Chhattisgarh Election : काँग्रेस सरकारची भिस्त लोककल्याणकारी योजनांवर, सत्तेत परतण्याची भाजपला आशा

रमण सिंह यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडमध्ये १५ वर्ष राज्य करणाऱ्या भाजपला राज्यात पुन्हा सत्ता मिळण्याची अशी आहे. २०१८मध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली
Chhattisgarh Election
Chhattisgarh Electionesakal

रायपूर : रमण सिंह यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडमध्ये १५ वर्ष राज्य करणाऱ्या भाजपला राज्यात पुन्हा सत्ता मिळण्याची अशी आहे. २०१८मध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली होती. १५ वर्षांच्या सत्तेमुळे जनमताचा कौल सरकार विरोधात गेला. त्याचप्रमाणे तत्कालीन सरकारवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, सरकार आणि पक्षसंघटन यांच्यात समन्वयाचा अभाव आणि ओबीसी मतांना आपल्याकडे वळवून घेण्यात यशस्वी झालेला काँग्रेस पक्ष यामुळे मागील निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता.

पक्षसंघटनेत फेरबदल

मागील विधानसभेत झालेल्या पराभवानंतर भाजपने राज्यातील संघटनेत काही फेरबदल केले आहेत. भाजपने मागील वर्षी अरुण साव यांची छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. साहू समाजातील व्यक्तीकडे नेतृत्‍व दिल्याने निवडणुकीमध्ये याचा पक्षाला फायदा होईल अशी भाजपची अपेक्षा आहे.

त्याचप्रमाणे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देण्याऐवजी भाजपने सामुहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा असून त्यापैकी भाजपने आतापर्यंत २१ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. त्यापैकी बहुतांश नेते हे भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेते आहेत, त्यामुळे या जागांवर देण्यात आलेल्या नावांमुळे सध्यातरी, पक्षाने आगामी निवडणुकीमध्ये प्रस्थापितांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरवले असल्याचे बोलले जात आहे.

कृषी योजनांचा आधार

दुसरीकडे राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी बघेल सरकारची भिस्त लोककल्याणकारी योजनांवर आहे. शेतकऱ्यांसाठीच्या राजीव गांधी किसान न्याय योजनेच्या माध्यमातून बघेल सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे २२ कोटी रुपयांपर्यंत अंशदान दिले आहे.

ज्याचा लाभ २३ लाख शेतकऱ्यांना झाला असून यामुळे त्यांची लोकप्रियता ग्रामीण आणि निमशहरी भागात वाढली आहे. त्याचप्रमाणे गोधन न्याय योजने अंतर्गत ५८० कोटींचा निधी देण्यात आला आहे. राजीव गांधी ग्रामीण भूमिहीन कृषी मजदूर कृषी न्याय योजने अंतर्गत भूमिहीन मजुरांनाही सरकारकडून मदत देण्यात येत आहे.

बघेल सरकारकडून प्रांतिक अस्मितेला हात घालत स्थानिक सण आणि उत्सवांना प्रोत्साहन दिले जात आहे. दरमन्यान, बघेल यांच्या कार्यकाळात धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडत असून धर्मांतरासारखे प्रकार घडत आहेत, असा आरोप भाजपच्या वतीने केला जात आहे. तर भाजपच्या राष्ट्रवादाच्या प्रचाराला पर्याय म्हणून बघेल सरकारकडून प्रांतिक अस्मितेला प्रोत्साहन दिले जात असल्याचेही राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे.

भाजपची बलस्थाने

  • पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता

  • मागील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर२०१९च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश

  • काँग्रेसच्या काळात झालेल्या जातील दंगली आणि आदिवासी बहुल भागातील धर्मांतर यामुळे भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक

  • एकूण जागा - ९०

  • एकूण मतदार - २.०३ कोटी

  • पुरुष मतदार - १.०१ कोटी

  • महिला मतदार - १.०२ लाख

  • १८- १९ वयोगट ७.२३ लाख

सरकारची भिस्त लोककल्याणकारी योजनांवर

छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या जोरावर राज्यात पुन्हा सत्ता मिळण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. मात्र कोळसा गैरव्यवहार, मद्यविक्री गैरव्यवहार आणि लोकसेवा आयोगातील गैरव्यवहारासह भूपेश बघेल सरकारवर जनतेचा रोष असल्याचे मानले जात आहे. यावर भाजपकडूनही बघेल सरकारवर जोरदार हल्लाबोल होत आहे. बघेल सरकारने छत्तीसगडला काँग्रेसचे एटीएम मशिन बनविले असल्याचा घणाघात भाजप नेते करत आहेत. तर केंद्रातील सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप बघेल यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com