Lok Sabha Election 2024: राजस्थानमध्ये RRR वाढणार भाजपची डोकेदुखी, नरेंद्र मोदींसह योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंह मैदानात

Lok Sabha Election 2024: राजस्थानमध्ये राजपूत, रविंद्र सिंह भाटी आणि राजकुमार रोत या ट्रीपल आरने भाजपची चिंता वाढवली आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024esakal

Lok Sabha Election 2024 : सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. राजस्थानमध्ये मागील दोन निवडणूकांमध्ये भारतीय जनता पक्ष क्लीन स्वीप करत आहे. यावेळी सुद्धा राजस्थानमध्ये २५ जागांसाठी मोठी लढत पाहायला मिळत आहे. लोकसभा २०२४ च्या निवडणूकीत ४०० पार टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजपला राजस्थानमधून मोठी अपेक्षा आहे. परंतु राजस्थान मधील ट्रीपल आरने भाजपाचं टेंशन वाढवलं आहे. ट्रीपल आर कोण आहेत जाणून घ्या...

राजस्थानमध्ये राजपूत, रविंद्र सिंह भाटी आणि राजकुमार रोत या ट्रीपल आरने भाजपची चिंता वाढवली आहे. बाडमेर लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांच्या विरोधात रविंद्र सिंग भाटी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तसेच बांसवाडा लोकसभा मतदार संघातून भारतीय आदिवासी पक्षाचे नेते राजकुमार रोत यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. ते दोघे अर्ज भरायला गेले असता कार्यक्रर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, त्यामूळे भाजपची डोकेदूखी आणखी वाढली आहे.

बांसवाडा आणि बाडमेर हे जरी दोनच मतदार संघ असले तरी या दोन मतदार संघांचा प्रभाव बऱ्याच जागांवर पडतो. बाडमेर मतदार संघात भाटी यांच्यामुळे होणाऱ्या भाजपच्या नुकसानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंह हे नेते सुद्धा मैदानात उतरले आहेत. भाजप या दोन मतदार संघात जेवढ्या ताकतीने उतरेल तेवढाच त्याचा परिणाम इतर जागेवर होईल. भाजप आता सिनेअभिनेत्यांना बाडमेरमधून रणांगणात उतरवण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे.

बाडमेर का बनला भाजपसाठी प्रतिष्ठेचा-

बाडमेर मतदार संघातून भाजपचे कैलाश चौधरी हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेद राम बोनीवाल यांना उमेदवारी दिली आहे. परंतु चौधरी यांची खरी लढत ही रविंद्र सिंग भाटी यांच्या सोबत असणार आहे. भाटी यांनी शिव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे तिकीटाची मागणी केली होती. परंतु त्यांना भाजपकडून तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढली आणि दणदणीत विजय मिळवत राजस्थानमधील सर्वात तरुण आमदार बनले.

भाटी यांनी २०१९ मध्ये जय नारायण व्यास विद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढली होती. त्यांना अभाविपने तिकीट दिले नव्हते, तेव्हा सुद्धा ते स्वतंत्र लढले आणि मोठ्या फरकाने विजयी झाले. यावेळी सुद्धा भाटी यांनी भाजपकडे खासदारकीच्या तिकीटाची मागणी केली होती. परंतु भाजपाकडून पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली.

सध्या भाटी यांनी मिळत असलेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघून सर्वांचेच टेंशन वाढले आहे. बाडमेर मतदार संघात सर्वाधिक मतदान हे राजपूतांचे आहे आणि भाटी हे राजपूत आहेत. त्यामुळे राजपूतांची सर्व मते भाटी यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Lok Sabha Election 2024
Nilesh Sambre : वंचितकडून उमेदवारी नव्हे तर पाठींबा; निलेश सांबरे लढविणार अपक्ष निवडणूक

बांसवाडा मतदार संघातील लढत बीजेपी आणि बीएपी या पक्षांमध्ये-

विधानसभा २०२३ च्या निवडणूकीनंतर डूंगरपूर आणि बांसवाडा या जिल्ह्यांमध्ये भारतीय आदिवासी पक्षाने तीन जागा जिंकल्या होत्या, त्यावेळीच भाजपची चिंता वाढली होती. आता लोकसभा निवडणुकीत बीएपीने बांसवाडा-डूंगरपूर मतदार संघातून राजकूमार रोत यांना उमेदवारी दिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत रोत हे उपमुख्यमंत्री दीया कुमारी यांच्यानंतर सर्वाधिक मते घेणारे आमदार ठरले आहेत.

भाजपचे उमेदवार महेंद्रजीत मालवीय हे सुद्धा आदीवासी पट्ट्यातील सर्वात मोठा चेहरा मानले जातात.  बांसवाडा-डूंगरपूर मतदार संघ मालवीय किंवा रोत यांच्यातील जे कोणी जिंकेल तो राजस्थानमधील सर्वात मोठा आदिवासी चेहरा बनेल. ही लढत बीजेपी आणि बीएपी यांच्यात सर्वात मोठा आदीवासी नेता बनण्यासाठी सुद्धा असणार आहे.

राजपूतांचा मतावर पडू शकतो प्रभाव-

गुजरातचे खासदार पुरुषोत्तम रुपाला यांच्या व्यक्तव्यानंतर राजपूतांच्या नाराजीच्या बातम्या ऐकायला मिळत होत्या. गुजरातनंतर उत्तरप्रदेशमध्ये सुद्धा राजपूतांनी भाजपविरोधात पंचायतीचे आयोजन केले होते. राजपूत समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचं त्याचं मत आहे. राजस्थानमध्ये सुद्धा असच काही चित्र दिसत आहे, त्यामुळे निवडणूकांमध्ये क्षत्रिय समाजाने भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे.

Lok Sabha Election 2024
Travel Advisory: भारतीय नागरिकांनी 'या' दोन देशांत जाणे टाळावे, परराष्ट्र मंत्रालयाने का दिला अशा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com