Maharashtra Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 52.63 टक्के मतदान, शिरुर अन् पुण्यात मतदारांचा कमी प्रतिसाद

Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 4 Voting Live News and Updates in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 96 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे.
 Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 esakal

Lok Sabha Phase 4 Voter Turnout: चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 52.63 टक्के मतदान, शिरुर अन् पुण्यात मतदारांचा कमी प्रतिसाद

चौथ्या टप्प्यात राज्यात झालेले सरासरी मतदान

जळगाव- ५१.९८ टक्के

जालना- ५९.४४ टक्के

मावळ- ४६.०३ टक्के

नंदुरबार-६०.६० टक्के

पुणे - ४४.९० टक्के

रावेर- ५६.१६ टक्के

शिर्डी- ५५.२७ टक्के

शिरुर-४३.८९ टक्के

अहमदनगर- ५३.२७ टक्के

औरंगाबाद- ५४.०२ टक्के

बीड- ५०.३७ टक्के

Lok Sabha Phase 4 Voter Turnout : चौथ्या टप्प्यात देशात झाले सरासरी ६२.६४ टक्के मतदान

चौथ्या टप्प्यात देशात झालेले सरासरी मतदान

महाराष्ट्र- ५२.६३ टक्के

ओडिसा- ६३.८५ टक्के

तेलंगणा- ६१.१६ टक्के

उत्तर प्रदेश- ५७.३५ टक्के

पश्चिम बंगाल- ७५.७२ टक्के

आंध्र प्रदेश- ६८.१२ टक्के

बिहार- ५५.६२टक्के

जम्मू आणि काश्मीर- ३५.९७ टक्के

झारखंड- ६३.३५ टक्के

मध्य प्रदेश ६८.३० टक्के

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पडली पार

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आज देशातील ९६ आणि राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेढीत कैद झालं आहे.

Assembly elections in Andhra Pradesh : आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत 5 वाजेपर्यंत 67.32 टक्के मतदान

लोकसभेसोबतच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. पाचवाजेपर्यंत राज्यात 67.32 टक्के मतदान झालं आहे.

Lok Sabha Phase 4 Voter Turnout : राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार - ६०.६० टक्के

जळगाव - ५१.९८ टक्के

रावेर - ५५.३६ टक्के

जालना - ५८.८५ टक्के

औरंगाबाद - ५४.०२ टक्के

मावळ - ४६.०३ टक्के

पुणे - ४४.९० टक्के

शिरूर - ४३.८९ टक्के

अहमदनगर- ५३.२७ टक्के

शिर्डी - ५२.२७ टक्के

बीड - ५८.२१ टक्के

Lok Sabha Phase 4 Voter Turnout : देशात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.60 टक्के मतदान

आंध्र प्रदेश - 68.04 टक्के

बिहार - 54.14 टक्के

जम्मू-काश्मीर - 35.75 टक्के

झारखंड -63.14 टक्के

मध्य प्रदेश - 68.01 टक्के

महाराष्ट्र - 52.49 टक्के

ओडिशा - 62.96 टक्के

तेलंगणा - 61.16 टक्के

उत्तर प्रदेश - 56.35 टक्के

पश्चिम बंगाल - 75.66 टक्के

Pune Loksabha: भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं!

भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं आहे. पाटील इस्टेट परिसरात भाजप कार्यकर्ताकडून पैशाचं वाटप सुरु होतं असा दावा करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जावेद शेख आणि रमेश सय्यद या दोन कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करणाऱ्या इसमाला पकडून दिलंय. पोलिसांनी पैसे वाटप करणाऱ्या भाजपचा कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे.

पुण्यातील पाटील इस्टेट भागात भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

पुण्यातील शिवाजी नगर भागातील पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसरात पैसे वाटल्याच्या आरोपांवर काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडल्याचं पहायला मिळालं.

