Neelam Gorhe: भाजपने उमेदवार बदलण्यास भाग पाडले का? नीलम गोऱ्हेंनी स्पष्ट सांगितलं

Neelam Gorhe: शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
Neelam Gorhe
Neelam Gorheesakal

Neelam Gorhe:  भाजपने आम्हाला उमेदवार बदलण्यास भाग पाडले, अशी प्रतिमा तयार केली जात आहे. परंतु अशा प्रकारे गैरसमज पसरवून टोकाचा निष्कर्ष काढणे योग्य नाही. स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महायुतीतील घटक पक्ष प्रमुख अंतिम निर्णय घेतात. त्यामुळे अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल, असे शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना डावलण्यात आले. या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, "लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात महायुतीत प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होतीलच, असे नाही. स्थानिक राजकीय परिस्थितीचा  अंदाज घेऊन तिकीट देण्याबाबत पक्षप्रमुखांकडून निर्णय घेतला जातो. पक्षांतर्गत निर्णयावर मी भाष्य करणे योग्य नाही. "

"आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार कामाला लागलो आहोत. महायुती ही एकत्र काम करण्यासाठी केलेले समीकरण असते. त्याला अंतिम स्वरुप येण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे आमच्यात मतभेद झाले आहेत असे नाही. आमच्याकडे अजून कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केलेला नाही", असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

भाजपने उदयनराजे यांना दिल्लीत ताटकळत ठेवल्याच्या चर्चेबाबत त्या म्हणाल्या, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सर्वांना समान अधिकार दिले आहेत. छत्रपती उदयनराजे यांचा सन्मान कमी होईल, असे समजण्याचे कारण नाही. कारण ते जनतेच्या प्रश्नांसाठीच निवडणुकीत उतरत आहेत."

Neelam Gorhe
Shrikant Shinde on Ganpat Gaikwad: उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंचा गणपत गायकवाडांवर हल्लाबोल; म्हणाले, गुंड प्रवृत्ती...

पुण्यातील लढत दुहेरी होईल-

पुणे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे उतरल्याने लढत तिरंगी होईल, असे बोलले जात आहे. याबाबत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, "आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भरपूर मेहनत घेतात. परंतु मागील काही निवडणुकीतील अनुभव पाहता पहिल्यांदा त्यांचा जो उत्साह असतो, तो काही कारणामुळे मतदानापर्यंत राहत नाही, असे माझे निरीक्षण आहे. त्यामुळे पुण्याची निवडणूक मोहोळ आणि धंगेकर अशी दुहेरी होईल."

गरज असेल, तेथे प्रचाराला जाईन :

"अजित पवार यांचे जिल्ह्यातील काम चांगले आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारही सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांचा विजय होईल, अशी खात्री आहे. सामाजिक संस्था आणि बचत गटांच्या माध्यमातून यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात मेळावे घेतल्याने आमचा चांगला जनसंपर्क आहे. ज्या ठिकाणी माझी गरज असेल, तिथे मी प्रचाराला जाईन," असे त्यांनी नमूद केले.

पक्ष सोडला तरी आढळराव महायुतीतच -

एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्या पक्षाची हानी होतच असते. शिवाजीराव आढळराव हे शिवसेना सोडून गेल्याने पक्षाची हानी होईल. परंतु ते महायुतीतील दुसऱ्या घटक पक्षातच गेले आहेत. त्यामुळे आढळराव ताटातून वाटीत गेले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Neelam Gorhe
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' 6 भत्त्यांमध्ये होणार मोठे बदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com