सिलेंडरचे पैसे ऑनलाईन भरल्यास पाच रुपयांची सूट

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा देशभर प्रयत्न करण्यात येत आहेत. आता तेल कंपन्यांनी स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे एलपीजी सिलेंडर ऑनलाईन बुक करून, ऑनलाईन पैसे भरणाऱ्या ग्राहकांना पाच रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

तेल कंपन्यांनी स्वयंपाकाचे एलपीजी सिलेंडर ऑनलाईन बुक करण्याची आणि ऑनलाईन पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये नेट बॅंकिंग, क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे पैसे भरण्याची व्यवस्था आहे. या नव्या सुविधेला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन गॅस नोंदणी करून पैसे भरणाऱ्या ग्राहकांना पाच रुपयांची सूट देण्यात येणार आहे. सिलेंडर बुक केल्यानंतर पैसे भरताना येणाऱ्या बिलातून पाच रुपये वजा करण्यात येणार आहेत. ऑनलाईन पैसे भरल्यानंतर विहित वेळेत सिलेंडर घरपोच मिळणार आहे. अशा प्रकारची सूट दिल्याने अधिकाधिक ग्राहक ऑनलाईन सिलेंडर बुक करून पैसे भरतील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी केंद्र सरकरने पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी करण्यात येणाऱ्या कॅशलेस व्यवहारांवरील बिलामध्ये 0.75 टक्के सूट देण्यात यावी, अशा सूचना केल्या तेल कंपन्यांना केल्या होत्या. तशी सूटही देण्यात आली होती. आता ही सूट एलपीजी सिलेंडरसाठीही देण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LPG customers now get discount of Rs 5 per cylinder on booking and paying online