मटुकनाथ म्हणाले, ज्युलीवर माझं खरं प्रेम...

वृत्तसंस्था
Tuesday, 24 September 2019

माझी प्रेयसी, पत्नी ज्युलीवर माझं खरं प्रेम आहे. ज्युली मला सोडून कोठेही गेलेली नाही. माझं प्रेम अपूर्ण नसून, मी कोणालाही तोडलेले नाही.

पाटणाः माझी प्रेयसी, पत्नी ज्युलीवर माझं खरं प्रेम आहे. ज्युली मला सोडून कोठेही गेलेली नाही. माझं प्रेम अपूर्ण नसून, मी कोणालाही तोडलेले नाही. सर्वांशी नाते जोडण्याचा प्रयत्न करतोय, असे लव्ह गुरू नावाने प्रसिद्ध असलेले प्रा. मटुकनाथ चौधरी यांनी म्हटले आहे.

लव्ह गुरू मटुकनाथ यांनी 30 वर्षांनी लहान असलेली विद्यार्थिनी ज्युली सोबत विवाह केला होता. दोघांचा विवाह चर्चेत आला होता. मात्र, काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर ज्युली त्यांच्यापासून दुरावली गेली.

एका कॉलेजमध्ये मटुकनाथ यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना मटुकनाथ म्हणाले, 'माझ्या हृदयात ज्युलीचे स्थान अद्यापही कायम आहे. तिच्यावर माझे खरे प्रेम आहे. सध्या ती साध्वी म्हणून जीवन जगत असल्याची माहिती आहे, यापेक्षा जास्त काही माहिती नाही. माझं प्रेम अपूर्ण नाही. पुढील काही दिवसांमध्ये प्रेमावर आधारीत पुस्तक लिहीणार आहे.'

'ज्युलीला शिकवत असताना प्रेमात बुडून गेलो होतो. पुढे 2007 पासून 2014 पर्यंत एकत्र राहिलो. पण, काही कारणामुळे दुरावलो गेलो. आजही माझे तिच्यावर तेवढेच प्रेम आहे. साथी रे, तेरे बिना भी क्या जीना.. यावर रोज लिहीत आहे. काही दिवसांपूर्वीच ज्यूलीचा मला फोन आला होता, तिने विचारले कसे आहात, मी ठिक असल्याचे सांगितले. प्रत्येकाला आपले जीवन जगण्याचा अधिकार आहे. प्रेम कोणाला तोडत नाही,' असेही मटुकनाथ म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loveguru matuknath will now write urvashi julie is alive in heart