झाशी (उत्तर प्रदेश) : झाशी जिल्ह्यातील एका खासगी ग्रुप लोन देणाऱ्या बँकेतून (Private Bank Scandal) धक्कादायक (Jhansi Loan Incident) घटना उघडकीस आली आहे. कर्जाचा हप्ता न भरल्याच्या कारणावरून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एका महिलेला जबरदस्तीने तासन्तास बँकेत बसवून ठेवल्याचा आरोप झाला आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करून महिलेची सुटका केली.