध्ये पॅरामोटरिंग करताना तरुणीचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणीवर उपचार सुरु आहेत.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची ट्रॉम्बेत सभा

उद्धव ठाकरे यांची आज ट्रॉम्बेमध्ये सभा होणार आहे. पाचव्या टप्प्यात मुंबईसह, ठाणे, भिवंडीमध्ये सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाआघाडीची सभा होत आहे.

IGI Airport  : दिल्ली विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

दिल्लीतीन दोन हॉस्पिटल्सना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर आता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.

Uttarakhand CM Pushkar Singh Dhami : उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री मुंबईत

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हे मुंबई उत्तर मध्यचे भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांनी पब्लिक मिटिंगला उपस्थिती लावली.

Bomb threat email: दिल्लीतील सरकारी हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी

बुरारी सरकारी हॉस्पिटल आणि संजय गांधी हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Pune News: शहरातील सर्वाधिक गाड्यांच्या संख्येमुळे पुण्यातील प्रदूषण वाढले

पुण्यात गाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच शहरातील प्रदूषणामध्ये वाढ झाल्याची माहिती आहे. एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय.

MNS: 18 वर्षानंतर शिवसैनिकांना राज ठाकरे यांना ऐकण्याची संधी

डोंबिवली, ता. 12 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे शिवसैनिकांना दिवंगत बाळासाहेबांची आठवण करून देते. राज यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर शिवसैनिक राज यांच्या मार्गदर्शनापासून त्यांच्या पाठिंब्या पासून दूर होते. परंतु आज खऱ्या अर्थाने त्यांना राज यांच्या खंबीर पाठिंब्याची साथ, त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. जवळजवळ 18 वर्षानंतर राज ठाकरे हे शिवसेना व धनुष्यबाण या पक्षासाठी राज यांनी तोफ धडाडणार आहे. त्याअनुषंगाने आज कित्येक शिवसैनिकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार असल्याचे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी येथे व्यक्त केले

Eknath Khadse: देशहितासाठी एकनाथ खडसे भाजपसोबत आले- रक्षा खडसे

देशहितासाठी एकनाथ खडसे भाजपसोबत आले आहेत. सोबत आल्याने भाजपला त्यांचा फायदाच होणार आहे. व्यक्तिगत विषयावर राजकारण थांबलं पाहिजे, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

Economy: भारत २०२५ मध्ये चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार- अमिताभ कांत

भारत २०२५ मध्ये चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असा विश्वास अमिताभ कांत यांनी व्यक्त केला आहे.

Rajasthan: दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; तिघांचा मृत्यू

Rajasthan: दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर दौसा येथे ट्रकने चिरडून कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

Narendra Modi: बराकपूरमध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पश्चिम बंगालमधील बराकपूर येथे रोड शो झाला.

PM Modi : देशाची जनताच मोदींची वारस.. तुम्हीच माझा परिवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये आहेत. यावेळी प्रचारसभेत त्यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली. TMC नेते आपल्या वारसांसाठी संपत्ती गोळा करत आहेत, त्यांना देशाशी काहीही घेणं-देणं नाही. मात्र मोदींची वारस ही देशाची जनताच आहे.. तुम्हीच माझा परिवार आहात. त्यामुळे मोदीदेखील त्यांच्या वापरासाठी, म्हणजे तुमच्यासाठी काम करत आहे; असं ते म्हणाले.

Kejriwal : दिल्ली-पंजाबप्रमाणे देशभरात 200 युनिट वीज मोफत देऊ; आपल्याकडे तेवढी क्षमता आहे

आपल्या देशात एवढी क्षमता आहे की संपूर्ण देशासाठी 24 तास वीजपुरवठा करू शकतो. दिल्ली-पंजाबमध्ये आम्ही 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली आहे. सत्तेत आल्यास संपूर्ण देशात हे आम्ही करू, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

weather Update : मुंबई-पुण्यात ढगाळ वातावरण; आजही पावसाची शक्यता

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. आजदेखील मुंबई आणि पुण्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता दिसत आहे.

