esakal | 'तुम्ही प्रेम करणाऱ्यांना संपवू शकता पण प्रेमाला नाही, तो एक धर्म'
sakal

बोलून बातमी शोधा

Love Jihad law, Love,religion,   KTS Tulsi , Congress , BJP

'लव्ह जिहाद' या शब्दाची निर्मिती करुन भाजप देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकिल केटीएस तुलसी यांनी ही लव्ह जिहादच्या मुद्यावरुन भाजपला टोला लगावला आहे. 

'तुम्ही प्रेम करणाऱ्यांना संपवू शकता पण प्रेमाला नाही, तो एक धर्म'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

'लव्ह जिहाद'च्या मुद्यावरुन सध्या देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक या भाजपशासित राज्यांमध्ये 'लव्ह जिहाद'ची चर्चा सुरू आहे. या राज्यांत 'लव्ह जिहाद' विरोधात कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरु आहेत. 

'लव्ह जिहाद' या शब्दाची निर्मिती करुन भाजप देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकिल केटीएस तुलसी यांनी ही लव्ह जिहादच्या मुद्यावरुन भाजपला टोला लगावला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रेम हाच एक धर्म आहे. प्रेमात असलेले लोक कोणत्याही गोष्टीची परवा करत नाहीत. तुम्ही प्रेमात पडलेल्यांना संपवू शकता. पण, ते प्रेम करणे सोडणार नाहीत, अशा शब्दांत तुलसी यांनी 'लव्ह जिहाद'च्या कायद्यावर टीका केली आहे.   हिर-रांजा, सोहनी-महिवाल यासारखे अनेक प्रेमी युगलांची कहाणी अमर झाल्याचा दाखलाही तुलसी यांनी दिलाय. प्रेमाचा प्रसार करायला हवा. भीती निर्माण करुन ते संपवू नये, असे मतही त्यांनी मांडले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाजप राज्यात 'लव्ह जिहाद'च्या नावाखाली देशात तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे, अशी टिका यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली होती. गेहलोत यांनी 'लव्ह जिहाद' कायद्यासंदर्भात सुरु असलेल्या वादात उडी घेत भाजपवर निशाणा साधला होता. सहमतीने एकत्र येणार्‍या सज्ञान व्यक्तींनाही सत्तेच्या दयेची याचना करावी लागेल, असे वातावरण भाजपकडून तयार केले जात आहे, असे त्यांनी म्हटले होते.