कोरोनानंतर आता पुन्हा येतंय 'हे' नवे संकट!

कृपादान आवळे
रविवार, 12 जुलै 2020

महाराष्ट्रातील विदर्भातही टोळधाड

- दुपारी बाराच्यादरम्यान सुरुवात

लखनौ : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानंतर आता देशात पुन्हा एकदा एक नवे संकट येऊ पाहत आहे. हे संकट म्हणजे टोळधाड. या टोळधाडीचा सामना सध्या उत्तर प्रदेशमधील काकोरीच्या अनेक गावांना करावा लागत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

उत्तर प्रदेशातील या टोळधाडीच्या संकटाचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. या टोळधाडीने काकोरीच्या पहिया आजमपूर, तेजसिंह खेडा, दोना, नर्मदा खेडा यांसारख्या गावांना विळखा घातला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, मोठ-मोठ्याने ओरड-आवाज करत हे सर्व टोळधाड पळवून लावत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत जिल्हा कृषी अधिकारी ओ. पी. मिश्रा यांनी सांगितले, की या टोळधाडीविरोधात केमिकल स्प्रेची व्यवस्था करण्यात येत आहे. ही टोळधाड काल संडिला येथेही दिसली. त्यानंतर उन्नावच्या फतेहपूर चौरासी ब्लॉकच्या अनेक गावांमध्ये ही टोळधाड दिसली. ही टोळधाड आज सकाळी उन्नावपासून राजधानीच्या काकोरी ब्लॉकमध्ये शिरली. आता या गावात टोळधाड झाल्याचे पाहिला मिळत आहे. कृषी विभागही त्याविरोधात आले असून, टोळधाड हाकलून देत आहे. सायंकाळपर्यंत लखनौच्या सीमेपासून बाहेर काढण्यात आले. 

दुपारी बाराच्यादरम्यान सुरुवात

ही टोळधाड उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पोहोचली आहे. जुन्या शहरातील आकाशात टोळधाड झाली. काही वेळात ही टोळधाड रस्ते आणि गल्ल्यांमध्ये दिसली. आज दुपारी 12 वाजता हे निदर्शनास आले. उत्तर प्रदेशात लॉकडाऊन लागू असल्याने मोठी शांतता आहे. मात्र, भाजीपाल्याची काही दुकाने सुरु आहेत. टोळधाडचे मोठे संकट पाहता दुकानदार आपली दुकाने सोडून पळून गेले. 

टोळधाड

महाराष्ट्रातील विदर्भातही टोळधाड

कोरोनासारख्या महामारीच्या संकटानं देशासह संपूर्ण जगाचंच कंबरडं मोडलय. यात बळीराजा तर पुरताच कोलमडलाय. त्यानंतर आता टोळधाडीचे संकट आले आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील विदर्भात हे संकट आले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशात संकट आले आहे.  आता हे संकट महाराष्ट्रातील विदर्भात पोहोचलंय.

टोळधाडीची माहिती कमी

टोळधाड या नुसत्या नावानं धडकी भरविणाऱ्या या टोळधाडीबद्दल अनेकांना खूप कमी माहिती आहे. उभ्या पिकाला उध्वस्त करणारी टोळधाड म्हणून याकडे पाहिले जाते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Locust attacks on Lucknow in dozens of villages farmers is in Tension