Arvind Kejriwal : 'आमच्या सरकारला धक्काही पोहोचवता आला नाही.. त्यांचा प्लॅन फसला' - केजरीवाल

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. "ते आमचं सरकार पाडू शकले नाहीत, ना आमचा कोणी आमदार विकला गेला.. किंवा मग आमच्या पंजाबमधील सरकारला देखील त्यांना काहीही करता आलं नाही. त्यांचा पूर्ण प्लॅन फेल गेला" असं केजरीवाल म्हणाले आहेत.

Jalgaon Election : जळगावातील मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण; उद्या पार पडणार चौथ्या टप्प्यातील मतदान

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात पूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येत असून, उद्या पहाटे 5.30 वाजता मॉक व्होटिंग होईल असं त्यांनी स्पष्ट केलं.

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक; शस्त्रास्त्रे जप्त

भारतीय आर्मी, बंदीपोरा पोलीस आणि CRPF यांनी मिळून केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. यासोबत भरपूर प्रमाणात शस्त्रास्त्रे देखील जप्त करण्यात आली. याप्रकरणी केस रजिस्टर करण्यात आली आहे.

Gulabrao Patil : उन्हामुळे मतदानाची टक्केवारी घसरली; मात्र आम्हीच जिंकू

सध्या उन्हामुळे लोक मतदानासाठी बाहेर पडत नाहीयेत. त्यामुळे 50 टक्के देखील मतदान होत नाहीये. सर्व पक्ष मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, मतदान कमी असलं तरी आम्हीच जिंकू; असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.

Chandrashekhar Bawankule: "ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच"

"एकीकडे पंतप्रधान मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच," अशी पोस्ट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर केली आहे.

Arvind Kejriwal: केजरीवाल घेणार आमदारांची भेट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज प्रथम पक्षाच्या आमदारांची भेट घेणार आहेत.

Badrinath Dham : बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले; भक्तांसाठी प्रवेश खुला

उत्तराखंंडमधील श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे आजच्या शुभ मुहूर्तावर उघडण्यात आले आहेत. भाविकांसाठी याठिकाणी प्रवेश खुला करण्यात आला आहे.

Kami Rita Sherpa : कामी रीता शेरपा यांची अनोख्या विक्रमाला गवसणी; तब्बल 29 वेळा सर केला एव्हरेस्ट

नेपाळी शेरपा कामी रीता यांनी पुन्हा एकदा एव्हरेस्ट शिखर सर करुन नवा विक्रम नोंदवला आहे. यापूर्वी सर्वाधिक वेळा (28) एव्हरेस्ट सर केल्याचा रेकॉर्ड त्यांच्याच नावावर होता. आता पुन्हा एकदा या शिखरावर गेल्यामुळे, 29 वेळा एव्हरेस्टची चढाई केलेले ते एकमेव व्यक्ती ठरले आहेत.

Kirit Somaiya :  किरीट सोमय्यांचा डीपफेक फोटो व्हायरल; तक्रार दाखल

किरीट सोमय्यांचा एक डीपफेक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. यामध्ये ते हातात मशाल घेऊन उद्धव ठाकरेंचा प्रचार करत असल्याचा दावा करण्यात येतो आहे. मात्र हा खोटा फोटो असून त्याबाबत सोमय्यांनी तक्रार दाखल केली आहे.

Dudhganga River : दूधगंगा नदीपात्रात मगरीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

सदलगा, कुरुंदवाड : दत्तवाड-सदलगा दरम्यानच्या दूधगंगा नदीपात्रात मगरीने सदलगा येथील शेतकऱ्याला ओढून नेले. त्यांच्यावर हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. महादेव पुन्नापा खुरे (वय ७२, रा. सदलगा) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी उघडकीस आली. दरम्यान, या घटनेने दूधगंगा काठावरील मगरींची दहशत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Canadian Police : खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी आणखी एका भारतीयाला अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी चौथ्या भारतीयाला अटक केली आहे. हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीवर यापूर्वीच शस्त्र तस्करीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असलेल्या निज्जरच्या हत्येचा आणि कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. याआधी कॅनडाच्या पोलिसांनी आणखी तीन भारतीयांना अटक केली होती.

