Rajnath Singh
Rajnath Singhsakal

Lok Sabha Election 2024 : ''डायनासोर'प्रमाणे काँग्रेस नष्ट होत चालला आहे'', राजनाथ सिंह यांचा घणाघात; म्हणाले...

मागच्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. पक्ष सोडून गेलेले नेते एनडीएमध्ये सहभागी होत आहेत. या नेत्यांमध्ये मिलिंद देवरा, अशोक चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.

Rajnath Shingh on Congress : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेला संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस पक्षावर घणाघात केला. उत्तराखंड येथील गढवाल लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार अनिल बलूनी यांच्या समर्थनार्थ एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं.

यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंहे म्हणाले की, पुढच्या काही वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष डायनासोरप्रमाणे लुप्त होऊन जाईल. त्यांनी काँग्रेसची तुलना बिग बॉससोबत केली. काँग्रेसचे नेते रोज एक-दुसऱ्याचे कपडे फाडत आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या काही वर्षांनंतर लहान मुलंसुद्धा काँग्रेस पक्षाला ओळखणार नाहीत.

मागच्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. पक्ष सोडून गेलेले नेते एनडीएमध्ये सहभागी होत आहेत. या नेत्यांमध्ये मिलिंद देवरा, अशोक चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली. तर मिलिंद देवरा शिवसेनेमध्ये सहभागी झाले आहेत.

Rajnath Singh
Modi on Constitution: "खुद्द बाबासाहेब आंबेडकर आले तरी संविधान संपवू शकत नाहीत"; PM मोदींचं विरोधकांना उत्तर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, काँग्रेसमधून नेते पळून जात आहेत. एकानंतर एक पक्ष सोडत आहेत. बाहेर पडलेले नेते भाजप किंवा एनडीएमधील घटकपक्षांमध्ये सहभागी होत आहेत. मला भीतीय की, पुढच्या काही वर्षांत काँग्रेस पक्ष डायनासोरप्रमाणे लुप्त होऊन जाईल. काँग्रेस नेते रोज एक-दुसऱ्याशी लढत आहेत. टीव्ही शो बिग बॉसप्रमाणे ते एकमेकांचे कपडे फाडत आहेत, असं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com