Jharkhand Tourism : झारखंडचा लोध धबधबा; जिथे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात दडले आहे अथांग डोहाचे गूढ!

दाट जंगल, उंच कडे आणि दुधासारख्या शुभ्र प्रवाहात लपलेला अथांग डोह; साहस, निसर्गसौंदर्य आणि शांततेचा अनोखा संगम असलेले झारखंडचे लोध धबधबा पर्यटनस्थळ
Lodh Waterfall in Jharkhand: A spectacular cascade hiding the mystery of a deep plunge pool

Lodh Waterfall in Jharkhand: A spectacular cascade hiding the mystery of a deep plunge pool

Sakal

Updated on

दाट जंगल, उंच पर्वतरांगा आणि खडकांमधून वेगाने खाली कोसळणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह... निसर्गाचे हे रौद्र आणि मनमोहक रूप पाहायचे असेल, तर झारखंडमधील लोध धबधबा एकदा नक्की पाहायला हवा.

बुढा नदीवर वसलेला लोध धबधबा हा झारखंडमधील सर्वात उंच धबधबा मानला जातो. उंच कड्यावरून पाणी खाली कोसळताना त्याची शुभ्र धार अक्षरशः दुधाच्या प्रवाहासारखी दिसते. आजूबाजूला असलेले घनदाट जंगल आणि डोंगररांगांमुळे या ठिकाणचे सौंदर्य आणखी खुलते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com