Video: या लहानग्याची काय चूक हो?

वृत्तसंस्था
Thursday, 14 May 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले असून, रोजगार बंद झाल्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसतात.

चंदीगड (पंजाब): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले असून, रोजगार बंद झाल्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसतात. काळीज पिळवटावून टाकणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अन् त्याने 800 किलोमीटर ओढली दोरी...

अरविंद चव्हाण यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चालून-चालून थकलेला चिमुकला बॅगवरच झोपी गेला आहे. बॅगेला आई ओढताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. या लहानग्याची काय चूक हो? अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवताना दिसत आहेत.

दरम्यान, या व्हिडिओमधील मजूर पंजाबवरून आग्रामार्गे झाशीला पायी निघाले आहेत. लहान मुलगा पायी चालून थकल्यामुळे बॅगवर झोपी गेला. थकल्यामुळे त्याला शांत झोप लागली आहे. सोबतचे प्रवासी पुढे जात असल्यामुळे व आपला प्रवास थांबू नये म्हणून आई ओढत असून, प्रवास चालू ठेवत आहेत.

काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ आणि बातमी वाचाच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown migrant labour mother pulling his child trolly bag viral video