Sanjeev Balyan: मुझफ्फरनगरचे भाजप उमेदवार संजीव बल्यान यांच्या ताफ्यावर हल्ला, प्रचारादरम्यान वाहनांची तोडफोड

Uttar Pradesh: केंद्रीय राज्यमंत्री आणि मुझफ्फरनगरमधील भाजपचे उमेदवार संजीव बल्यान यांच्या ताफ्यावर शनिवारी सायंकाळी अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. प्रचारावेळी त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला.
Sanjeev Balyan
Sanjeev BalyanEsakal

Uttar Pradesh: केंद्रीय राज्यमंत्री आणि मुझफ्फरनगरचे भाजपचे उमेदवार संजीव बल्यान यांच्या ताफ्यावर काल (शनिवारी) सायंकाळी अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली. हल्ल्यात प्रचाराच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड देखील करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजीव बल्यान मुझफ्फरनगरमध्ये प्रचारासाठी जात असताना अचानक अज्ञातांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक सुरू केली. ही दगडफेक नेमकी कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र विरोधक पराभवाच्या निराशेतून असे हल्ले करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Sanjeev Balyan
बेकायदेशीर मासेमारीकडे कानाडोळा सकाळ वृत्तसेवा अलिबाग, ता.29: रायगड जिल्ह्यात पर्ससीन व यांत्रिक मासेमारी पद्धतीने होणाऱ्या मासेमारीवरील कारवाई थंडावली असून त्याचे विपरीत परिणाम पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना सोसावे लागत आहे. समुद्रामध्ये मासेमारीचे प्रमाण दिवसेंदिव कमी होत चालले आहे. मासेमारीसाठी बोटी घेऊन गेलेले मच्छीमार पुन्हा माघारी परत असून तर बंदरावरील अनेक मासेमारी बोटी किनाऱ्यावरच उभ्या आहेत. केंद्र व राज्य सरकारचे बेसुमार मासेमारीवर नियंत्रण नाही. पुढेही नियंत्रण राखले गेले नाही तर मासेमारी धोक्यात येऊ शकते, असे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. पर्ससीन, एलईडी व ओव्हर फिशिंगसह बोटीची वाढलेली संख्या यामुळे मासेमारी हळूहळू कमी होत चालली आहे. अशा बेकायदेशीर मासेमारीवर वचक बसावा यावीत यासाठी रायगड जिल्ह्यात तीन महिन्यात एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पर्ससीन नौका, एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. याचा तोटा येथील मच्छीमारांना सोसावा लागत आहे. 1990 पासून रायगडमध्ये आधुनिक पद्धतीने मासेमारी करण्यास सुरुवात झाली. जादा क्षमतेच्या नौका, शीतगृह, लिलावगृह बांधण्यात आले, दुसऱ्या राज्यातून कामगार मागवण्यात आले. यातून मर्यादीत असलेल्या मासेमारीतून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. व्यावसायात स्पर्धा सुरु झाली; परंतु समुद्रातील मासे मर्यादीत स्वरुपातच राहिले. यामुळे 2010 च्या मस्त्यदुष्काळ सारख्या समस्या जाणवू लागल्या. आजच्या घडीला मच्छीमारांना आपला व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी कसरत करावी लागत असून यासाठी काही मच्छीमार नियमात न बसणाऱ्या मासेमारी पद्धतीचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. या बेकायदेशीर मासेमारीच्या विरोधातही येथे मच्छीमारांचा मोठा गट सक्रिय आहे, त्यांनी अनेकवेळा मच्छिमारांचा समुद्रात संघर्ष झालेला आहे. या विरोध करणाऱ्या पारंपारीक मच्छीमारांना आतापर्यंत अनेकवेळा शासनाला पत्रव्यवहार करुन या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली, परंतु बेकायदेशीर मच्छीमारांवर कारवाईचा वचक निर्माण झालाच नाही. त्यानंतरही विविध समस्येकडे प्रशासन दुर्लक्षच करत आहे. कर्जबाजारी होऊन मासेमारी व्यवसाय करत असून अनुदानित डिझेल परतावाही वेळेत मिळत नाही. कर्जाचा बोझा वाढतच आहे. त्यातच मासेमारीचे प्रमाण कमी झाल्याने मच्छिमारांसमोर संकटावर संकटे उभी राहत आहेत. ही संकटे शासनाच्या दुर्लक्षामुळे आणखी वाढत आहेत. ़़़ः------------------------------------ मासेमारी कमी झाल्याने मच्छिमारांसह या व्यवसायावर अवलंबून असलेली रोजगाराची मोठी साखळी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सरकारकडे अनेक मागण्या करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मच्छीमारांवरील संकटे वाढत असून अनेक संकटांमुळे तो उपासमारीच्या खाईत लोटला जात आहे. नव्या हंगामात एकही कारवाई एलईडी, पर्ससीन मच्छीमारांवर झालेली नाही. - सत्यविजय कोळी, अध्यक्ष थळ मच्छीमार सह. सो. ः-------------------------------------- पर्ससीन, इलईडीने केल्या जाणाऱ्या मासेमारीवर वचक बसावा, यासाठी सातत्याने कारवाई होत असते. मागील तीन महिन्यात तशी झालेली नाही.परंतु याच दरम्यान नौकांची तपासणी करणे सुरुच होते - संजय पाटील, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग रायगड

या संपूर्ण प्रकरणाबाबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधीर सैनी यांनी संजीव बल्यान यांच्या वाढत्या लोकप्रियतेला विरोधक घाबरले आहेत, त्यामुळेच ते अशा क्षुल्लक गोष्टी करत आहेत असं म्हणत निवडणुका स्वच्छ लढल्या पाहिजेत, असा हल्लाबोल केला आहे.

सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 6 ते 7 वाहनांचे नुकसान झाले असून 2 ते 4 जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. संजीव बल्यान एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करत असताना जिंदाबाद आणि मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. त्या रॅलीला अन्य काही उमेदवारांचे समर्थकही आले होते, असे त्यांनी सांगितले.

Sanjeev Balyan
Nitin Gadkari VS Congress : गडकरींचा ‘विकास’ विरुद्ध काँग्रेसचा ‘विकास’!

एसपी सत्यनारायण प्रजापती यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की काही वाहनांची तोडफोड झाली आहे, परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.

पश्चिम उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर लोकसभा जागा जाट पट्टा मानली जाते. 2013 च्या दंगलीमुळे मुझफ्फरनगर देशभरात चर्चेचा विषय बनले होते. गेल्या दोन निवडणुकांपासून येथे भारतीय जनता पक्षाचा गड राहिला असून आता त्यांच्या नजरा विजयाच्या हॅट्ट्रिककडे लागल्या आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे संजीव कुमार बल्यान यांनी ज्येष्ठ नेते अजित सिंह यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती.भाजपने पुन्हा एकदा संजीवकुमार बल्यान यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर हरेंद्र सिंह मलिक यांना इंडिया आघाडीने संधी दिली आहे.

Sanjeev Balyan
Prakash Ambedkar : घराणेशाही मोडणे हीच ‘वंचित’ची भूमिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com