Lok Sabha Phase 4 Voter Turnout : देशात  दुपारी तीन वाजेपर्यंत 52.60 टक्के मतदान

  • आंध्र प्रदेश - 55.49 टक्के

  • बिहार - 45.23 टक्के

  • जम्मू-काश्मीर - 29.93 टक्के

  • झारखंड - 56.42 टक्के

  • मध्य प्रदेश - 59.63 टक्के

  • महाराष्ट्र - 42.35 टक्के

  • ओडिशा - 52.91 टक्के

  • तेलंगणा - 52.34 टक्के

  • उत्तर प्रदेश - 48.41 टक्के

  • पश्चिम बंगाल - 66.05 टक्के

Maharashtra Lok Sabha Phase 4 Voter Turnout : दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात 42.35 टक्के मतदान

  • जळगाव - 42.15 टक्के

  • जालना - 47.51 टक्के

  • नंदुरबार - 49.91 टक्के

  • शिरूर - 36.43 टक्के

  • अहमदनगर - 41.35 टक्के

  • छ. संभाजीनगर - 43.76 टक्के

  • बीड - 46.49 टक्के

  • मावळ - 36.54 टक्के

  • पुणे - 35.61 टक्के

  • रावेर - 45.26 टक्के

  • शिर्डी - 44.87 टक्के

Lok Sabha Phase 4 Voter Turnout till 3 PM : दुपारी तीन वाजेपर्यंतची आकडेवारी समोर; देशात 52.60 टक्के तर राज्यात 42.35 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 52.60% मतदानाची नोंद झाली आहे, तर महाराष्ट्रात आतापर्यंत 42.35% मतदान झालं आहे.

Beed Lok Sabha : कोरडेवाडीमधील एकाही ग्रामस्थाकडून मतदान नाही; संपूर्ण गावाचा मतदानावर बहिष्कार

बीडच्या कोरडेवाडी गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे. साठवण तलावाच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या गावातील एकाही व्यक्तीने अद्याप मतदान केलेलं नाही.

Lok Sabha 4th Phase Voting : प्रवीण तरडे अन् इतर मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

मराठी सिनेसृष्टीतील कित्येक कलाकारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा आपला हक्कच नसून, ती आपली जबाबदारी देखील आहे असं म्हणत या कलाकारांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्कeSakal

छत्रपती संभाजी नगरमधल्या मतदान केंद्रावर EVM मशीन बंद

छत्रपती संभाजीनगर शहरातील पीर बाजार इथल्या मतदान केंद्रावर EVM मशीन बंद पडल्याची घटना घडली आहे.

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरात मतदानाचा टक्का वाढणार असल्याचं दिसून येतंय. कारण शहरातील अनेक भागांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 50% च्या जवळ मतदान झाल्याचा अंदाज आहे.

Lok Sabha 4th Phase Voter Turnout : देशात 40.32 टक्के मतदानाची नोंद; कुठे किती आकडेवारी?

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. देशात दुपारी एक वाजेपर्यंत एकूण 40.32 टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये, तर सर्वात कमी मतदान जम्मू-काश्मीरमध्ये झालं आहे.

  • आंध्र प्रदेश - 40.26 टक्के

  • बिहार - 34.44 टक्के

  • जम्मू-काश्मीर - 23.57 टक्के

  • झारखंड - 43.80 टक्के

  • मध्य प्रदेश - 48.52 टक्के

  • महाराष्ट्र - 30.85 टक्के

  • ओडिशा - 39.30 टक्के

  • तेलंगणा - 40.38 टक्के

  • उत्तर प्रदेश - 39.68 टक्के

  • पश्चिम बंगाल - 51.87 टक्के

Lok Sabha 4th Phase Voter Turnout : दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात 30.85 टक्के मतदानाची नोंद; पुण्यात सर्वात कमी मतदान

दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात 30.85 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पुण्यात सर्वात कमी मतदान झाल्याचं दिसत आहे.

