ओडिशात लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रूळावरून घसरली, सहाजण गंभीर

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जानेवारी 2020

ओडिशातील नरगुंडी रेल्वे स्टेशन दरम्यान या रेल्वे अपघातात 8 डबे घसरून 20 जण जखमी झाले आहेत. यातील 20 जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिस व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ओडिशा : राज्यातील कटक येथील नरगुंडी रेल्वेस्टेशनजवळ मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रेल्वे रूळावरून घसरू अपघात झाला आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. आज (ता. 16) सकाळी हा अपघात झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ओडिशातील नरगुंडी रेल्वे स्टेशन दरम्यान या रेल्वे अपघातात 8 डबे घसरून 20 जण जखमी झाले आहेत. यातील 20 जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिस व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रेल्वे अॅक्सिडेंट मेडिकल व्हॅन घटनास्थळी रवाना झाली आहे.

निर्भया प्रकरण : नराधमांची फाशी लांबणीवर?

या अपघातामुळे 5 रेल्वे इतर मार्गांवरून वळविण्यात आल्या आहेत. दरम्यान, थंडीमुळे पडलेल्या धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दाट धुक्यामुळे मालगाडीला टिळक एक्स्प्रेसने धडक दिली असल्याने ती रूळावरून घसरल्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lokmanya Tilak express Railway accident in Odisha