By-polls: 3 लोकसभा आणि 7 विधानसभेच्या जागांसाठी आज मतदान

By-polls
By-pollsesakal

देशातील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. या सर्व जागांचे निकाल २६ जून रोजी जाहीर होणार आहे.

By-polls
आता झिकाने वाढवली देशाची चिंता, अनेक राज्यात विषाणूचे पुरावे

उत्तर प्रदेशातील रामपूर आणि आझमगढ येथे तर पंजाबमधील संगरूर लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. त्याचवेळी दिल्ली, झारखंड, आंध्र प्रदेश आणि त्रिपुरा या विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणुकीसाठीही मतदान होणार आहे.

भगवंत मान मुख्यमंत्री झाल्यानंतर संगरूरची जागा रिक्त झाली होती. तसेच आझम खान यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रामपूरची जागा रिक्त झाली होती. अखिलेश यादव आझमगडमधून खासदार म्हणून निवडून आले. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

By-polls
'जे स्वत:चं सरकार वाचवू शकले नाहीत, ते उद्धव ठाकरेंचं सरकार वाचवायला निघालेत'

उत्तर प्रदेशातील रामपूर आणि आझमगड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन मतदानाच्या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत 34.45 लाख मतदार मतदान करणार असून त्यात 18.78 लाख पुरुष, 16.67 लाख महिला आणि 218 तृतीय लिंग मतदारांचा समावेश आहे.

रामपूर लोकसभा मतदारसंघातून 6 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत, तर आझमगडमधून 13 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी 4234 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. 291 सेक्टर मॅजिस्ट्रेट, 40 झोनल मॅजिस्ट्रेट, 10 स्टॅटिक मॅजिस्ट्रेट आणि 433 मायक्रो ऑब्झर्व्हर्स मतदानाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. पोटनिवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी केंद्रीय फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

दिल्लीच्या राजेंद्र नगर, झारखंडच्या मंडारी आणि आंध्र प्रदेशच्या आत्मकूर विधानसभेसाठीही मतदान होणार आहे. राघव चढ्ढा यांच्या राजीनाम्यामुळे राजेंद्र नगरची जागा रिक्त झाली होती. राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चढ्ढा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, मतमोजणी 26 जून रोजी होणार असून पोटनिवडणुकीची अधिसूचना 30 मे रोजी जारी केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com