Lok Sabha Election Result : निवडणुकीच्या निकालाबाबत शंका असल्यास किती वेळात करू शकतो तक्रार? काय आहे नियम

तक्रार दाखल करण्यासाठीचा टोल फ्री नंबर कोणता आहे?
Lok Sabha Election Result
Lok Sabha Election Resultesakal

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुक होईल-होईल म्हणता म्हणता संपली देखील. भारताच्या १८ व्या लोकसभेसाठी देशभरात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. त्या मतांची मोजणी काल (मंगळवारी) पार पडली. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागला होता.

शिवसेना शिंदे गटाच्या रविंद्र वायकर यांचा ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा २ हजार मतांनी पराभव केला होता. पण, वायकर यांनी फेरमतमोजणी घेण्याची मागणी केली आणि निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला.

Lok Sabha Election Result
Mumbai North West Loksabha Result: ईशान्य मुंबईत कीर्तिकरांना धक्का, मतमोजणीत ट्विस्ट वायकर ४८ मतांनी जिंकले

आता ठारके गटाने या फेरमतमोजणीवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. या निकालामध्ये काहीतरी मोठी गडबड असल्याचा संशय ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. यासाठी केवळ निवडणूक आयोग नाही,तर राष्ट्रपतींनाही पत्र पाठवार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे.  

अशातच, एखाद्या व्यक्तीला निवडणूक आयोगावर काही शंका असेल. निकालाबद्दल काही तक्रार करायची असेल.तर, तो कधीपर्यंत करू शकतो. त्यासाठी काय नियम आहेत याबद्दल माहिती घेऊयात.

काल ४ जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली होती. रात्री ९-१० वाजले तरी काही ठिकाणी मतमोजणी सुरू होती. दिवसाआखेर निकाल सर्वांच्याच समोर होता. दिवसाअखेर भाजप २९१, इंडिया आघाडी २३४ आणि अपक्ष १८ इतक्या जागा मिळाल्या आहेत.   

Lok Sabha Election Result
Lok Sabha Election 2024: भारीचं! वाळूशिल्प साकारत PM मोदींचे अभिनंदन... पाहा Video

काय सांगतो नियम?

मतमोजणीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा चूकीची गोष्ट घडत असेल. ती गोष्ट आयोगाच्या निदर्शनास आणून देत देशातील कोणतीही व्यक्ती तक्रार दाखल करू शकते.

तक्रारदार मतमोजणी केंद्रावर गैरप्रकाराची तक्रार करू शकतो. मात्र, ही तक्रार २४ तासांच्या आत करावी. काही दिवसांनी मतमोजणीची तक्रार करता येईल असे नाही.

एवढेच नाही तर मतमोजणी केंद्राच्या आजूबाजूच्या ५० मीटरच्या आवारात कोणत्याही व्यक्तीच्या हातात शस्त्र दिसले असेल. किंवा कोणी शस्त्र घेऊन मतमोजणी केंद्रात प्रवेश करताना किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्याचा संशय आल्यास.

कोणताही व्यक्ती या गोष्टींबाबत तक्रार करू शकतो. फक्त ती तक्रार २४ तासांच्या आत करणे आवश्यक आहे.  तुमच्या तक्रारीवर निवडणूक आयोग संबंधित व्यक्तीवर तत्काळ कारवाई करेल.

Lok Sabha Election Result
Lok Sabha Election Result 2024: ...तर भाजपची झाली असती नाचक्की; आकडा आला असता दोनशेच्या खाली

तक्रार कशी दाखल करायची?

निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून २४ तासांच्या आत कोणताही नागरिक निवडणूक संबंधित तक्रार करू शकतो. सर्वप्रथम, तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवडणुकीशी संबंधित तक्रार करू शकता.

रिटर्निंग ऑफिसर तुमच्या तक्रारीवर कारवाई करत नसेल तर तुम्ही फोन किंवा ईमेलद्वारे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. एवढेच नाही तर दिल्लीतील निवडणूक आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षातही तक्रार करता येते.

जर एखाद्या व्यक्तीने टोल फ्री क्रमांक 1950 वर तक्रार केली तर त्याला ट्रॅकिंग क्रमांक मिळतो. त्यामुळे त्याची तक्रार ग्राह्य धरली जाते आणि त्यावर कितपत कारवाई झाली हे नागरिकांना कळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com