  • जळगाव - 31.70 टक्के

  • जालना - 34.42 टक्के

  • नंदुरबार - 37.33 टक्के

  • शिरूर - 26.62 टक्के

  • अहमदनगर - 29.45 टक्के

  • छ. संभाजीनगर - 32.37 टक्के

  • बीड - 33.65 टक्के

  • मावळ - 27.14 टक्के

  • पुणे - 26.48 टक्के

  • रावेर - 32.02 टक्के

  • शिर्डी - 30.49 टक्के

Sambhajinagar Voting Live Update : थेट दुबई वरून मतदान करण्यासाठी मतदार संभाजीनगरमध्ये

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी थेट दुबई वरून एक मतदार दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन ३ या मतदान केंद्रावर दुबईहून आलेल्या राकेश पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मूळचे छत्रपती संभाजीनगरमधील असलेले राकेश पाटील हे २० वर्षां पासून दुबईत व्यावसायिक म्हणून राहतात. आपल्या एका मताचं महत्त्व लक्षात घेऊन राकेश पाटील हे केवळ एका मतासाठी दुबई वरून आले होते.

Telangana Voting Live Updates : भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने केलं मतदान

भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने मतदानाचा हक्क बजावला. हैदराबादमधील एका मतदान केंद्रावर तिने मतदान केलं.

Pune Voting Live Updates : पुण्यात कोथरुडमध्ये देखील बोगस मतदानाचा प्रकार उघड

पुण्यात ठिकठिकाणी बोगस मतदान होत असल्याचं समोर येत आहे. कोथरुडमध्ये देखील आता कित्येक नागरिकांनी आपल्या नावाने आधीच मतदान झाल्याचा आरोप केला आहे.

Pune Lok Sabha Voting Live updates : पुण्यात कित्येक ठिकाणी नागरिक त्रस्त; मतदार यादीत मिळेना नाव

रामटेकडीत मतदार यादीत नावे सापडत नसल्याने व काही नावे प्रभागाच्या बाहेर आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसंच कात्रज हुजूरपागा आणि कोंढवा दरेकर शाळेसह इतर परिसरात नावे मतदार यादीत न आल्याने सापडत नसल्याने मतदारांत नाराजी आहे.

Shirur Lok Sabha Voting : मुंढव्यात रुम नंबर पाचमधील मशीन बंद

मुंढव्यात रुम नंबर पाचमधील मशीन बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pune Lok Sabha Live : शिरूरनंतर पुण्यातही बोगस मतदान झाल्याचा आरोप

शिरूरनंतर पुण्यात आणखी एका ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. माझ्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे.

यासोबतच वडगाव शेरी, नवी पेठ परिसरात देखील बोगस मतदान झाल्याचं समोर येत आहे. कित्येक नागरिकांना मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर तुमचं मतदान झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.

Shirur Lok Sabha Voting : राजगुरुनगर शहरात बोगस मतदानाचा आरोप

राजगुरूनगर शहरामध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीने मतदान करून स्वाक्षरी केल्याचा प्रकार याठिकाणी उघड झाला आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी गेलेल्या एका नागरिकाने याबाबत आरोप केले आहेत.

Pune Lok Sabha Voting Live : मतदान केंद्राजवळील काँग्रेसचे बॅनर हटवले; पुण्यातील भाजपचं आंदोलन मागे

पुण्यातील फडके हौद चौक परिसरातील मतदान केंद्राजवळ काँग्रेसचे झेंडे दिसल्यामुळे भाजपने आंदोलन सुरू केलं होतं. मात्र आयोगाने कारवाई करत हे झेंडे हटवले. त्यानंतर भाजपने आता आंदोलन मागे घेतलं आहे.

Beed Lok Sabha Voting Live : पंकजा मुंडेंनी बजावला मतदानाचा हक्क

बीडमधील भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने त्यांच्या विरोधात बजरंग सोनवले यांना उमेदवारी दिली आहे.

