
खरं प्रेम हे नेहमीसाठी अमर असतं, असं म्हणतात. खरं प्रेम मिळवण्यासाठी अनेक प्रियकर आणि प्रेयसी वाट्टेल ते करतात पण आसाममध्ये आपलं खरं प्रेम सिद्ध करुन दाखवणारं एक प्रकरण समोर आलंय.
आसामच्या एका व्यक्तीने त्याच्या मृत गर्लफ्रेंडसोबत विवाह केलाय. हे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते मात्र या व्यक्तीची गर्लफ्रेंड अनेक दिवसांपासून आजारी होती. गर्लफ्रेंडच्या मृत्यूनंतर या व्यक्तीने मृत गर्लफ्रेंडच्या भांगेत कुंकू भरलं आणि तिच्याशी लग्न केलंय. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (love story assam a man married with dead girlfriend video goes viral )
आसामचा 27 वर्षाचा बिटुपन तामुली हा गर्लफ्रेंड प्रार्थनासोबत रिलेशनशिपमध्ये होता. अनेक दिवसापासून प्रार्थना आजारी होती. खूप प्रयत्न करुनही डॉक्टरांना तिला वाचविण्यात यश आले नाही आणि अखेर शुक्रवारी गुवाहाटीच्या एका प्रायवेट हॉस्पिटलमध्ये प्रार्थना मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतरही बिटुपनने तिच्याशी लग्न केले आणि कधीही लग्न न करण्याची शपथ घेतली.
प्रार्थनाची प्रकृती अचानक खालावली ज्यामुळे तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती आणखी खालावत गेली आणि तिचा मृत्यू झाला. प्रार्थना आणि बिटुपन खूप वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते आणि लवकरच लग्न करणार होते.
प्रार्थना आणि बिटुपनच्या नात्याविषयी त्यांच्या घरच्यांना माहिती होतं. ते दोघं या नात्यापासून आनंदी होते मात्र त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहलं होतं.
प्रार्थनाच्या मृत्यूनंतर बिटुपन हा खूप भावूक झाला होता, तो रडला मात्र त्याने सर्व नियमांचं पालन केलं. बिटुपनचं प्रार्थनाविषयीचं प्रेम पाहून संपुर्ण कुटूंबाचं मन भरुन आलं. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या प्रार्थना आणि बिटुपनच्या प्रेमाला खरं प्रेम म्हणताहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.