Lok sabha election 2024 : काँग्रेसचे 'ते' तीन आश्वासनं कोणती? ज्यांची तुलना भाजपने ८८ वर्षांपूर्वीच्या मुस्लिम लीगच्या जाहीरनाम्याशी केली

भाजपच्या मते, १९३६ मध्ये मुस्लिम लीगने आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की, मुस्लिमांच्या शरिया पर्सनल लॉचं संरक्षण केलं जाईल. तेच २०२४ मध्ये काँग्रेसनेही म्हटलं आहे. ते अल्पसंख्यकांच्या वैयक्तिक कायद्याचं संरक्षण करतील, असं आश्वासन दिलं.
Lok sabha election 2024 : काँग्रेसचे 'ते' तीन आश्वासनं कोणती? ज्यांची तुलना भाजपने ८८ वर्षांपूर्वीच्या मुस्लिम लीगच्या जाहीरनाम्याशी केली

Congress Manifesto : काँग्रेसने शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ५ न्याय आणि २५ गॅरंटी असलेल्या या जाहीरनाम्याला 'न्यायपत्र' असं नाव देण्यात आलेलं आहे.

काँग्रेसने घोषित केलेल्या जाहीरनाम्यातील काही मुद्द्यांवरुन राजकीय वातावरण गरम झालं आहे. भाजपकडून सातत्याने काही मुद्द्यांवरुन काँग्रेसला टार्गेट केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेदरम्यान काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये तोच विचार झळकतोय जो स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला मुस्लिम लीगचा होता. मुस्लिम लीगचा १९३६ जाहीरनामा आणि २०२४चा काँग्रेसचा जाहीरनामा यांची तुलना केल्यात तीन मुद्दे जुळतात, असं ते म्हणाले.

Lok sabha election 2024 : काँग्रेसचे 'ते' तीन आश्वासनं कोणती? ज्यांची तुलना भाजपने ८८ वर्षांपूर्वीच्या मुस्लिम लीगच्या जाहीरनाम्याशी केली
Share Market Closing: ऑटो शेअर्सच्या जोरावर बाजारातील अनेक विक्रम मोडले, मार्केट कॅप 400 लाख कोटींच्या पुढे

भाजपच्या मते, १९३६ मध्ये मुस्लिम लीगने आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की, मुस्लिमांच्या शरिया पर्सनल लॉचं संरक्षण केलं जाईल. तेच २०२४ मध्ये काँग्रेसनेही म्हटलं आहे. ते अल्पसंख्यकांच्या वैयक्तिक कायद्याचं संरक्षण करतील, असं आश्वासन दिलं.

१९३६ मध्ये मुस्लिम लीगने म्हटलं होतं की, आम्ही देशात बहुसंख्यकांच्या विरोधात लढा देऊ. तर काँग्रेसनेही २०२४मध्ये भारतात बहूसंख्यकांसाठी जागा नसल्याचं म्हटलंय, असे भाजपचे आरोप आहेत.

तिसरा मुद्दा, १९३६ मध्येच मुस्लिम लीगने म्हटलं होतं की, आम्ही मुस्लिमांसाठी विशेष स्कॉलरशीप आणि नोकऱ्यांसाठी संघर्ष करु. २०२४ मध्ये काँग्रेसने म्हटलंय, आम्ही खात्री देतो की, मुस्लिम विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देऊ. या तीन मुद्द्यांवरुन भाजपने काँग्रेसला घेरलं आहे.

Lok sabha election 2024 : काँग्रेसचे 'ते' तीन आश्वासनं कोणती? ज्यांची तुलना भाजपने ८८ वर्षांपूर्वीच्या मुस्लिम लीगच्या जाहीरनाम्याशी केली
Parakala Prabhakar: 'मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत...' अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीचा दावा

काँग्रेसचं भाजपला उत्तर

काँग्रेसकडून भाजपला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, मोदी-शाह यांच्या राजकीय आणि वैचारिक पूर्वजांनी स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांच्या विरोधात ब्रिटिश आणि मुस्लिम लीगला समर्थन दिलं होतं.

''मोदी-शाह यांच्या वैचारिक पूर्वजांनी १९४२ मध्ये महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनाचा विरोध केला होता. जे आंदोलन मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं होतं. प्रत्येकाला माहिती आहे की, मुखर्जी यांनी १९४० च्या दशकात मुस्लिम लीगसोबत आघाडी करुन बंगाल, सिंध आणि एनडब्ल्यूएफपीमध्ये सरकारं स्थापन केली.''

खर्गे पुढे म्हणाले, मोदींच्या भाषणामध्ये आरएसएसचा विचार दिसून येतो. भाजपच्या निवडणुकीचा ग्राफ दिवसेंदिवस कोसळत चालला आहे. त्यामुळे आरएसएसला आपला सगळ्यात चांगला मित्र मुस्लिम लीगची आठव येतेय, असा घणाघात त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com