Maharashtra Lok Sabha Voting : कोणत्या मतदारसंघात किती मतदान? विधानसभा निहाय आकडेवारी समोर

पुणे लोकसभा मतदारसंघ, मतदान टक्केवारी (सकाळी ११ वाजेपर्यंत) : १६.१६ %

विधानसभा निहाय:

  • कसबा पेठ १८.१०

  • कोथरूड १८.२०

  • पर्वती १७.८४

  • पुणे कॅन्टोन्मेंट १३.८९

  • शिवाजीनगर १३.९४

  • वडगाव शेरी १४.६७

------

मावळ लोकसभा मतदारसंघ : १४.८७ %

  • चिंचवड १४.९३

  • कर्जत १४.२७

  • मावळ १४.७५

  • पनवेल १४.७९

  • पिंपरी १३.०९

  • उरण १७.६७

------

शिरूर लोकसभा मतदारसंघ : १४.५१ %

  • आंबेगाव १८.४७

  • भोसरी १२.७९

  • हडपसर १४.४०

  • जुन्नर १७.०६

  • खेड आळंदी १४.५४

  • शिरूर १२.२५

Lok Sabha Voting 4th Phase Voter Turnout : सकाळी अकरा वाजेपर्यंत देशात 24.87 टक्के मतदान

  • आंध्र प्रदेश - 23.10 टक्के

  • बिहार - 22.54 टक्के

  • जम्मू-काश्मीर - 14.94 टक्के

  • झारखंड - 27.40 टक्के

  • मध्य प्रदेश - 32.38 टक्के

  • महाराष्ट्र - 17.51 टक्के

  • ओडिशा - 23.28 टक्के

  • तेलंगणा - 24.31 टक्के

  • उत्तर प्रदेश - 27.12 टक्के

  • पश्चिम बंगाल - 32.78 टक्के

Maharashtra Lok Sabha Voter Turnout in 4th Phase : सकाळी अकरा वाजेपर्यंत महाराष्ट्रात 17.51 टक्के मतदान, कुठल्या मतदारसंघात किती टक्केवारी?

  • जळगाव - 16.89 टक्के

  • जालना - 21.35 टक्के

  • नंदुरबार - 22.12 टक्के

  • शिरूर - 14.51 टक्के

  • अहमदनगर - 14.74 टक्के

  • छ. संभाजीनगर - 19.53 टक्के

  • बीड - 16.62 टक्के

  • मावळ - 14.87 टक्के

  • पुणे - 16.16 टक्के

  • रावेर - 19.03 टक्के

  • शिर्डी - 18.91 टक्के

Chhatrapati Sambhajinagar Voting Live : इम्तियाज जलील यांनी बजावला मतदानाचा हक्क

छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार इम्तियाज जलील यांनी आपलंं मत नोंदवलं. त्यांच्या विरोधात चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे हे उभे आहेत.

Pune Voting Live Updates : मॉडेल कॉलनी परिसरात ईव्हीएम बंद

पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील मतदान केंद्रावर असणारं ईव्हीएम बंद पडलं आहे. गेल्या 20 मिनिटांपासून याठिकाणची मतदान प्रक्रिया थांबली आहे. दरम्यान यशवंतराव मोहिते विद्यालयातील बूथ क्रमांक 130 येथील ईव्हीएम खराब असल्यामुळे मतदान प्रक्रिया सकाळी 7.45 वाजता सुरू झाली.

Pune Lok Sabha Voting Live: पुण्यातील बूथवर काँग्रेसचे झेंडे, भाजपचं आंदोलन

पुण्यातील फडके हौद चौक परिसरातील मतदान केंद्राजवळ काँग्रेसचे झेंडे दिसल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. याठिकाणी भाजपने आंदोलन सुरू केलं असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते याठिकाणी हजर आहेत.

Maharashtra Lok Sabha Live : सोनाली कुलकर्णी, श्रुती मराठे, बेला शेंडे यांनी केलं मतदान

अभिनेत्री श्रुती मराठे, सोनाली कुलकर्णी आणि गायिका बेला शेंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावं असं आवाहन या सर्वांनी केलं.

