घरगुती गॅस सिलेंडर कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती: LPG Gas Cylinder | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LPG Gas Cylinder

LPG Gas Cylinder : घरगुती गॅस सिलेंडर कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती

गॅस सिलिंडरच्या सततच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागते. मागील बऱ्याच काळापासून सातत्याने गॅस सिलेंडरचे दर टप्प्याटप्यात वाढले आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत अशी मागणी होत आहे. दरम्यान, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी गॅस सिलेंडर दराबाबत मोठी अपडेट दिली आहे. (LPG Gas Cylinder Price petroleum minister hardeep puri )

जर इंधनाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कमी झाल्या तर एलपीसी सिलेंडरचे दर कमी होईल असं पुरी यांनी म्हटलं आहे. पुरी संसदेत बोलत होते.

केव्हा होणार गॅस सिलेंडर स्वस्त.....

पुरी यांनी इंधनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर सध्याच्या म्हणजेच 750 डॉलर प्रति मेट्रीक टनपेक्षा कमी झाले तर घरगुती एलपीजी सिलेंडर 'अधिक स्वस्त दरांमध्ये' विकता येतील असं म्हटलं आहे.

लोकसभेमध्ये गुरुवारी प्रश्नोत्तरच्या वेळी घरगुती गॅस सिलेंडरसंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर सरकारच्यावतीने पेट्रोलियम पुरी यांनी सिलेंडरची किंमतींसंदर्भात सविस्तर उत्तर दिलं आहे.

का म्हणाले पुरी?

गॅस सिलेंडरची किंमत आंतरराष्ट्रीय किंमतीवर आकारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या करांवर आधारित असते, असं पुरी यांनी लोकसभेमधील प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं.

सौदी अरेबियाने गॅसच्या दरांमध्ये 330 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. मात्र सरकारने त्या तुलनेत गॅसचे दर वाढवलेले नाहीत. त्यामुळे सौदी अरेबियाने गॅसच्या किंमती कमी केल्यास त्याचा परिणाम देशातील एलपीजी सिलेंडरच्या दरांवर होईल.

पुन्हा सबसिडी सुरु होणार

पूर्वी प्रत्येक व्यक्तीला गॅस सिलेंडर सबसिडी दिली जायची. मात्र आता गॅस सिलेंडरवरील सबसिडी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र पुन्हा ही सबसिडी सुरु केल्यास त्याचा लाभ आधी गरीब लोकांना दिला जाईल, अशी माहितीही पुरी यांनी यावेळी सांगितली.

टॅग्स :LPG GasLPG cylinders