पोलिस चौकीतील दोघांची मिठी पाहून फुटला अश्रूंचा बांध...

वृत्तसंस्था
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

'एक दुजे के लिए' या चित्रपटामधील प्रेमकहाणी अनेकांना माहित आहे. प्रेमात बुडाल्यानंतर प्रेमी युगल एकमेकांसाठी काहीही करायला तयार होता. चित्रपटातील कथानकप्रमाणे प्रेमकहाणीचा शेवट पोलिसांनी केला.

बेगुसराय (बिहार): 'एक दुजे के लिए' या चित्रपटामधील प्रेमकहाणी अनेकांना माहित आहे. प्रेमात बुडाल्यानंतर प्रेमी युगल एकमेकांसाठी काहीही करायला तयार होता. चित्रपटातील कथानकप्रमाणे प्रेमकहाणीचा शेवट पोलिसांनी केला.

दोघे एका कॉलेजमधील. दोघांचे एकमेकांवर प्रेम जळले. चित्रपटातील कथेप्रमाणे दोघांची प्रेमकहाणी दिवसेंदिवस फुलत गेली. परंतु, दोघांच्या विवाहाला घरच्यांनी विरोध केला. पण, हम तुम दोनो ना मिल पाये तो... या गाण्याप्रमाणे काही झाले तरी विवाह करायचा अन्यथा जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. परंतु, पोलिसांच्या मदतीमुळे दोघांचा विवाह पार पडला.

बारबाग गावमधील मुकेश चौधरी (वय 20) व कोठिया गावातील युवतीसोबत (वय 19) कॉलेजपासून प्रेमसंबंध सुरू होते. परंतु, घरच्यांचा विरोध असल्यामुळे दोघांनी प्रथम एका मंदिरामध्ये विवाह केला व नंतर नोंदणीपद्धतीने विवाह केला. घरच्यांना हे समजल्यानंतर दोघांच्या घरच्यांनी दोघांना बेदम मारहाण सुरू केली. दोघे दोघांच्या घरी. एकमेकांशी संपर्कही बंद झाला. मुलाने अखेर विवाहाचे नोंदणीपत्र घेऊन पोलिस चौकी गाठली. युवतीचा दुसरा विवाह झाला तर आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी युवतीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांची समजूत काढताना दोघांचा अधिकृत विवाह झाल्याचे सांगितले. अखेर दोघांना पोलिस चौकीत आणून विवाह लावण्यात आला.

प्रेमीयुगल अनेक दिवस एकमेकांच्या संपर्कात नव्हते. पंरतु, पोलिस चौकीत आल्यानंतर एकमेकांना मारलेली मिठी व दोघांच्या डोळ्यातील अश्रू पाहून नातेवाईकांनाही रडू कोसळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: love happened in college police got married in police station at bihar