Lok Sabha Update : मोबाईल नेता येत नाही म्हणून अनेकांची मतदानाला पाठ

मतदान केंद्रावर मोबाईल नेता येत नसल्याचं पाहताच अनेक नागरिक मतदान न करताच परत जात असल्याचं चित्र पनवेलमध्ये दिसतंय.

Lok Sabha Live Update: चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी मतदान केले

चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी मतदान केले. ते म्हणाले, "देशाला दाखवा की तुम्ही जबाबदार नागरिक आहात. कृपया बाहेर पडा आणि मतदान करा."

Maharashtra Lok Sabha Live Update: 35 उमेदवार उभे आहेत, पाच मिनिटं मशीन वाचण्यातच गेली

अभिनेते मोहन आगाशे यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि राजकारण्यांना चांगलंच सुनावलं. 35 उमेदवार उभा आहेत पाच मिनिटं मशीन वाचण्यातच गेली. माणसागणिक पार्ट्या झाल्या आहेत. मतदानाबाबत जनजागृती केली पाहिजे.

Lok Sabha 4th Phase Voter Count till 9 AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर; देशात कुठे किती मतदान?

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. देशात एकूण 10.35 टक्के मतदान झालं असून, जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे.

  • आंध्र प्रदेश - 9.05 टक्के

  • बिहार - 10.18 टक्के

  • जम्मू-काश्मीर - 5.07 टक्के

  • झारखंड - 11.78 टक्के

  • मध्य प्रदेश - 14.97 टक्के

  • महाराष्ट्र - 6.45 टक्के

  • ओडिशा - 9.23 टक्के

  • तेलंगणा - 9.51 टक्के

  • उत्तर प्रदेश - 11.67 टक्के

  • पश्चिम बंगाल - 15.24 टक्के

Maharashtra Lok Sabha Voter Count : सकाळी नऊ वाजेपर्यंत महाराष्ट्रात 6.45 टक्के मतदान, कुठल्या मतदारसंघात किती टक्केवारी?

सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात एकूण 6.45 टक्के मतदान झालं असून, सर्वाधिक मतदान हे नंदुरबार मतदारसंघात झालं आहे.

  • जळगाव - 6.14 टक्के

  • जालना - 6.88 टक्के

  • नंदुरबार - 8.43 टक्के

  • शिरूर - 4.97 टक्के

  • अहमदनगर - 5.13 टक्के

  • छ. संभाजीनगर - 7.52 टक्के

  • बीड - 6.72 टक्के

  • मावळ - 5.38 टक्के

  • पुणे - 6.61 टक्के

  • रावेर - 7.14 टक्के

  • शिर्डी - 6.83 टक्के

Maval Lok Sabha Live : पनवेल, खारघरमध्ये मतदानाचा उत्साह

पनवेल आणि खारघरमध्ये मतदानाचा उत्साह दिसत आहे. खारघरमध्ये शाळेबाहेर मतदारांची रांग पहायला मिळत आहे. तर पनवेलमध्ये दिव्यांगही मतदानासाठी आलेले दिसतायत.

गोखले शाळेत मतदानासाठी लागलेली रांग
गोखले शाळेत मतदानासाठी लागलेली रांग
पनेलमध्ये दिव्यांगांंसाठी  व्हीलचेअरची सोय उपलब्ध
पनेलमध्ये दिव्यांगांंसाठी व्हीलचेअरची सोय उपलब्ध

Shirur Lok Sabha Live : अमोल कोल्हेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पोलिंग एजंटला मज्जाव केल्याप्रकरणी आणि एक व्हीव्हीपॅट मशीन बंद असल्याबाबत ही तक्रार केली आहे.

Maharashtra Lok Sabha : महाविकास आघाडीतील नेत्यांचा महायुतीवर पैसे वाटल्याचा आरोप

शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे हे नाशिकमध्ये अधिकृतपणे बॅगा वाटप करत असल्याचं त्यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं आहे. तर दुसरीकडे रोहित पवार यांनीदेखील आपल्या एक्स हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत महायुती पैसे वाटत असल्याचा आरोप केला आहे.

