esakal | राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी लालकृष्ण अडवाणी यांची भावूक प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Lal_20Krishna_20Advani.jpg

अयोध्येतील भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी लालकृष्ण अडवाणी यांची भावूक प्रतिक्रिया

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- अयोध्येतील भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणे माझ्यासाठी आणि संपूर्ण भारतीयांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. राम मंदिर सशक्त, संपन्न आणि सौहार्दपूर्ण राज्याच्या रुपात भारताचे प्रतिनिधित्व करेल. जेथे सगळ्यांना न्याय मिळेल आणि कोणी वेगवेगळं राहणार नाही, असं ते म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात एक संदेश प्रसिद्ध केला आहे.

अयोध्येतील निमंत्रितांना देण्यात येणार खास चांदीचा शिक्का; पाहा फोटो

जीवनातील काही स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागतो. मात्र, जेव्हा ते पूर्ण होतात तेव्हा आयुष्य सार्थक झाल्यासारखं वाटतं. असच एक स्वप्न जे माझ्या ह्रद्याच्या खूप जवळ होतं ते पूर्ण होत आहे. राम जन्मभूमीवर प्रभु रामाचे मंदिर निर्माण होणे भाजपचे स्वप्न राहिले आहे. मी विनम्रतेचा अनुभव करतो की मला रामजन्मभूमि आंदोलनात सोमनाथ ते अयोध्येपर्यंत रामरथ यात्रेचे नेतृत्व करण्याचे दायित्व प्राप्त झाले. यावेळी असंख्य लोकांच्या आकांक्षा आणि उर्जेने मी प्रेरित झालो, असं ते म्हणाले आहेत.

या शुभ मुहूर्तावर मी सर्व संत, नेता आणि देश-विदेशातील लोकांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांनी राम जन्मभूमी आंदोलनात योगदान आणि बलिदान दिले. मला या गोष्टीचा आनंद आहे की 2019 साली सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला. त्यामुळे राम मंदिराचे निर्माण शांतीपूर्ण वातावरणात सुरु होत आहे. यामुळे भारतीयांचे परस्पर संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मदत करेल, असंही अडवाणी म्हणाले आहेत. 

राम मंदिर दिसणार कसं? ट्रस्टने प्रसिद्ध केले 8 फोटो

श्रीराम यांचे नाव भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच्या धरोहरमध्ये सर्वोच्च आहे. प्रभु राम विनय, मर्यादा आणि शिष्टाचार यांचे मूर्तिमंत रुप आहेत. मला अशी श्रद्धा आहे की प्रमु रामाचे मंदिर सर्व भारतीयांमध्ये श्रीरामाच्या या गुणांना आत्मसात करण्यासाठी प्रेरणा देईल. मला असाही विश्वास आहे की, श्रीराम मंदिर एक शांतिपूर्ण सौहार्दपूर्ण राष्ट्राच्या रुपात भारताचे प्रतिनिधित्व करेल, जेथे सगळ्यांसाठी न्याय असेल आणि कोणीही बहिष्कृत राहणार नाही, जेणेकरुन आपण रामराज्याच्या दिशेने मार्गक्रमण करु जे सुशासनाचे प्रतिक असेल, असंही अडवाणी म्हणाले आहेत.

दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी काही निवडक लोकांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिर आंदोलनात महत्वाची भूमिका असणारे लालकृष्ण अडवाणी यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं नाही. 

(edited by-kartik pujari)

loading image