Trust of Nation: काँग्रेसची डोकेदुखी वाढणार? ट्रस्ट ऑफ नेशनच्या सर्वेक्षणात 64 टक्के लोकांना पुन्हा PM हवेत मोदी

Trust of Nation: सर्वेक्षणाचे जे निकाल समोर आले आहेत ते सध्या मोदी सरकारच्या बाजूने आहेत. 61 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे.
lok sabha election 2024-dailyhunt Trust of Nation survey
lok sabha election 2024-dailyhunt Trust of Nation surveyesakal

Trust of Nation:  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सर्व्हे समोर येत आहेत. दरम्यान ट्रस्ट ऑफ नेशनच्या सर्वेक्षणात नरेंद्र मोदींनी पुन्हा बाजी मारली आहे. सर्वेक्षणात 64 टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून कोणाला पाहायचे आहे याच्या प्रतिसादात सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले आहे. अशा स्थितीत सर्वेक्षण अहवाल पाहून काँग्रेसला धक्का बसू शकतो.

या सर्वेक्षणाचा निकाल लोकसभा निवडणुकीपूर्वी डेली हंट सर्व्हेमध्ये मांडण्यात आला आहे. डेलीहंटने 11 भाषांमध्ये केलेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या सर्वेक्षणात एकूण 77 लाख लोकांची मते जाणून घेतली. लोकसभा निवडणूकीत हवाल कुणाची? हे या सर्वेक्षणातून समोर आले आले आहे. सध्याच्या सरकारच्या कामावर जनता किती समाधानी आहे हे जाणून घेणे हाही या सर्वेक्षणाचा उद्देश होता.

सर्वेक्षणाचे जे निकाल समोर आले आहेत ते सध्या मोदी सरकारच्या बाजूने आहेत. 61  टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे. यावेळीही लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळेल असा 63 टक्के लोकांचा विश्वास असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

पाचपैकी तीन जणांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. फक्त 21.8 टक्के लोकांना राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून पाहायचे आहे. 2024 मध्ये महायुती लोकसभा निवडणूक जिंकेल असा विश्वास सर्वेक्षणातून समोर आला आहे.

lok sabha election 2024-dailyhunt Trust of Nation survey
Lok Sabha : प्रचारसभेसाठी लागणारे मंडप भाडे किती ? निवडणूक खर्चावर आयोगाची करडी नजर

दिल्ली, उच्चर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये कुणाची हवा-

दिल्लीत पंतप्रधान मोदी 57.7 टक्के मतांसह आघाडीवर आहेत. राहुल गांधींना 24.2 टक्के मते मिळाली, तर योगी आदित्यनाथ यांना 13.7 टक्के मते मिळाली. डेली हंटच्या सर्वेक्षणात उच्चर प्रदेशमध्ये यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना पहिली पसंती आहे. त्यांना 78.2 टक्के मते मिळाली. तर राहुल गांधी यांना 10 टक्के मते मिळाली आहेत. पंतप्रधान मोदींना पश्चिम बंगालमध्ये 62.6 टक्के मते मिळाली. राहुल गांधींना 19.6 टक्के आणि प्रादेशिक नेत्या ममता बॅनर्जी यांना केवळ 14.8 टक्के मते मिळाली.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये काटे की टक्कर -

तामिळनाडूमध्ये राहुल गांधींना 44.1 टक्के तर नरेंद्र मोदींना 43.2 टक्के पाठिंबा मिळत आहे. केरळमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांच्यात चुरशीची लढत आहे. या सर्वेक्षणात पीएम मोदींना 40.8 टक्के आणि राहुल गांधींना 40.5 टक्के मते मिळाली. तेलंगणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना 60.1 टक्के मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे राहुल गांधी यांना 26.5 टक्के मते मिळाली आहेत. तर एन. चंद्राबाबू नायडू 6.6% मतांनी पिछाडीवर आहेत. आंध्र प्रदेशात पंतप्रधान मोदींना 71.8 टक्के मते मिळाली. राहुल गांधी यांना 17.9 टक्के मते मिळाली तर एन. चंद्राबाबू नायडू यांना केवळ 7.4 टक्के मते मिळाली.

केंद्र सरकारच्या कल्याणकारी उपक्रमांबद्दल समाधान-

64 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदी सरकारच्या परराष्ट्र व्यवहार हाताळण्याला 'खूप चांगले' रेटिंग दिले आहे, तर 14.5 टक्के लोकांचा विश्वास आहे की ते अधिक चांगले करु शकतात. 53.8 टक्के लोकांनी केंद्र सरकारच्या कल्याणकारी उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले आहे, तर 24.9 टक्के लोक नाराज आहेत. या सर्वेक्षणामुळे काँग्रेसला धक्का बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

lok sabha election 2024-dailyhunt Trust of Nation survey
Kalyan Loksabha Election : महाविकास आघाडीच्या उमेदवार दरेकर यांच्या सारथी बनल्या सुलभा गायकवाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com