Jammu Kashmir Lok Sabha Live : फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला यांनी केलं मतदान

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांनी मतदान केलं. आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो. लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका देखील पार पडतील अशी आम्हाला आशा होती. नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावं असं आवाहन ओमर अब्दुल्ला यांनी केलं.

Lok Sabha 4th Phase Live : महाराष्ट्रातील 14 गावांचं तेलंगणामध्ये मतदान

महाराष्ट्रातील 14 गावांमधील नागरिकांनी तेलंगणामध्येही मतदान केल्याचं समोर आलं आहे. सीमेवर राहणाऱ्या या नागरिकांनी दुहेरी मतदान करू नये यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली होती. मात्र, हा प्रयत्न फसला असून या नागरिकांनी महाराष्ट्रानंतर तेलंगणात देखील मतदान केल्याचं दिसत आहे.

Telangana Lok Sabha Live : अभिनेता चिरंजीवीने बजावला मतदानाचा हक्क

साऊथचा मेगास्टार म्हणून ओळख असणाऱ्या चिरंजीवीने मतदानाचा हक्क बजावला आहे. सोबतच सर्व नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं.

Andhra Pradesh Lok Sabha Live : जगनमोहन रेड्डी, चंद्राबाबू नायडू यांनी केलं मतदान

आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Pune Lok Sabha Voting : पुण्यातील वडगाव शेरी भागात असलेले मतदान केंद्रावर नागरिक खोळंबले

पुण्यातील वडगाव शेरी भागात असलेले मतदान केंद्रावर नागरिक खोळंबले आहेत. मतदान करण्यासाठी आलेले नागरिक गेल्या अर्धा तासांपासून रांगेत उभे आहेत. पुणे इंटरनॅशनल स्कूल या मतदान केंद्रावरील ईव्हीएम चालत नसल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली आहे. नवीन ईव्हीएम आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Jalna Lok Sabha Live Updates : रावसाहेब दानवेंनी बजावला मतदानाचा हक्क

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दानवे हे जालन्यातील भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने कल्याण काळे यांना उमेदवारी मिळाली आहे.

Telangana Lok Sabha Live : असदुद्दीन ओवैसींनी बजावला मतदानाचा हक्क

हैदराबादमधील एमआयएमचे उमेदवार उसदुद्दीन ओवैसी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Jammu Kashmir Lok Sabha Live : पुलवामामध्ये मोठ्या प्रमाणात मतदानाला गर्दी

जम्मू काश्मीरमध्ये एका जागेसाठी आज मतदान पार पडत आहे. पुलवामामधील मतदान केंद्राबाहेर सकाळीपासूनच लोकांच्या रांगा पहायला मिळत आहेत.

Maharashtra Lok Sabha Voting : अभिनेता सुबोध भावेने बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता सुबोध भावे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Subodh Bhave Casts Vote
Subodh Bhave Casts VoteeSakal

Telangana Lok Sabha Voting : ज्युनियर एनटीआरने केलं मतदान

आरआरआर फेम अभिनेता ज्युनियर एनटीआर यानेही मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व नागरिकांनी मतदान करावं, आणि आपल्या पुढच्या पिढीलाही या हक्काची जाणीव करून द्यावी असं आवाहन त्याने केलं.

Telangana Lok Sabha Live : स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनने केलं मतदान; लोकांनाही केलं आवाहन

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने देखील मतदानाचा हक्क बजावला. हैदराबाद येथील मतदान केंद्रावर त्याने मतदान केलं. आपण कोणत्याही एका विशिष्ट पक्षाला पाठिंबा देत नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. तसंच उकाडा असला तरी मोठ्या संख्येने लोकांनी बाहेर पडून मतदान करावं, आजचा दिवस हा पुढील पाच वर्षांसाठी महत्त्वाचा आहे असंही तो म्हणाला.

