Lok Sabha Election 2024 : मत मोजणीची प्रक्रिया कशी असते? कशी असते दिवसभराची तयारी

मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड झाला तर काय निर्णय घेतला जातो?
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 esakal

Lok Sabha Election 2024 :

लोकसभा निवडणूक जाहीर झाली, प्रचार झाले, मतदान झाले आता फक्त उरलाय तो महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतमोजणी. कोणाच्या हाती येणार सत्ता अन् कोणाला मिळणार निराशा हे उद्या म्हणजे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.

लोकसभेसाठी देशभरात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं होतं. पण, निकाल मात्र एकाच दिवशी लागणार आहे. त्यामुळे सोशल मिडियावरील नेटकरी, गावातील गावकरी निकालासाठी उत्सुक आहेत.

पण, मतमोजणीची प्रक्रिया कशी असते, EVM मशीन कधी आणले जातात. त्यावर कसे मोजणी केली जाते या याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Lok Sabha Election 2024
Loksabha Election 2024: पश्चिम महाराष्ट्रात गादी कोणाची? विशाल पाटील सांगली जिंकणार?

मतमोजणी कशी होते

४ जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून त्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी मतांची गुप्तता राखण्याची शपथ घेतात. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सर्व ईव्हीएम मशीन तपासल्या जातील. ही तपासणीही रिटर्निंग ऑफिसरच्या उपस्थितीत होते.

मतमोजणी एजंट किती असतात

प्रत्येक निवडणुकीच्या मतमोजणीवेळी एजंट उपस्थित असतात. प्रतिस्पर्धी उमेदवारांना त्यांच्या मतमोजणी एजंट किंवा निवडणूक एजंटसह मतमोजणी केंद्रावर राहण्याची परवानगी दिली जाते.    

Lok Sabha Election 2024
Loksabha Election 2024 : अमित शाह यांचे 'मिशन १२०' नेमकं काय?

मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेवर मतमोजणी एजंट देखरेख करतील. सर्व प्रकारच्या मतमोजणीच्या वेळी रिटर्निंग ऑफिसर उपस्थित राहतील. जर मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड झाला किंवा व्हीव्हीपीएटी स्लिपमध्ये काही तफावत आढळली, तर निवडणूक पर्यवेक्षण करणारे रिटर्निंग ऑफिसर तत्काळ निवडणूक आयोगाला कळवतील.

यावर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेतो. या प्रकरणावर निवडणूक आयोगाला कोणतीही मोठी चूक किंवा कमतरता आढळली नाही, तर ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास सांगितली जाईल. त्यात गंभीर कमतरता किंवा चूक आढळून आल्यास निवडणूक आयोग निवडणूक नाकारेल आणि फेरनिवडणुकीचे आदेश देईल.

Lok Sabha Election 2024
Bhiwandi Loksabha: आमदार किसन कथोरेंची हकालपट्टी करा, भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कोणत्याही अनियमिततेच्या तक्रारीशिवाय आणि निवडणूक आयोगाच्या कोणत्याही सूचनेशिवाय मतमोजणी संपली, तर मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर रिटर्निंग ऑफिसर निकाल जाहीर करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com