Jammu Kashmir Politics : मेहबूबा मुफ्तींच्या पक्षासोबत युती करणार नसल्याचं उमर अब्दुल्लांचं स्पष्टीकरण

Jammu Kashmir Loksabha Election 2024 : जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) या पक्षाबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती करणार नसल्याचे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे (एनसी) उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी जाहीर केले.
Jammu Kashmir Politics
Jammu Kashmir Politicsesakal

श्रीनगरः जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) या पक्षाबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती करणार नसल्याचे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे (एनसी) उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी जाहीर केले.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘पीडीपी’ या पक्षाची कामगिरी खालावली होती. त्यामुळे यावेळी त्यांना अनंतनाग-राजौरी जागा देणार नाही. दक्षिण काश्‍मीरची जागा काँग्रेसला देण्यास आमचा पक्ष तयार आहे. पण गेल्या निवडणुकीत ‘पीडीपी’ची कामगिरी खराब झाली होती.

पुरेसा पाठिंबा असूनही अनंतनाग-राजौरी मतदारसंघात या पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे यंदा हा मतदारसंघ ‘पीडीपी’साठी सोडण्याचा प्रश्‍न येत नाही.’’ आम्ही काश्मीरच्या तीनही जागांसाठी आमचे उमेदवार निश्चित केले आहेत आणि जम्मू आणि लडाखच्या दोन्ही जागांवर काँग्रेसला पाठिंबा देणार आहोत. उमेदवारांची घोषणा योग्यवेळी करण्यात येईल. असेही अब्दुल्ला म्हणाले.

Jammu Kashmir Politics
BJP Alliance : तेलुगू देसम पक्षाचा पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय; जनसेवा पक्षही NDA मध्ये सहभागी

काँग्रेसशी चर्चेनंतरच निर्णय

दरम्यान, ‘पीडीपी’शी युती न करण्याचा निर्णय अब्दुल्ला यांनी जाहीर केल्यानंतर काही तासांनीच मेहबूबा मुफ्ती यांनी युतीबाबतचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टोलावला.‘‘इंडिया’ आघाडीचा एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसशी चर्चा केल्यानंतरच आमचा निर्णय जाहीर करू,’’ असे त्यांनी सांगितले.

Jammu Kashmir Politics
Congress seat allocation : काँग्रेसच्या 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; राहुल गांधींचा मतदारसंघ ठरला

‘‘‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या निर्णयाने दुःख झाले. भाजपमुळे ‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लरेशन’चे (पीएजीडी) मोठे नुकसान झाले नाही; पण ‘एनसी’च्‍या या निर्णयाने मोठा धक्का दिला आहे. पण मी योद्धा आहे. यासंदर्भात आम्ही काँग्रेसशी बोलू आणि आमचा निर्णय लवकरच जाहीर करू,’’असे त्या म्हणाल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com