Lok Sabha Phase 4 Voting : पंतप्रधान मोदींनी केलं मतदानाचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी आपलं कर्तव्य पार पाडूया, अशी एक्स पोस्ट त्यांनी केली आहे.

Beed Lok Sabha Voting Update : केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. साठवण तलावाच्या प्रश्नासाठी या नागरिकांनी हा बहिष्कार टाकला आहे.

Sambhajinagar Election Voting LIVE : संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याचं समोर आलं आहे. सुमारे 25 ठिकाणी यामुळे मतदान प्रक्रिया रखडली आहे.

Lok Sabha Voting Live : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन, ज्यु. एनटीआर मतदानासाठी दाखल

तेलंगणामध्ये आज सर्व जागांवर मतदान पार पडत आहे. अभिनेते अल्लू अर्जुन आणि ज्यु. एनटीआर हे मतदानासाठी दाखल झाले आहेत.

Lok Sabha Voting LIVE Updates : देशभरातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. तर हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या मतदारसंघात देखील आज व्होटिंग आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्या महुआ मोईत्रा, बिहारमध्ये गिरिराज सिंह, आंध्र प्रदेशात YS शर्मिला या दिग्गजांची प्रतिष्ठा आज पणाला लागणार आहे.

Maharashtra Lok Sabha Election : निलेश लंके, संदीपान भुमरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार

अहमदनगरमधील उमेदवार निलेश लंके यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसंच, छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार संदीपान भुमरे यांनीदेखील सकाळीच मतदान केलं आहे. जळगावातील उमेदवार स्मिता वाघ यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

Pune Lok Sabha Voting : रवींद्र धंगेकर मतदानाला रवाना

सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मतदानासाठी रवाना झाले आहेत.

Maharashtra Lok Sabha Voting : राज्यातील प्रमुख उमेदवार

  • मावळ : श्रीरंग बारणे (शिवसेना), संजोग वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  • नंदुरबार : हीना गावित (भाजप),

  • जळगाव : स्मिता वाघ (भाजप),

  • रावेर : रक्षा खडसे (भाजप), श्रीराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

  • जालना : रावसाहेब दानवे (भाजप), डॉ. कल्याण काळे (काँग्रेस)

  • औरंगाबाद : इम्तियाज जलील (एमआयएम), संदीपान भुमरे (शिवसेना), चंद्रकांत खैरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  • शिरूर : अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), शिवाजीराव आढळराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

  • पुणे : मुरलीधर मोहोळ (भाजप), रवींद्र धंगेकर (काँग्रेस)

  • अहमदनगर : सुजय विखे (भाजप), निलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

  • शिर्डी : सदाशिव लोखंडे (शिवसेना), भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  • बीड : पंकजा मुंडे (भाजप), बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

Lok Sabha Voting Phase 4 : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; मोठ्या संख्येने नागरिक हजर

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. मोठ्या संख्येने नागरिक मतदान केंद्राबाहेर उपस्थित आहेत.

Pune Lok Sabha Voting : मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सुरक्षा व्यवस्था सज्ज

लोकसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पुण्यात रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे अशी तिहेरी लढत पहायला मिळणार आहे.

Lok Sabha Phase 4 : चौथ्या टप्प्यात देशात कुठे कुठे मतदान?

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील ११ जागा, आंध्र प्रदेशच्या २५ जागा, बिहारमधील पाच जागा, झारखंडमधील चार जागा, मध्य प्रदेशातील आठ जागा, ओडिशातील चार जागा, तेलंगणामधील १७ जागा, उत्तर प्रदेशातील १३ जागा, पश्चिम बंगालमधील आठ जागा आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान पार पडणार आहे.

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील सर्व लोकसभा मतदार संघातील मतदान आज पूर्ण होणार.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान, राज्यातील 11 जागांवर मतदार देणार कौल

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडणार आहे. राज्यातील 11 जागांवर मतदार आज आपला कौल देणार आहेत. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 96 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. तर राज्यातील 11 लोकसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यात राज्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com