प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन; राज्य सरकारचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था
Sunday, 28 June 2020

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात दर रविवारी लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कर्नाटक सरकारने पुढील आदेशापर्यंत ५ जुलैपासून प्रत्येक रविवारी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बंगळुरु : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात दर रविवारी लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कर्नाटक सरकारने पुढील आदेशापर्यंत ५ जुलैपासून प्रत्येक रविवारी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय रात्री ८ ते सकाळी ५ पर्यंत कर्फ्यू असणार आहे. २९ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कर्नाटकमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री एस. सुधाकर यांनी शनिवारी सांगितलं की, सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी १०,००० बेड्सची सोय असून संक्रमितांवर उपचार करण्यासाठी बहु-मजली ​​निवासी इमारतींचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं, सामान्य लक्षणं आणि गंभीर लक्षणं अशा प्रकारात रुग्णांची विभागणी करुन, त्यानुसार उपचारांसाठी वेगवेगळे नियम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचंही ते म्हणाले.

कर्नाटक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलैपासून प्रत्येक रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना कोणत्याही कामासाठी परवानगी देण्यात येणार नाही. तसेच, शहरातील भाजीपाला बाजारात जास्त गर्दी होऊ नये म्हणून सरकारने महानगरपालिका आयुक्तांना जास्तीत जास्त घाऊक भाजीपाला बाजारपेठा बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, भारतात आता ५ लाख ८ हजार ९५३ कोरोना रुग्ण आहेत. यापैकी २ लाख ९५ हजार ८८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १ लाख ९७ हजार ३८७ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन देशभरात १५ हजार ६०० वर मृत्यू झाले आहेत. परंतु दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वेगाने वाढते आहे. ही बाब भारतासाठी चांगलीच आहे. मागील २४ तासांमध्ये कोरोनाचे १० हजार २४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ३ लाखांच्या आसपास रुग्ण देशभरात बरे झाले आहेत अशीही माहिती केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown in Karnataka every Sunday from July 5 says CM BS Yediyurappa