Narendra Modi : PM मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर; ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात होणार 4 जाहीर सभा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आज ते तिथं चार जाहीर सभा घेणार आहेत. PM मोदी सकाळी 11:30 वाजता उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बराकपूर येथे भाजप उमेदवार अर्जुन सिंह यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेतील. त्यानंतर, पंतप्रधान दुपारी 1 वाजता भाजप उमेदवार चॅटर्जी यांच्या समर्थनार्थ हुगळीत लोकांना संबोधित करतील. आरामबागमध्ये पीएम मोदी दुपारी अडीच वाजता भाजप उमेदवार अरुप कुमार यांचा प्रचार करतील. हावडा येथेही पंतप्रधानांची दुपारी ४ वाजता सभा होणार आहे.

Karnataka Legislative Council Elections : विधान परिषदेच्या पाच जागा भाजप लढवणार

बंगळूर : कर्नाटक विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. भाजप सहापैकी पाच मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. भाजपचा मित्र पक्ष धजदला केवळ एक जागा देण्यात आली आहे. भाजप उमेदवारांची यादी ः ईशान्य पदवीधर ः अमरनाथ पाटील, दक्षिण पश्चिम पदवीधर ः डॉ. धनंजया सरजी, बंगळूर पदवीधर ः ए. देवेगौडा, दक्षिण पूर्व शिक्षक ः वाय. ए. नारायण स्वामी, दक्षिण शिक्षक ः ई. सी. निंगाराजू. धजदने दक्षिण पश्चिम शिक्षक मतदारसंघातून एस. एल. भोजेगौडा यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

UGC NET Exam : यूजीसी नेट परीक्षेसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ

मुंबई : देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विविध विषयांमध्ये पीएच.डी.साठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट या परीक्षेची मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १० मे होती. अनेक शिक्षक, कर्मचारी हे या निवडणूक कामात असल्याने यूजीसी नेटसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. १६ ते १७ मे रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत विद्यार्थी परीक्षा शुल्क भरू शकतात.

Obscene Video Pen Drive Case : खासदार प्रज्वलला अटक करण्यासाठी एसआयटीचं विशेष पथक तयार

बंगळूर : हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर अश्‍लील व्हिडिओ पेन ड्राईव्हप्रकरणी तसेच महिलांच्या लैंगिक अत्याचारासह तीन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर परदेशात पसार असलेल्या रेवण्णा यांना अटक करण्यासाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) एक विशेष पथक तयार केले आहे. जर्मनीत लपून बसलेल्या प्रज्वल यांना भारतात आणण्याची त्यांनी तयारी केली आहे.

Weather Update : पश्चिम महाराष्ट्राला वळवाने झोडपले, आजही 'या' भागांत पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Latest Marathi News Live Update : पश्चिम महाराष्ट्रात काल सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या वळवाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. आजही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कालपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीडमध्ये मतदान होणार आहे. त्याचबरोबर देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विविध विषयांमध्ये पीएच.डी.साठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट या परीक्षेची मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर अश्‍लील व्हिडिओ पेन ड्राईव्हप्रकरणी, तसेच महिलांच्या लैंगिक अत्याचारासह तीन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर परदेशात पसार असलेल्या रेवण्णा यांना अटक करण्यासाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) एक विशेष पथक तयार केले आहे. कर्नाटक विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. भाजप सहापैकी पाच मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. भाजपचा मित्र पक्ष धजदला केवळ एक जागा देण्यात आली आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.