भगवान शंकराचं आक्षेपार्ह GIF; इन्स्टाग्राम विरोधात FIR दाखल

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा इन्स्टाग्रामवर आरोप
भगवान शंकराचं आक्षेपार्ह GIF; इन्स्टाग्राम विरोधात FIR दाखल

काही दिवसांपूर्वी गुगलने कन्नड भाषेचा उल्लेख सर्वात कुरुप भाषा असा केला होता. या उल्लेखानंतर सोशल मीडियावर वादंग निर्माण झाला होता. त्यातच भर म्हणून आता इन्स्टाग्रामने (instagram) हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असलेल्या स्टिकर्समध्ये भगवान शंकराच्या हातात वाईन दाखवण्यात आली आहे. या प्रकारानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून याप्रकरणी इन्स्टाग्राविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (lord-shiva-gif-sticker-with-wine-glass-on-instagram-creates-controversy-fir-lodged-against-it-in-delhi)

हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने हे GIF तयार करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. तसंच या प्रकरणी इन्स्टाग्रामचे सीईओ आणि अन्य अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचीही विनंती करण्यात आली आहे.

भगवान शंकराचं आक्षेपार्ह GIF; इन्स्टाग्राम विरोधात FIR दाखल
Veg - Non veg; रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवणारे पदार्थ

"इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये उपलब्ध असलेल्या स्टिकर्समध्ये भगवान शंकर यांच्या हातात द्रव पदार्थ ( कदाचित वाईन) आणि सोबत मोबाईल दाखवण्यता आला आहे. इन्स्टा स्टोरी सर्च बारमध्ये शिव असं टाइप केल्यावर त्यात ऊगवान शंकरांचं हे आक्षेपार्ह स्टिकर आढळून आलं. हे स्टिकर अद्यापतरी कोणत्याही सोशल मीडिया वापरकर्त्याने पोस्ट केलेलं नाही. तरीदेखील ते इन्स्टा स्टिकर्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. तसंच या स्टिकर्सबाबत यापूर्वीदेखील अनेक युजर्सने तक्रार दाखल केली होती", असं दाखल करण्यात आलेल्या एफआयआर मध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील अनेक सोशल मीडिया अॅप्सवर धार्मिक सौहार्द बिघडविल्याचे आरोप करण्यात आला आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक मुद्दे वादाचा विषय ठरले आहेत. अलिकडेच गुगलने ‘कन्नड’ भाषेचा उल्लेख सर्वात कुरूप भाषा म्हणून केला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनवर चक्क कर्नाटकच्या ध्वजाच्या रंगामध्ये महिलांचे अंतर्वस्त्र विक्रीसाठी उपलब्ध केले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com